आज आजीच्या ओळखीतून माझ्यासाठी एक स्थळ आलं आहे असं कळलं.! खरं सांगायचं तर मुळात असं ठरवून कोणाशी लग्न करायचं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती, पण बहुधा “मुलाचं सध्या बाहेर काहीही नाही” असं समजून आज मला एका मुलीला भेटायला जायचं होत!
मी ठरलेल्या वेळेच्या १० मिनिटं आधी कॅफे मध्ये जाऊन बसलो, कारण आज मला माझा इतिहास एक गोष्ट सांगून गेला होता की, कुठली व्यक्ती तुमच्या कुठल्या गोष्टीमुळे तुमच्याबद्दल कसं मत बनवेल हे काही सांगता येत नाही! का देव जाणे पण आज वेळ, वातावरण, जागा आणि माझा मूड अतिशय उत्तम होता! आता अगदी ह्या सगळ्या सिच्युएशनला शोभेल अशी एक मुलगी माझ्यासमोरून चालत येत असताना मला दिसली.! पंजाबी ड्रेस,अतिशय गोड चेहरा त्याबरोबर हलकासा मेक-अप, लांब केस एका बाजूला करत माझ्या दिशेने चालत येत होती.! आता मात्र मला आजीचा राग नाही पण अभिमान वाटू लागला होता.!
भेटल्या नंतर बराच वेळ आम्ही दोघंही एकमेकांशी काही बोलत नव्हतो.! मी माझी प्रत्येक कृती अगदी १० वेळा विचार करून करत होतो. ती स्वतःहून तिच्याबद्दल बरंच काही मला सांगत होती आणि मी शाळेत तोंडी परीक्षेला आल्याप्रमाणे तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत होतो.! अचानक तिने मला "आधी तुला कोणी गर्लफ्रेंड होती का"असा प्रश्न विचारला आणि माझा पूर्णपणे क्लीन बोल्ड झाला! तिने मला एकवचनामध्ये प्रश्न विचारला असताना मी तिला अनेकवचनामध्ये उत्तर देणं मला काहीसं चुकीचं वाटलं त्यामुळे आता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये मी 'कोणीच नव्हती गं, तुला?' असं म्हणून स्वतःला तात्पुरतं का होईना वाचवलं! तिने मला अगदी मनापासून 'मलासुद्धा कोणीही नव्हता' असं सांगितलं.! यावरून आमच्यात एक मस्त संवाद सुरु झाला!
मी- तुझ्याकडे बघून अजिबात असं वाटत नाही की तुझ्या प्रेमात एकसुद्धा मुलगा पडला नाही!
ती- ज्यांना मी आवडले ते मला आवडले नाही आणि एक मुलगा होता. मला मनापसून आवडला होता अरे आणि मी खुप हिम्मत करून त्याला विचारलंसुद्धा होतं, पण नाही म्हंटला तो.!
मी- काय? खरंच? त्याला डोळे नव्हते का? कारण समोर आलेली तुझ्यासारखी एखादी सुंदर गोष्ट जर कोणी नाही म्हणत असेल तर खरंच अवघडे!
ती - Are you sure?
मी - काय? कशाबद्दल ?
ती - की तु आजपर्यंत एकदाही प्रेमात पडला नाहीयेस!
मी- खरंच नाही!
यानंतर काही वेळात ती निघाली. आता मात्र मला कळून चुकलेलं की माझं खोटं पकडलं गेलं आहे. ती तिच्या गाडीपाशी गेली आणि निघाली. मला काय वाटलं माहित नाही, पण मी तडक तिच्या गाडीपाशी गेलो आणि बोललो, 'सॉरी! 4 होत्या!' तिने गोंधळून मला विचारलं, 'काय?' मी म्हंटलं "गर्लफ्रेंडस! मला वाटलं तू पुन्हा नीट माझ्याशी बोलणार नाहीस किंवा परत भेटणार नाहीस म्हणून मी खोटं बोललो पण तू जे होतं ते सगळं खरं सांगितलंस मग मला वाटलं आपणही सांगावं! मी तुला सांगेन सगळ्या माझ्या स्टोरीज!म्हणजे जर पुन्हा भेट झाली तर !"
ती हसून मला बाय म्हणून निघाली.
मी- परत भेटणारेस ना म्हणजे?
ती- तुझी स्टोरी ऐकायला तर भेटावं लागेलच ना!
मी- कधी भेटुया?
ती 'लवरकरच' अस म्हणून निघून गेली!
YOU ARE READING
ती आणि मी
Short Story"कुणाच्या तरी ओळखीतून स्थळ आल्यावर मुलीला बघायला जाण आणि मग एकमेकांशी ओळख करून लग्न करणं(Arranged marriage)" या सगळ्या प्रकारामध्ये अजिबात विश्वास न ठेवणाऱ्या मला काही कारणाने एका मुलीला भेटायला जाव लागतं आणि तेव्हाच मला कळून चुकत की प्रेम म्हणजे नक...