समुद्राच्या लाटा आणि प्रेमळ रात्र

176 2 0
                                    

समुद्र अन समुद्राच्या लाटा  ...
तुझ्या माझ्या स्वप्नांत हरवल्या आज साऱ्या  वाटा ..
हातात हात गुंफलेले ...
अन मनात सारे दाटलेले ..
अवकाशी चंद्र तारे हि कुजबुजले ...
ह्यांच्यातले गोड - गुपित आपल्याला कळले ..
मुके शब्दही आता आतुर झाले ...
मनाचे ठोके हळुवार वाढले ...
गुंफलेले हाथ हळुवार सुटले ..
अबोल मिठीत सारेच व्यक्त झाले..
मिठी अलगत सुटली ..
आनंद अश्रूंची गंगा लाटांपेक्षाही खुलून निघाली  ..
नजरेत नजर गुंतली  ...
त्या क्षणाची साक्ष उफाळलेल्या लाटांनी घातली ..
ओठांत ओठ गुंफले ..
स्वप्नातले स्वप्नांची आज स्वप्नी रंगले ..
समुद्र , लाटा , किनारा अन रात्रीचे तारे..सारे आपल्याला पाहून लाजले ..
तुझे माझे सारे आता आपले झाले ..

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Feb 02, 2019 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

समुद्राच्या लाटा आणि प्रेमळ रात्र Where stories live. Discover now