वाट

349 4 3
                                    

हम्म्म्मम्मम्मम  sssssss.....  एक  लडकी भिगी भगिसी ... सोते रातो मै  जागिसी......... 
हे सुंदर असं पावसातल गाणं, हातात गर्रमागरम कॉफी चा  मग,  खिडकी भाहेरील पावसाच्या सरी,  आणि आपले सुंदर   असे त्याच्या बरोबर घालवलेले ते  क्षण.............  एवढंचं राहील होत फक्त गार्गी कडे पुढील आयुष्य कापण्यासाठी......

  पण आता सगळं संपल होत. तिच्या आयुष्यात आता तो राहिला न्हवता.........

(दोन वर्षान पूर्वी )

गार्गी आणि आयुष ह्या दोघांच्याही पाहिली भेट पुण्यातल्या गणेश कलाक्रीडा मंचावर झाली. ते दोघी एका गाण्याच्या शो ला आले होते.  गार्गी  ही एक उत्तम गायक होती.  तिच्या सोबत गाणारा पियुष हा आयुष चा जुळा भाऊ...

पियुष मुळेच गार्गी आणि आयुष ची ओळख झाली.
हळूहळू दोघांची मैत्री वाढू लागली होती. पियुष मुळे गार्गी आणि आयुष ह्यच्यातील मैत्री अजूनचं वाढत चालली होती.

गार्गी ही उत्तम गायिका असल्यामुळे तिचे आणि पियुष चे वेगवेगळ्या ठिकाणी शो  व्हायचे. आतापर्यंत गार्गी ने भारतल्या  अनेक वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली होती.  त्यामुळे तिला अनेक परंपरा, चालीरीती, प्रत्येक ठिकाणाचे वेगळेपण तिला माहित होते.

आयुष हा एक फोटोग्राफर होता. त्याला निसर्गात रमायला खूप आवडायचं. त्याने त्याच इंजिनीरिंग चं शिक्षण पुण्यातूनचं पूर्ण केल होत. पण त्याला काहीतरी हटके करायचं होत. आयुष ला त्याच आयुष्य एक मर्यादितच्या चौकटीत खर्च करायच नव्हतं.  त्याला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणचा आनंद घेयचा होता. मनमुराद आयुष्य जगायचं होत. कोणतंही प्लॅनिंग न करता समोर येईल तो क्षण जगत होता.  कानात हेडफोन, आणि एक चं गाणं.. हम्म्म्मम्मम्मम  एक लाकडी भिगी भागीसी.......

या गण्यामुळे त्याचा सगळा स्ट्रेस कमी व्हायचा. म्हूणन आयुष हेच गाणे नेहमी नेहमी ऐकायचा.

(गार्गीच्या  नजरेतून )

हळूहळू हळूहळू आम्हा  दोघांची भेट वाढू  लागली तसतशी आमच्या  मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ लागला.
आम्ही रोज भेटू लागलो. आम्ही दोघंही आमची कामे सांभाळून एकमेकांनासाठी वेळ काढू लागलो. 

वाट Where stories live. Discover now