Turning Point भाग - १

573 5 2
                                    

दिनांक : ३१-३-२०२०
वेळ : रात्री ८.३०

         आज मी पाच दिवसानंतर घरा बाहेर पडले. एरवी गजबजलेलं आपल शहर आज मात्र , रात्री १ किंवा २ वाजल्यासारख शांत होत. अर्थातच कारण Covid-19. नेहमी भितभित रस्त्यावर वावरणारे कुत्रे आज मात्र शांत, ऐसपैस झोपलेले कारण त्यांच्या शेपटीवर पाय देणारा, त्यांच्या अंगावरून गाडी नेणारा माणूस आता बाहेर नव्हता.
           मी आजीच्या इमारतीच्या गेटात शिरले. वॉचमन ने मला sanitizer दिलं. मग माझ लक्ष समोरच्या पडक्या दीपा नावाच्या इमारती कडे गेलं. दीपा मध्ये कोणी राहत नाही.पण आज इतर इमारतीमध्ये लोक रहूनसुधा मला दीपा मध्ये आणि इतर बिल्डिंग मध्ये काही विशेष फरक आढळला नाही  कारण सगळाच सामसूम!
          

Turning PointWhere stories live. Discover now