मी मागे वळले आणि थांबून रस्त्यासमोरच्या नारळाच्या झाडाकडे पाहिलं तर ते आज मला वेगळंच आनंदी वाटलं कारण त्याच्यावरचा CO2 चा भडीमार आता कमी झाला होता.
माणस मात्र कोरोना च्या भितीमुळे घरात दडून बसलेली. लाखावारी रुग्ण , हजारांच्या संख्येत होणारे मृत्यू मला आठवले आणि एकदम कंठ दाटून आला.
माझ्या मनात विचार आला , हे झालं मानवजातीच्या दृष्टीतून विचार करण पण निसर्गाचा घटक म्हणून पाहिलं तर अस दिसेल की जणू काही निसर्ग स्वतः च revival म्हणजेच पुनरुज्जीवन करत आहे. माणसाने केलेल्या चुका आता निसर्ग दुरुस्त करत आहे.एवढे दिवस माणसामुळे प्राणी, पक्षी कोंडीत सापडलेले आणि आज माणसच कोंडीत आहेत. हा खरा निसर्गाचा टर्निंग पॉइंट आहे. जो गरजेचा आहे. नाहीतर माणूस स्वार्थासाठी,जगातल्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी निसर्गाचा आणि त्यातल्या घटकांचा हवा तसा वापर करू लागला. या लॉकडोउन मुलं आपल्याला आता पक्ष्यांचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागलेत. माणसं आता थांबून निसर्गाकडे पाहू लागली आहेत. प्रदूषण कमी होऊ लागलंय आणि इतर अनेक बदल आता जाणवू लागले आहेत.
हे कोरोनाचा वादळ कधीतरी नक्कीच थांबेल पण त्यानंतर तरी माणसाला चुकांची जाणीव होईल का? की येरे माझ्या मागल्या म्हणत पुन्हा तसेच पूर्ववत?