शौर्यमान भाग १ : चौथ्या तलवारीची चोरी

145 2 0
                                    









शिवरुद्रा : शौर्यमान

     त्रिकालगडाच्या गुहेत गेल्या महिनाभरापासून चोरीचं सत्र सुरूच होतं

К сожалению, это изображение не соответствует нашим правилам. Чтобы продолжить публикацию, пожалуйста, удалите изображение или загрузите другое.

     त्रिकालगडाच्या गुहेत गेल्या महिनाभरापासून चोरीचं सत्र सुरूच होतं. एका विशिष्ट अशा मूल्यवान आणि मजबूत धातू पासून बनवलेल्या पाच तलवारी त्रिकाल गडाच्या गुहेत  लपवून ठेवल्या होत्या, जेणेकरून त्या शत्रूच्या हाती पडू नयेत. पण गेल्या महिन्याभरात त्यातील तीन तलवारी चोरीला गेल्या. एवढा मोठा सशस्त्र  पहारा असूनही तलवारीची  चोरी होईलच कशी ?  या चिंतेने आचार्य मेंत्तानंद  स्वामी चिंतित झाले होते. गुहेत आता फक्त शेवटच्या दोनच तलवारी शिल्लक राहिल्या होत्या. त्या दोन तलवारी सुरक्षित राहाव्यात म्हणून आचार्य मेंत्तानंद  स्वतः सैनिकांसोबत रात्रभर जागे होते.
          त्रिकाल गड हा  जयवंतपुरच्या  जंगलात स्थित असलेला एक गिरिदुर्ग किल्ला.  तो इतका भव्य आणि दिव्य होता की त्याला बघताक्षणी कोणीही त्याच्या भव्यतेच्या प्रेमात पडत असे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीवर कोणाची हैवाणी नजर पडली हे समजेना.  त्रिकाल गडाभोवती असलेल्या घनदाट जंगलामुळे कोणीही या किल्ल्याकडे फिरकत नसे. जर कोणी या गडावर आलेच तर ते दिवस असेपर्यंतच गडावर फिरत, संध्याकाळ होताच कोणाचीही हिंमत होत नव्हती  त्या जंगलात फिरण्याची. त्रिकाल गडाच्या पायथ्याला शिवकालीन पाच मोठ्या गुहा होत्या. सामान्य माणसांना त्या दिसू नयेत अशी त्यांची रचना केली होती. बाहेरुन जरी या गुहा दिसत नव्हत्या तरी पण आतून त्या खूप मोठ्या होत्या.  जयवंतपुरच्या  नागरिकांना सुद्धा माहिती नव्हते की त्रिकाल गडाच्या मागील बाजूस गुप्त अशा रहस्यमयी गुहा आहेत.
   मध्यरात्रीची वेळ होती. गुहेत मुख्य द्वारापासून ते  सिंहासना पर्यंत प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देत उभा होता. आचार्य मेंत्तानंद  स्वामी सिंहासनावर गंभीर मुद्रा करून बसले . स्वामींनी सैनिकांना मोठ्या अशा तिजोरी सारख्या दिसणाऱ्या एका कपाटातून शिल्लक राहिलेल्या दोन्ही तलवारी काढायला सांगितल्या. सैनिकांनी तिजोरीतून एक लांबलचक  पेटी काढली. लांबलचक अशा  छोट्या पेटीमध्ये दोन्ही तलवारी बंदिस्त होत्या. कोणत्याही व्यक्तीला ती पेटी उघडणे सहजासहजी शक्य नव्हते. आचार्य ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करु लागले, त्यांनी आपल्या कानातील कुंडल्यांमध्ये असलेला एक चौकोनी मणी काढला. तो मणी त्यांनी करंगळीचा नखांमध्ये धरला. पेटीवर चावी लावण्याच्या ठिकाणी त्यांनी करंगळी लावून तो मणी आत ढकलला. पेटीच्या चारही बाजूला असलेले कुलपाचे भाग मोकळे झाले. आचार्यांनी पेटीचे झाकण उघडताच एक तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरला. ती तलवार इतकी चमकत होती की पूर्ण गुहा  प्रकाशमय झाली .
        
आचार्य मेत्तानंद  स्वामींनी ती तलवार आपल्या
मस्तकाला  लावली. तलवार अनंतेश्वरी  देवीच्या पायाशी
   ठेवत आचार्यांनी एका जळजळीत नजरेने आपल्या सैनिकांकडे पाहिले. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. ते आपल्या सैनिकांना  उद्देशून बोलू लागले. त्यांच्या आवाजात   गंभीरता आणि कर्कश पणा होता.
    " माझ्या शुर सैनिकांनो, आपण शूर वीरांचे वंशज आहोत. आपल्या  पूर्वजांची ही विरासत सुरक्षित रहावी म्हणून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी गुरुवर्य विश्वजीत स्वामींनी आपल्यावर सोपवली आहे. पण शत्रूच्या चतुराई मुळे किंवा आपल्या हलगर्जीपणामुळे त्यातील तीन तलवारी आपण गमावून बसलो आहोत. जर आपल्याला त्या तीनही तलवारी पुन्हा मिळवायचे असतील तर राहिलेल्या दोन्ही तलवारी सुरक्षित ठेवावे लागतील. जय अनंतेश्वरी...!"
सैनिकांनी मागून घोषणा दिल्या
""जय अनंतेश्वरी..,जय अनंतेश्वरी..!""
    आचार्य मेत्तानंद देवीच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसले. आचार्यांना ध्यानस्थ बसलेले पाहून त्यांच्या शिष्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. ते पाचही शिष्य एकमेकांमध्ये चर्चा करू लागले.
   एक शिष्य आपल्या सहकाऱ्यांना  म्हणाला,
" मला वाटतं ही तीच वेळ आहे, गुरुवर्य विश्वजीत यांनी केलेले भाकीत खरे ठरण्याची. आपण याआधी कधीही मेत्तानंद स्वामींना एवढं क्रोधित होऊन देवीची उपासना करताना पाहिलेले नाही."
"पण गुरुवर्य विश्वजीतांनी  कोणतं भाकित केलं होतं?" दुसरा शिष्य त्याला विचारू लागला.
     'काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे,'' तो शिष्य खूप गंभीर होऊन आपल्या सहकाऱ्यांना  सांगू लागला.
" गुरुवर्य विश्वजीत हे खूप वृद्ध झाल्यामुळे त्यांनी त्रिकाल गडाच्या सुरक्षेची जबाबदारी आचार्य मेत्तानंद स्वामींना देण्याचे ठरवले. त्यावेळेस त्यांनी मेत्तानंद स्वामींना उपदेश केला की,
    ' प्रिय मेत्तानंद,  मी तुला या किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी देत आहे. मला खात्री आहे तू तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या किल्ल्याचं आणि त्या तलवारींचे रक्षण करशील. पण नियतीच्या निर्णया पुढे कोणाचेही चालत नाही. तुला सांगण्यास मला अत्यंत वाईट वाटत आहे की काही दिवसानंतर आपल्या या पवित्र विरासतीवर एक मोठे संकट येणार आहे. पण  नियती आपल्या पुढे जसे  संकट निर्माण करते तसेच त्या संकटातून वाचण्याचा मार्गही निर्माण करते. जेव्हा या गुहेतील  कंथक  धातूच्या तलवारी शत्रूच्या हाती  पडतील, तेव्हा नियती स्वतः एक योद्धा आपल्या रक्षणासाठी तुझ्यासमोर उभा करेल. फक्त तुला त्या योद्ध्याला तुझ्या दूरदृष्टीने आणि विवेकबुद्धीने ओळखायचा आहे. तू जेव्हा त्या योद्ध्याला ओळखशील तेव्हा तुला माहीतच आहे तुला काय करायचं आहे ते."
  " पण तो योद्धा कोण आहे? "   एकाने त्या शिष्याला विचारले.
   " तो कोणीही असू शकतो तो योद्धा आपल्यातील एक जण असेल किंवा बाहेरील सुद्धा असू शकतो शेवटी आचार्य मेत्तानंदच त्या योद्ध्याला ओळखू शकतील."

shourya-maanМесто, где живут истории. Откройте их для себя