नवीन सुरुवात, कि???

517 0 0
                                    

आज दोघांचं लग्न झालं. नवीन आयुष्याला सुरुवात. आनंदी आनंद होणार. दोघेही सुखाने संसार करतील. अशी चर्चा सुरू होती. पण त्यांना कुठे माहित होतं, हे लग्न कशासाठी, कोणासाठी झालंय?
कोण आईविना राहू नये म्हणून, कोणाला बाबाची माया मिळावी म्हणून, तर कोणाला जगापासून सुरक्षा हवी म्हणून केलेलं हे फक्त तडजोड होतं, हे फक्त त्या दोघांना माहित होतं. कोणाला माहित होतं, त्यांच्या मनात आनंद नव्हता. आपण नवीन आई- नवीन बाबा म्हणून स्वीकारले जाणार कि नाही हीच घालमेल सुरू होती.
कोणाला माहित होतं, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम कधीच नव्हतं. दोघे एकमेकांच्या आयुष्याचे भागीदार नव्हते, एकमेकांच्या कर्तव्याचे भागीदार झाले होते.
तो तिला 'मॅडम' आणि ती त्याला 'सर' म्हणायची.
दोघांची ओळख होऊन अवघे आठ महिने झाले होते, तेही फोनवर. तीन महिन्या आदी प्रत्यक्ष भेट झाली, तेही एका अत्यंत दुःखद प्रसंगात.
हर्षद आणि मयुरीचं लग्नाविषयी खूप जण रागात होते. मुख्य म्हणजे हर्षद ची मुलगी लया आणि मयुरीचा मुलगा शिरिष. तर फार कमी जणांना तो पुनर्विवाह योग्य वाटलं.
का असं??
     आणि ते लग्न पण कसं? हर्षद साध्या फाॅर्मल शर्ट पॅंटवर. मयुरीने साडीला पूर्ण नकार दिला होता. तिचा कलश गेल्या पासून ती साडीला विसरून गेली. तिने साधा रोजचा कुर्ता आणि लेग्गिंग वर चक्क लग्नाला उभी राहिली. जणू काही विशेष नाहीच आहे ह्या लग्नात.
     लया आणि शिरीष फुगून एका टेबलवर बसले होते. त्यांना सांगितलं गेलं होतं कि आजच्या नंतर हर्षद, मयूरी ,लया आणि शिरीष एकत्र राहणार आहेत. मयूरी लयाची नवीन आई, अन् हर्षद शिरीष चा नवीन बाबा.
मुलं नवीन काहीही स्वीकारतात, नवीन आई किंवा बाबा मुळीच नाही. त्याबाबतीत त्यांचा अटळ , अपार विश्वास मिळवावा लागतो.
     संध्याकाळी मयुरीचं जयकरांच्या घरी ग्रहप्रवेश झाला. ते पण अगदी साध्या पद्धतीने. घरी कुणीच नव्हतं. हर्षदचे आई बाबा देवाघरी होते. लहान वयात त्याने खूप कष्ट करून स्वतःला वर आणलं होतं. निकिता ही हर्षदचं काॅलेजमधलं पहिलं प्रेम. तिने त्याच्या प्रत्येक संघर्षात साथ दिली. प्रेम आणि आदर एकमेकांवरचं कधीच कमी नाही होऊ दिलं. दोन वर्षे झाली , शिक्षण पूर्ण करून तिने निकिता हर्षद जयकर हे नाव मानाने लावला.
     काही वर्षांनी दोघांना छान अशी छोटी परी झाली, ती परी म्हणजेच लया. आईची परी आणि बाबांची राजकुमारी होती ती. अगदी स्वर्गासारखा संसार होता दोघांचा. हर्षद एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होता अन् एका NGOcha सभासद होता, ज्याच्या माध्यमातून तो अनाथ, गरीब अश्या मुलांना शिक्षणासाठी मदत करायचा. निकिता ही त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. अगदी शिव पार्वती ची जोडी. पण...
मयुरीबद्दल न बोलून कसं चालेल? मयुरी हर्षद जयकर व्हायचा अगोदर ती मयुरी कलश केतकर होती, तेही सात वर्षे. तिची पण प्रेम कहाणी उल्लेखनीय आहे, परीकथेसारखी. अवघ्या १४ वयात ती आणि कलश एकमेकांच्या प्रेमात पडले. सगळ्या मित्रांना वाटलं , फक्त वयाचा खेळ आहे, दोन तीन वर्षांत संपेल. पण नाही. दोघांचा एकमेकांच्या प्रेमात ठाम विश्वास होता. मयुरीच्या अठराव्या  वर्षी कायदेशीर लग्न केले. मयुरी कलश साठी आई बाबा भाऊ सगळ्यांना मागे सोडून आली होती. काही महिन्यांतच कलशने मयुरी चे घरच्यांचं मन आणि मयुरी ने कलश चे घरच्यांचं मन जिंकून घेतले. आणि सुरू झाला सोन्यासारखा संसार. मग झाला शिरीष. अगदी नजर लागेल असा आनंद भरला होता. आणि शेवटी लागलीच नजर...

भाग कसा वाटला हे कमेंट्स द्वारे नक्कीच कळवावे

पुनर्प्रेमWhere stories live. Discover now