स्वाती नावाच्या एका विशीतल्या मुलीवर कोर्टात केस चालू होती. तिच्यावर बॉयफ्रेंडच्या खुनाचा आरोप होता. वकील तिला प्रश्न विचारत होता. जज्ज एक चाळिशीतल्या बाई होत्या. त्यांनाही या खुनामागचं कारण जाणून घ्यायची उत्सुकता होती.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर न्यायालयतल्या सर्वच केसेस प्रलंबित राहिल्या होत्या. आता सर्व देशभर लसीकरण चालु झाले होते. त्यामुळे सरकारने जनजीवन सुरळीत करण्यासाठी सर्वकाही पूर्वपदावर आणले होते. लॉकडाउनच्या काळात झालेले सर्व गुन्हे, अपराधच्या सर्व केसेस निकालात काढण्यासाठी न्यायालय सज्ज झाले.
विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या स्वातीला बघण्यासाठी कोर्टात गर्दी उसळली होती. कोरोना गेला असलातरी मास्क लावण्याची सवय लोकांच्या चांगलीच अंगी लाभली होती. पण काहीजण मास्कविना स्वतःला सुरक्षित मानत होते. मास्कची जागा फक्त तोंडावर असल्याने डोळ्यांना काहीही करण्याची मुभा होती. सर्वाच्या नजरा स्वातीकडे खिळल्या होत्या. बहुतेक त्या कोर्टातली आत्तापर्यंतची सर्वांत हॉट आरोपी तीच होती. तारुण्यानं मुसमुसलेलं शरीर. मेकप न करता लालचुटुक दिसणारे ओठ, काळेभोर डोळे. मूळचाच गोरापान रंग. कोर्टात येण्यासाठी साधा सलवार-कमीज घातला असला तरी ड्रेस टाइट फिटींगचा असल्यानं तिच्या शरीराचे चढ-उतार स्पष्ट दिसत होते. गळा तर एवढा खोल होता की त्यातनं दिसणारी फट प्रश्न विचारणार्या वकीलाला सुद्धा बेचैन करत होती.
"मिस् स्वाती, गेल्या एप्रिल महिन्याच्या एक तारखेला हॉटेल राजहंस मध्ये स्वनिल काळे यांचा खून झाला. त्या दिवशी रुम नं.४२० मध्ये तुम्हीच त्यांच्यासोबत होता. हा खून तुम्हीच केलाय असा तुमच्यावर आरोप आहे. तुम्हाला हा आरोप मान्य आहे का?"
"हो" स्वाती बिनधास्त उत्तरली.
"दॅट्स ऑल, मिलॉर्ड," वकील जज्जकडं वळून म्हणाला, "आरोपीनं गुन्हा कबूल केलाय. या खुनाबद्दल तिला जास्तीत जास्त शिक्षा ठोठवावी अशी मी कोर्टाला विनंती करतो."