"अगं ते कोरोना वगैरे म्हाताऱ्या किंवा ज्यांना काही रोग आहे त्यांनाच होत. तु उगाच टेन्शन घेतेस." अक्षयचा सकाळपासुन हा चौथा निष्फळ प्रयन्त चालु होता."अरे काल रात्री केल ना आपण. एवढा काय उतावळा होतोयस. इथे बाहेर काय चाललंय आणि तुझ काय चाललंय?" मिनल ने त्याला साफ नकार दिला.
"ये बाई ते फोन सेक्स वैगेरे मला नाही जमत, आपलं एकमेकांना तापवयाच आणि झोपुन घ्यायचं. त्यात काय मजा, प्लिज तु ये ना रूमवर" अक्षय तिला विनवण्या करू करू लागला.
"ये नाही हा...टीव्हीवरच्या बातम्या बघत नाहीस का तु? रोज किती पेशंटचा आकडा वाढतोय. सोशल डिस्टन्सिग पाळलं पाहिजे आपण. मी नाही येणार." मिनल आपल्या बॉयफ्रेंडला समजवण्याच्या स्वरूपात म्हणाली.
"अग एवढी भीती वाटत असेल तर आपण मास्क लावुन करू, प्लिज आज नाही नको म्हणु. प्लिज ये ना." अक्षय किती झाले तरी प्रयत्न करण्याचे सोडत नव्हता.
"तुला काही काळजीच नाही. तुला माहिती आहे..बाबांची नोकरी पण गेलीय. इथे घरात किती प्रॉब्लेम चालु आहेत आणि तु फक्त स्वतःचाच विचार करतोस." मिनलचा राग आता अनावर झाला होता.
"अरे यार .बापाला कुठे मध्ये आणतेस. आपलं करायचं म्हणुन ठरलं होत ना लॉकडाउनच्या आधी. मग आता का माघार घेतेस" अक्षयचा आता ताबा सुटला होता. सर्व विफलता तो तिच्यावर काढत होता.
"हे बघ अक्षय ..मला आतां अस वाटु लागलंय तुझ माझ्यावर प्रेमच नव्हतं. तुला फक्त त्याच गोष्टीमध्येच इंटरेस्ट आहे. मला आता रेलेशनशिप मध्ये नाही राहायचंय. आणि आजपासुन मला अजिबात फोन करू नकोस. ठेव फोन आतां" मिनलने हुंदके देत फोन कट केला.
"अग थांब .ऐक तरी .मिनु..हॅलो .हॅलो" अक्षय मोबाईलकडे बघत नुसता उभा होता. त्याला कल्पना आली होती त्याचं रात्रीच मिळणार फोनवरच सुखही हिरावल गेलं होत. गॅलरीतुन ओसाड झालेल्या रस्त्यावरून त्याने नजर टाकली. कोणी चिटपाखरू हि रस्त्यावर दिसत नव्हते. पुर्ण दिवस फक्त हॉलमधुन बेडरूममध्ये, बेडरूम मधुन गॅलरीत, आणि अधुन मधुन टॉयलेट मध्ये त्याचा प्रवास चालत असे. आता गॅलरीचा मुक्काम संपला आणि तो हॉल मध्ये आला.
