नाव: सृष्टी नीलम आदेश सुतार
इयत्ता: आठवी
शाळेचे नाव: जोशी विद्याभवन गोरेगाव रायगड
विषय: मी अनुभवलेला कोरोना योद्धा
कोरूना योद्धा कोरोना योद्धा म्हटलं की आठवतात ते डॉक्टर, पोलिस, नर्स पण ज्यांनी ग्रामीण पातळीवरही आपली कामगिरी चोख बजावली त्यांचे काय, त्यांना प्रोत्साहन कोण देणार.
ज्यावेळी मुंबईसारख्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव वाढला होता. त्यावेळी मुंबईहून व इतर अनेक ठिकाणाहून लोकांचे लोंढे पायी गावाकडे येत होते त्यावेळी डॉक्टरही ह्या लोकांना रुग्णालयात घेत नव्हते. अशा परिस्थितीत अनेक आशासेविकांनी जीवाची पर्वा न करता त्यांच्या शरीराचे तापमान मोजले, ग्रामसेवकांनी त्यांच्या नोंदी ठेवल्या. योग्य ती खबरदारी घेत, त्यांना विलग्नवासात ठेवण्याची सोय केली तसेच अंगणवाडी सेविकांनी गावातल्या प्रत्येकाच्या घरात जाऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान घेतले.
माझी आई ग्रामसेविका आहे. ज्यावेळी मुंबईसारख्या अतिदक्षता क्षेत्रातून मनुष्यांचा लोंढा पायी पायी अपरात्री येत त्यावेळी माझ्या आईने स्वतः त्यांचे तापमान घेतले. योग्य त्या नोंदी ठेवल्या. एक स्त्री असूनही तिने न डगमगता, धाडसाने ही सगळी कामे केली. मुंबईवरून अनेक कुटुंबीय येत. त्यांची जरा जरी गैरसोय झाली तरी ते हुज्जत घालत ,भांडत. पण तिने त्यांची कोरोना विषाणू बद्दलची योग्य ती खबरदारी घेणे हे तिचे कर्तव्य मानले.
एकदा मुंबईवरून एक कुटुंब आले होते. एक आजीबाई होत्या 55 वर्षाच्या. त्यांनी उन्हातून पायी इतका प्रवास केला होता, की काही केल्या त्यांचा ताप उतरतच नव्हता. आणि त्या काळात अशी परिस्थिती होती की डॉक्टरही त्यांना चेक करायला घाबरत होते. अशावेळी माझ्या आईने धाडस दाखवून त्यांच्या शरीराचे तापमान चेक केले. त्यांच्या नाश्त्याची व जेवणाची सोय केली. आणि जेवल्यानंतर संध्याकाळी हळूहळू त्यांचा ताप उतरू लागला. माझ्या आईकडे दोन ग्रामपंचायतींचा भार आहे. एकाच वेळी तिला या दोन्ही ग्रामपंचायतींचा भार संभाळायला लागतोय. पण तरीही माझ्या आईच्या ग्रामपंचायत हद्दीत असणार्या दोन्ही गावांमध्ये तिने इतकी खबरदारी घेतली की एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. आणि म्हणून मी अख्ख्या जगाला सांगेन माझी आई पण एक कोरोना योद्धा आहे.