
Not_Your_Sau
Hii तू खरंच खूप छान लिहितेस, Wattpad वर मराठी साहित्य फार कमी आहे पण तुझी कथा मला फार आवडली. लिहिण्याची पद्धत अगदी मस्त old school वाली. तुला आवडत असेल तर सुचवते.... मी गेले 2 महिने छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याचा इतिहास वाचत आहे. तेव्हा मला असे कळले की सईबाई ह्या शिवाजी महाराजांसोबत अगदी लहानपणी पासून होत्या. त्यामुळे मला असे वाटते की कदाचित सईबाईच शिवरायांचं पहिलं, गहिरं प्रेम असावं. म्हणून सईबाई व शिवरायांवर तू काही लिहू शकलीस तर मला फार आनंद होईल. म्हणजे त्यांच्या लग्नानंतरच्या बालपणाबद्दल, सईबाईंचे दुःख जेव्हा शिवरायांचे दुसरे लग्न होते, सईबाई गेल्यावर महाराजांचे दुःख, त्यानंतर सुद्धा जेव्हा सईबाई महाराजांना दिसतात, शंभू राजे सोबत चे काही क्षण. असं काही जर तू लिहिलेस तर खूप आवडेल मला. म्हणजे अर्थातच तुला आवडणार असेल तर. असो, मला तुझे लिखाण फार फार आवडले आणि हे लिहिणे कधीच थांबवू नको. खूप सारं प्रेम, From Mumbai ❤️

Not_Your_Sau
@WhisperingWordsmith7 तुला जेव्हा, जसा वेळ मिळेल तसे तू लिही पण लिहिणे सोडू नको. तुझ्या कथा वाचणे हा माझा stress buster आहे. तुझी लिहिण्याची पद्धत, तुझे अचूक शब्द सर्व काही लोकांना कथेत अडकवून ठेवतं. ❤️❤️❤️
•
Rispondi

WhisperingWordsmith7
@Not_Your_Sau yaar खरंच खूप खूप धन्यवाद ✨✨✨ अक्षरशः कालपासून माझ्या चेहऱ्यावरून हसू जात नाहीये!!! इतक्या मनमोकळेपणाने दिलेला अभिप्राय क्वचितंच मिळतो आम्हा लेखकांना.. खरंच मनापासून आभार ❤️❤️❤️ असंच प्रेम पुढेही असुद्या ☺️✨
•
Rispondi

WhisperingWordsmith7
@Not_Your_Sau खूप खूप आभार ❤️❤️❤️ Wattpad वर मराठी साहित्य कमी आहे पण वाचक भरपूर आहेत म्हणून लिहायला सुरुवात केली होती आणि आता मोजकेच पण खूप छान वाचक मिळाले आहेत मला ज्यांना खरंच माझ्या लिखाणाची शैली कळते आणि आवडते. खरंच मनापासून धन्यवाद ✨ आणि महाराजांवर लिहिलेलं साहित्य मी सुद्धा खूप वाचलं आहे आणि सईबाई आणि त्यांच्यावर काहीतरी लिहावं हा सुद्धा विचार केला आहे पण सध्या माझं हे पुस्तक लिहिणं सुरु आहे आणि आत्ता मी माझ्या करियरच्या अशा टप्प्यावर आहे की एकेक करून मला सगळं वेळेत पूर्ण करावं लागतंय. अर्थात, लिहिणं माझं passion आणि profession दोन्ही असलं तरीही 'साथ तुझी' पूर्ण झाल्याशिवाय मी दुसऱ्या विषयाला हात घालू शकत नाही. पण हे झाल्यावर दुसरं पुस्तक त्या विषयावर लिहायला नक्कीच आवडेल मला. आणि अर्थात जेव्हा लिहेन तेव्हा तुम्हांला नक्की कळवेन. आणि प्रयत्न करेन तुमच्यासारख्या वाचकांना निराश न करता चांगलं काहीतरी करेन. ✨ पुन्हा एकदा मनापासून आभार!❤️✨
•
Rispondi