मी अनुभवलेला कोरोना योध्दा

16 1 1
                                    

नाव- श्रावणी लक्ष्मण निंबाळकर
वर्ग- इयत्ता आठवी अ
शाळेचे नाव- विठामाता विद्यालय कराड
शहर- कराड
विषयाचे नाव - मी अनुभवलेला कोरोना योद्धा
                  देशाची सेवा करणे ज्यांचे पहिले काम ! अशा कोरोना योध्द्यांना माझा सलाम. डिसेंबर 2019 मध्ये प्रथम सापडलेल्या कोरोना या अतिसूक्ष्म विषाणूने अल्पकाळात जगभर थैमान घातले . घड्याळाच्या काट्यावर धावणारे जग अक्षरश: जागेवर थांबले.कोरोना लढाईमध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत प्रत्येक कोरोना योध्दा या महामारीविरूद्ध लढत आहे. अशा घातक,भयंकर ,जीवघेण्या,संसर्गजन्य कोरोना महामारीविरूद्ध लढण्यासाठी प्रत्येक देशात कोरोना योद्धे सज्ज झाले.स्वतःच्या जिवाची पर्वा करता केवळ देशसेवेचा विचार या कोरोना योध्द्यांनी केला.
              कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी समाजातील अत्यंत महत्त्वाचे घटक म्हणजे डाॅक्टर,सफाई कामगार, पोलीस,आरोग्य कर्मचारी हे विशेष कोरोना योद्धे आहेत.त्यातील अत्यंत महत्त्वाचे कोरोना योद्धे म्हणजे डाॅक्टर आहेत. डाॅक्टरांनी कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतःची व कुटुंबाची पर्वा केली नाही. ते दिवसरात्र कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी कष्ट करत आहेत.
              मी स्वतः अनुभवलेला एक क्षण म्हणजे कोरोनाकाळात लाॅकडाऊनमध्ये आम्ही क्वारंटाईनला गेलो होतो.तेव्हा आम्हाला एक कोरोना योध्दे भेटले. ते म्हणजे पारवे सर त्यांनी आम्हाला निस्वार्थ भावनेने मदत केली. त्यांनी आम्हाला खूप आधार दिला. आमच्या प्रत्येक अडचणींना ते खंबीरपणे उभे राहत होते. त्यांनी निसंकोचपणे माणूसकीच्या नात्याने मदत केली. त्यांचा मला खूप अभिमान वाटतो.
          कोरोना लढाईतील पोलीस हा कोरोनायोध्दाही अहोरात्र झटून कार्य करीत आहे. लाॅकडाऊनच्या काळात बेसावधपणे फिरणाऱ्या नागरिकांवर योग्य कारवाई करणे, विनाकारण नागरिकांनी गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे यावर त्यांनी चोख बंदोबस्त केला. त्यामुळेच कोरोनाचा अटकाव करणे सोपे झाले. हे करीत असताना कित्येक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. प्रसंगी त्यांनी आपला जीवही गमावला .

     "कोरोना योध्द्यांचा ठेवू मान,
      कार्य त्यांचे आहे महान."

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 12, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मी अनुभवलेला कोरोना योध्दाWhere stories live. Discover now