नाव - तिथी रितेश चोरडिया
वर्ग - ८वी
शाळा - लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, जामनेर
" कोरोना ,कोरोना ,कोरोना "
२०२० मध्ये कोविड-१९ हा एक महामारी रोग चीन मधून भारतात असा आला की त्याने सर्वांना उध्वस्त करून टाकले .जेव्हा चीन मध्ये होता ते वाटत नव्हते की आपल्या भारतात ही येईल पण तो असा आला की मनुष्य, पशु - पक्षी, शाळा अस्त-व्यस्त करून टाकले .जो पर्यंत लोकांना अनुभव आला नाही, तो पर्यंत बिंधास्त राहिले. जसा-जसा लोकांना अनुभव यायला लागला, तसे-तसे लोक सावधानी बाळगायला लागले . कोविड-१९ मध्ये डॉक्टर, वकील, पोलिस, कारगील, पत्रकार, शिक्षक, साधारण मनुष्य सर्वांना याची लागण होऊन गेली.
पी.एम.मोदी यांनी भारताला कोविड पासून वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले, जसे लॉकडाऊन केले, टाळी-थाळी वाजवायला लावले, घरोघरी दिवे लावायला सांगितले .तसेच पोलिसांना, डॉक्टरांना खूप त्रास झाला ; आपल्या कुटुंबियांनपासून दूर राहावे लागले.रात्री-अर्ध्यारात्रीसुधा नौकरी करावी लागली, सगळ्यात जास्त कष्ट ती म्हणजे डॉक्टर आणि परिचारिका यांनी तर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना बरे करण्याचे प्रयत्न केले .त्यात काहींनी आपले प्राण ही गमवले, अशा योध्दांना तर माझा नमन, या सर्वांमध्ये मी अनुभवलेले योद्धे म्हणजेच माझ्या आजी-आजोबा व लहान आजी. जेव्हा मी यांचे अनुभव घेतले तेव्हा मला तर आंगाला शहारे आले. जेव्हा मी आजोबांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितले ; मी कोविड-१९चा होऊन गेलेला रुग्ण.मी कोरोना संदर्भातील निर्देश सावधगिरी बाळगत होतो परंतु म्हणतात ना 'सावधानी हटी दुर्घटना घटी!'आणि तसेच झाले, मला कोरोना झाला. १०नोव्हेंबरला मला ताप आले, मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी कोरोना तपासायला सांगितले आणि काय? मी एवढी सावधगिरी करून ही, मला कोरोना झाला आणि मला विलग्नवास जाण्यास सांगितले. तेव्हापासून माझ्या मनात कल्होळ निर्माण झाला, तत्काळ रुग्णालयात भरती झालो परंतु तरीही मनात प्रचंड भीती होती.
"संपले आपले जीवन संपले". संपूर्ण कुटुंब ग्रासित झाले. परंतु मला परमेश्वर आणि डॉ. परिचारिका यांचावर विश्वास होता.सर्व काही बरे होईल असे डॉ.वारंवार सांगत होते. या संसर्गात कुणीही नातेवाईक जवळ नसते, जवळ असते तर फक्त डॉ.-परिचारिका. हा अनुभव फार कठीण होता जसे मृत्यू दारात उभे आहे. देशात १४नोव्हेंबरला दिवाळी साजरी होत होती आणि मी रुग्णालयात होतो आणि माझ्यासोबत सर्व कर्मचारी व डॉ. दिवाळी साजरी न करता रुग्णांची सेवा करत होते ते म्हणतात ना "देव तारी त्याला कोण मारी!" धन्यवाद डॉ.व कर्मचाऱ्यांना त्यांनी मला सुखरूप घरी पाठवले. कोविड म्हणजे मृत्युला जवळून पाहणे. कृपया मास्क लावा, हात स्वच्छ करा, संतुलीत आहार करा, शारीरिक अंतर ठेवा, नियमित व्यायाम करा. अशा प्रकारे मी अनुभवलेले कोविड योद्धे होते.
'कोरोना विरुद्धच्या लढाईत कार्य ज्यांचे देवासमान,
अशा सर्व कोरोना योद्धयांच्या करूया आपण सन्मान!'