"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळॆभोवती तळॆ साचून सुट्टी मिळॆल काय.. " हे गाणे लहानपणी सर्वांनीच गायले असेल.. 😊
शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय.. बालपण देगा देवा! बालपणाचे सर्वात सोनेरी दिवस म्हणजे शाळा.. ❣️शाळॆच्या प्रत्येकाच्या आठवणी असतात.. काहींच्या गोड तर काहींच्या कडू.. असो माज्याही तशाच आहेत..
माज्या तशा दोन शाळा झाल्या त्यामूळॆ भरपूर आठवणी आहेत पण लिहायला शब्द कमी पडतात.
शाळॆचा तो पहिला दिवस, आईचे शाळॆत सोडायला येणे.. केसांची दोन पोनी त्यावर हेअर बॅंड, हिरवा गणवेश, छोटीशी बॅग, गळ्यात वाॅटर बोटल, रूमाल, डबा व एक कोरी वही.. सर्व आठवणी ताज्या होतात.
मी बाकी मूलांसारखी शाळॆच्या पहिल्या दिवशी रडले नव्हते पण लाजाळू होते.. आईचे बोट सोडून जावस वाटत नव्हत... सर्वच नवीन होत.. पण हळू हळू आपलेसे झाले..
शाळॆत प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही.. माज्या आईची कृपा असे म्हटले तरी वावग ठरणार नाही..ती माझा अभ्यास घेत असे. मी मस्तीखोर मूळीच नव्हते त्यामूळॆ आईच्या हातचा मार फार कमी मिळाला.
मला लहानपणापासून नृत्याची देखिल आवड.. पहिलीत असताना "ढोलकीच्या तालावर" ही लावणी केलेली.. शिक्षकांनी भरभरुन कौतुक केले होते..व आजोबांनी बक्षिस म्हणून पैसे दिले होते.. माझं पहिल बक्षिस!🤗
घर shift झाल्यामूळॆ दुसरीला गेल्यावर नवीन शाळा..शाळा तशी मोठी नव्हती..तळमजल्यावर होती..
नवीन मित्रमैत्रिणी , नवीन शिक्षक पण तिकडेही रुळायला जास्त वेळ नाही गेला.
"छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.."आवडते बालगीत.. वर्गात शिक्षक नसल्यावर मित्रमैत्रिणी सोबत चोर चिटी, नाव गाव फळ फूल खेळायचो. एकदा सर्वांसोबत छडीचा मार पण खावा लागला होता.

VOCÊ ESTÁ LENDO
गेले ते दिवस.. राहिल्या त्या आठवणी(माझी शाळा)
Contoशाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय.. बालपण देगा देवा! बालपणाचे सर्वात सोनेरी दिवस म्हणजे शाळा..