दिवस पहिला

33 0 0
                                    

या करोनाच्या काळात घरूनच काम म्हणून आम्ही सर्वजण गावी आलोय. पुण्यात वाढता संसर्ग आणि मिळालेला वेळ गावी घालवणं हा गावी येण्यामागचा हेतू. बरं गाव कोकणात म्हणून आंबे, काजू, फणस यांचा सीजन सुरु झालेला त्याचा आस्वाद घेणं सोबत चालूच होत.
       पण गावी सगळंच अनुकूल आहे असा नाही. एखादा पाऊस किंवा जोराचा वारा आला तरी इकडची विज 3-4 तास जाते. इंटरनेट चा पण कधीकधी खोळंबाच असतो. पण एकंदरीत पुण्याचामानाने इकडे दगदग कमी.

घरी बसून कंटाळा येतो म्हणून रोज संध्याकाळी भटकंती सुरु करायची अस मी ठरवल आणि आजपासून सुरवात पण झाली. इकडे आम्ही थोडा शहरा बाहेरच राहतो म्हणून जंगल आणि झाडांचा बराचसा भाग आमच्या वाट्याला येतो. संध्याकाळी निघालो तर पाहिल्याच झाडावर माकड आणि त्याची बोलगलेली पिल्लं झाडावरच्या कैऱ्यांचा फडशा पढतांना दिसली. पिल्लांची पळापळ आणि ची -ची  आवाजात ओरड चालु होती. झाडावरून अर्धवट खाल्लेली फळ खाली भिरकावन्याचं काम चालु  होत.

  मी पूढे निघालो. लाल बुद्याचा बुलबुल पक्षाने सुंदर अशी शीळ दिली आणि नर आणि मादी विजेच्या खंबावरून उडून गेल्याचे दिसलें. एकंदरीत निरीक्षण केला असता. बुलबुल पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत माझा गावात हे नक्की. समोर सूर्य मावळतीला गेला असल्याने आभाळ संपूर्ण लालेलाल दिसत होता. पक्षांचे थवे पार्टीला लागले होते. दयाळ पक्षाच जोडपं एका घराच्या खोबणीत वावरताना दिसल. बहुतेक मादी ने अंडी घातली असावीत असा मी अंदाज बांधला आणि आपला मार्ग धरला.
पुढे एक चौक आहे. त्या चौकाला वडाच्या डेरेदार झाडाने संपूर्ण अच्छादल आहे. चौकात थांबून वर बघितल कि हिरवागार छाप्परच आहे असा भास होतो. काही फोटो घेऊन थोडा विसवलो तिथेच. डेरेदार वडाचा झाडाखाली हवेचा गरवाही मस्त होता.

पुढे पूर्ण भटकंती होईपर्यंत सूर्य बराच मावळतीला गेला होता

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.

पुढे पूर्ण भटकंती होईपर्यंत सूर्य बराच मावळतीला गेला होता. अंधाराची चादर पसरण्या आधीच घर गाठव म्हणून परत फिरलो. येईपर्यंब घामाने पूर्ण भिजलो होतो. यऊन मस्त थंड पाण्याची अंघोळ उरकली.रात्री कोंकणी माशाच कालवण आणि भात मिटक्या मारत खाल्ला. झोपताना डोळ्यासमोरून गेलेले पक्षी नाईटधास्त पणे उडताना रेगाळत होते. एकंदरीन मुक्त पणे भाटाकण्याचा आनंद म्हणजे काय हे शिकवत होते.

धन्यवाद

Has llegado al final de las partes publicadas.

⏰ Última actualización: May 30, 2021 ⏰

¡Añade esta historia a tu biblioteca para recibir notificaciones sobre nuevas partes!

भटकंती Donde viven las historias. Descúbrelo ahora