जेनिफर , तिशीतली तरुणी उंच सडपातळ गव्हाळ गोरा रंग , कुरळे मध्यम रेशमी केस , सरळ नाक, मस्त्याकार डोळे थोडे जाड ओठ , लाल शिफॉन च्या गाऊन मधील ते सौन्दर्य .. नक्षिदार वलयांकीत कटिबद्ध कंबर , त्यावर गाउन च्या घेराने घेतलेली फिरकी .. बघताक्षणीच शहरणारं ते रूप .. गॅलरीच्या एका बाजूला विशिष्ट लकबीत उभी असलेली ती सुंदरा ... पाषाणाच्या मनाला सुद्धा पाझर फोडतील असे ते लाघवी सौन्दर्य ... अलगद कोनातून बघणारी ती नजर ... नाजूक कानाच्या पाळीत असलेले मोत्यांचे इअरस्टड.. ओठांवर मधाचा गोडवा... तेवढंच मधाळ हसणं .. नखाला डार्क ब्राउन नेलपेंट, ओठांवर डीप ब्राउन लिपस्टिक , काजळाने कोरलेले डोळे .. मी बघताक्षणीच घायाळ झालो .. नाही पुरता गेलोच .. मात्र लक्षात येताच सावरलो
ये बैस ... मी माझ्या आलिशान सूट मधील सोफ्याकडे बोट दाखवत म्हणालो ? काय घेणार ? बिअर कि रेड वाईन ..
नाही सर .. काही नको . मी फक्त सॉरी म्हणायला आली आहे .
हे बघ माझ्याकडे चुकीला माफी नसते .. मी आडमुठे पणाने बोललो
पण सर .. खरंच माझ्या हाताने चुकीने कॉफी सांडली .. जेनिफर काकुळतीला येऊन बोलत होती .. सर मला माझ्या नौकरीची खूप गरज आहे माझ्यावर माझ्या फॅमिलीची मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुम्ही केलेल्या कंप्लेंट मुळे माझी नौकरी जाईल सर ... ती माझ्या जवळ सरकत म्हणाली..
हे बघ .. तू जे केले त्याची शिक्षा तुला मिळायला हवी नं ? मी फार ताणत आहे हे लक्षात येऊनही मी बोललो
सर मला खरंच माफ करा .. तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे .. पण माझी नौकरी वाचावा ती काकुळतीला येत घुडग्यावर बसत उत्तरली
हे बघ जेनिफर .. बरोबर .. हो जेनिफर ... मला तुझ्या नौकरीमध्ये इंटरेस्ट नाही .. मला जे माझ्या झालेल्या अपमानाची परतफेड हवी आहे , तू मी म्हणेल ते करायला तयार असशील तर मी पण तुझ्या कंपनीला सांगून माझी तक्रार परत घेईल .. मी डील करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन बोललो ..
सर तुम्ही सांगाल ते मी करेल .. तुम्ही काही पण बेकायदा करायला सांगणार नाही माझा विश्वास आहे .. जेनिफर उठून उभी राहिली आणि तिने टिशू ने आपले मस्त्याकार डोळे पुसले ...
ठीक आहे .. मी तिच्या कंपनीला फोने लावत बोललो .. रिंग जात होती .. आणि एका ब्रिटिश लेडी ने फोन उचललाहॅलो सर .. हाऊ कॅन आय हेल्प यू ?
सी आय एम प्रेम सरदेसाई , आय वाज ट्रॅव्हलिंग थ्रू यूर फ्लाईट एस्टरडे अँड रेज्ड वन कंप्लेंट अबाऊट युअर एअरहोस्टेज अँड केबिन क्रू जेनिफर .
येस सर , वि आर इन्वेस्टिगेटिंग इट , वी विल सॅक हर फॉर हर मिसबिहेव्हिन्ग
नो नो .. वेट .. प्लिज
व्हॉट हॅपन्ड सर
प्लिज टेक माय कंप्लेंट बॅक .. मी बोललो
बट देन यु नीड टू पे पेनल्टी फॉर वेस्टिंग अवर टाइम .. ती बोलली
ओके , हाऊ मच ? मी विचारलं
१००० पाउंड , तिने सांगितलं ... हाऊ यू विल पे ?
ऑनलाईन राईट नाऊ .. मी हेक्यात बोललोजेनिफर माझ्याकडे बघत होती , मी १००० पौंड्स पे केले आणि तिला म्हटलं, आता ठीक आहे
ती ओशाळली .. म्हणाली थँक्स .. पण मला काय करावं लागेल ते कळेल का ?
काही नाही ... सांगेल आपल्या डील बद्दल
ठीक आहे , जेनिफर थोडी खिडकी कडे जात म्हणाली आणि ती दारा कडे गेली ... आणि माझ्याकडे बघितलं आणि दार उघडत म्हणाली , ओके मिस्टर सरदेसाई .. थँक्स फॉर ऑल ... तिचा हात तिच्या लॉन्ग शूज कडे गेला आणि माझं लक्ष बाहेर गेलं ... वेळ तीच होती जेंव्हा माझं परत लक्ष तिच्या कडे गेलं माझ्या दिशेने एक बंदुकीतली गोळी येत होती ... सेकंड मला तिच्या हातातली बंदूक दिसली आणि तिने दार लावून बाहेर पडतानाची तिची प्रतिकृती ... मला होश असेपर्यंत समोर संपूर्ण काळोख पसरला होता ... माझ्या अंगातल्या कुठल्या बाजूला दुखतंय हे मला लक्षात येत नव्हतं पण मी सोफ्याच्या बाजूला पडतोय लक्षात येत होतं .. संपूर्ण अंगात वेदनेच्या झिणझिण्या उठल्या होत्या मी बेचैन होत होतो आणि माझ्या हातात आलेल्या एका फुलदाणीला मी गॅलरीच्या काचेवर संपूर्ण ताकत लावून फेकलेलं मला अंधुकसं जाणीव देत होतं ... सर्व संपलंय असं वाटत होतं ...ओठांवर अरुण दातेंच्या गाण्याच्या पंक्ती आल्यात ...
अखरेचे असतील माझ्या तेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या .. केली पण प्रीती ...अखेरचे ...