रात्रीचे ९. वाजलेत .. लंडन हीथ्रो .. वर उतरून बाहेर हिस्थ्रो एक्सप्रेस पकडायला जाताना इथल्या हवेलीत शुद्धता .. आणि लोकांचा हेल्प फुल अँप्रोच मला नेहमीच आवडायचा.. पेडडिन्गटन ला येऊन मी हॉटेल वर आलो .. विमानात झालेल्या प्रकारचा मला मनस्वी राग येत होता.. माझ्या पायावर सांडलेली कॉफी मला त्रास देत होती .. मी असं करायला नको होतं मला वाटलं ..झाली असेल चुक तिची .. काय नाव होतं तिचं ?... जेनिफर !!!! .. हो जेनिफरच .. मी खूप रूड झालोय का ? की गर्विष्ठ झालोय?.. छे !!!! कुठेतरी चुकतोय आपण... सुधारायला हवं स्वतःला...
कसा दिवस सरला कशी रात्र झाली कळलंच नाही .. मस्त सुटलेल्या वाऱ्यातून.... सळसळत्या पानाच्या आवाजातून माझ्या विचाराची दिशा मला कुठे घेऊन जात होती नाही माहित ... त्या एकांत असलेल्या रस्त्यावरून चालत मी हॉटेल ला आलो .. रूम न ५०२१ प्लिज .. माझ्या हातात मी चावी घेतली आणि रूम वर येऊन पडलो .. झोप येत नव्हती कारण त्यावेळेस भारतातील माझी उठायची वेळ झाली होती भारतात पाच वाजले असतील ... लंडन वाॅचवर मी अजून मॅच झालो नव्हतो.... विचारांच्या गर्तेतून मी बाहेर पडणार तेवढ्यात खालून फोन आला ..आणी इरीटेट होवून उचलला....
सर .. आपल्याला भेटायला जेनिफर आली आहे ..
कोण?
सर ती वर्जीन एअरलाईन्स मधून आली आहे ?
पण एवढ्या रात्री?
सर लंडनची सायंकाळ आहे ही .. आताच तर सूर्यास्त झालाय...
अरे पण ...
सर ती सांगतेय कि अर्जंट आहे ..
पण हि मध्यरात्र आहे
हो पण काही अर्जंट आहे बोलतेय .. तो भारतीय रिसेप्शनिस्ट मला लंडन मध्येही मी मुंबईत असल्याचा भास करून देत होता .. आणी मी बिनधास्त मराठी असल्याचा ताव दाखवत होतो...दोन मिनिटातच बेल वाजली आणि लांब लचक .. एक रेड गाऊन मधील तरुणी माझ्या दारावर उभी राहिली ... मी दार उघडलं आणि दोन मिनिट विचारात फसलो हीच का ती ? हो हीच ती पण आता खूप सुंदर दिसतेय ..
मी आत येऊ तिने अदबेने विचारलं ..