हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू जगद्गुरू महासन्निधानम् यांच्या ४५ व्या जयंतीचे औचित्य साधून आदि कैलास नित्यानंद परमशिव देवालयामध्ये आज 'ध्वजारोहण' सोहळ्यास (ध्वज उभारण्याचा सोहळा ) प्रारंभ करण्यात आला.
अवकाशात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी "कैलास "आणि "परमशिवा"च्या चिन्हांनी ध्वज सुशोभित केला होता.
ब्रह्मांडांमधील सर्व लोकांतील प्रत्येक स्वरूपातील देवतांना सोहळयात सहभागी होण्यासाठी थेट आवाहन करता येणार्या वेद-आगम, उपनिषदे आणि श्लोक विशेषतः मेघगर्जनेसमान श्लोक असणाऱ्या 'ब्रह्मांडमंत्रा'सारख्या मंत्रांनी विधी, होम व भव्य दिव्य मिरवणुकीचा सोहळा संपन्न केला गेला.
येथील क्षेत्रामध्ये 'परमशिवां'च्या चैतन्याच्या प्रभावी अवतरणासहीत 'नित्यानंदोत्सवा'चा प्रथम दिन आपण या 'ध्वजारोहण' सोहळ्यातून अधिकृतरीत्या स्थापित केला.
पृथ्वीतलावर सर्वत्र स्थापन करण्यात आलेल्या "कैलासां" मधून, सहा महाद्वीपांतील शंभर पेक्षा जास्त देशांमधील अब्जावधी भक्तगणांची ह्रदये ह्या सोहळ्याच्या मांगल्याने भरून गेली आहेत.
विगत आत्म्यांच्या कर्मशुद्धीकरिता या पौर्णिमा तिथीला 'माहेश्वर पूजे'चेही आयोजन करण्यात आले आहे.
चला तर, आपण ही ह्रदयापासून या छायाचित्रदर्शनाचा आनंद घेऊयात.
आगमातील विधी असो, देवतांचा अलंकार विधी असो, आदिशैवांची विशिष्ट वस्त्रप्रावरणे असोत अथवा भक्तांच्या चेहर्यांवरील चमकणारा आनंद असो ,त्यांच्या सहाय्याने या वैश्विक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी परमशिवत्वाच्या अवस्थेप्रत आपल्याला नेऊयात.
https://www.facebook.com/ParamahamsaNithyananda/posts/469531647873005
#Kailasa #Nithyananda
YOU ARE READING
'ध्वजारोहण सोहळा '
Spiritualहिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू जगद्गुरू महासन्निधानम् यांच्या ४५ व्या जयंतीचे औचित्य साधून आदि कैलास नित्यानंद परमशिव देवालयामध्ये आज 'ध्वजारोहण' सोहळ्यास (ध्वज उभारण्याचा सोहळा ) प्रारंभ करण्यात आला. अवकाशात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण व्ह...