कनेक्शन -1

2.2K 5 0
                                    

ट्रिंग ट्रिंग ... फोन खणखणला तशी माझ्या डोळ्यावरची झोप उडाली .. घड्याळात बघितले रात्रीचे २ वाजले होते .. मी फोन च्या कॉलर आयडी वर बघितलं बॉस चा फोन होता .. मनात दहा शिव्या देत पण एकही मिनिट ना लावता मी तो फोन उचलला ... च्यायला टॉवेल सुटला तरी चालेल पण फोन सुटायला नको .. मी मनात स्वतःला म्हटलं ... एकटा राहणार बॅचलर माणूस ... बर्मुडा काय नि टॉवेल काय .. आपल्याला बघणार कोण आहे ?? चार भिंती !!!!!

हा सर ..

शब्द .. एक काम कर आता मला तुझा तो प्रॉडक्शन रिपोर्ट पाठव ..

हो पण आता ...

हो मला आता हवाय काही मेजर डिसिझन घ्यायचेत

पण मला बघू द्या .. सायबर कॅफे चालू असायला हवं ना ?

जा नसेल चालू, तर त्याला चालू करायला लाव ...

बरं .. मी रागातच बोललो .. पायात चप्पल सरकवली आणि निघालो ... खाली उतरलो बाजूच्या टपरीच्या दारातून लाईट जाणवला म्हणून त्याला मी ५० ची नोट सरकवली आणि नेव्ही कट चा पॅकेट घेतला .. दोन झुरके मारले आणि रागातच रस्त्यावर संपूर्ण जोराने ती सिगरेट फेकली .. हरामखोर साला रात्री २ वाजता कामाला लावतो ... मी फेकलेल्या सिगारेट ने थोड्या दूर फुलझडी सारखी अग्निरेषा ओढत समोरच्या नालीत जाऊन आत्महत्या केली ....

मी दारात पोहचताच ओरडलो काय नेणेसाहेब चालू आहे न कॅफे ... कि बंद पडला .. म्हणजे केला ?

तुला काम करायचं आहे कि नाही ... आणि काय रे तुला रात्री मला जायच्या वेळेस का काम सुचतात .. बरं घे आता संपव लवकर ...

मी कॅफेत घुसलो एका कॉम्पुटर वर बसून त्या सामसूम कॅफेतून नजर फिरवली .. सर्व छपरी बॉयस घरी गेले होते .. मी पटापट रिपोर्ट टाकला .. आता बॉसला विचारणार कसं ? मी कॅफेतून फोन केला .. बॉस मिळाला का रिपोर्ट

नाही ... पाठवा लवकर

मी म्हटलं हॉटमेल वरून काही जात नाही आहे ... मग मी याहू ओपन केलं .. याहू ने आपल्या दोन तीन सपोर्टींग साईट ओपन केल्या आणि ते ई-मेल आणि मॅसेंजर वर स्थिरस्थावर झालं .. मी आपला रिपोर्ट पाठवला आणि पुन्हा फोन केला ... मिळाला का ?

कनेक्शन Where stories live. Discover now