ऋणानुबंध

596 6 0
                                    

मधुरा ..  वाळूवरून चालत  होती. तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणी समुद्रात भिजत  होत्या .. तिने आवाज दिला  

शैली .. सुखदा .. या ना वाळूत फिरुयात छान ... .. 

नाही तूच ये आपण समुद्रात मस्ती करूयात छान  ..  

वाळूच्या आवरणातून जाताना तिच्या अनवाणी  पायाला गुदगुल्या होत होत्या .. तिने दोघींकडे बघितलं आणि ती पण समुद्राकडे वळली .. ती धावत समुद्रात गेली आणि एक लाट तेवढ्याच आवेगाने  धावत तिच्या कडे आली .. आवेग धावण्याचा कि भेटीचा कुणास ठाऊक ?.. पण ती भेट एवढी जबरदस्त होती कि लाट आणि मधुरा एकत्र  मिसळल्या जसं एखाद्या प्रियकराने  प्रेयसीला  आलिंगन द्यावं एकदम तसं .. ती नखशिखांत भिजली होती .. आणि  ते खारं  पाणी तिच्या रेशमी अंगाप्रत्यंगावरून निथळत होतं .. बाहेरून कुणी बघितलं तर भिजलेले कपडे दिसतील पण आत तिच्या अंगावरून निथळणारा पाण्याचा थेम्ब फक्त स्वतः भिजत आणि लाजत  होता .. तिने शैली आणि सुखदा च्या अंगावर  पाणी उडवायला सुरुवात केली .. आणि त्यांना पण नखशिखांत भिजवलं ..  भिजल्याच होत्या .. तरी पण .. तिघींची पण दिलखुलास  मस्ती सुरु झाली ..

उधाणलेला समुद्र त्यात नुकताच संपलेला पावसाळा .. अलिबाग चा निर्मळ समुद्रकिनारा .. कुणाला नाही बोलावत होता .. हो  तो ह्या तिघींना पण  बोलावत होता .. नेहमी प्लॅन व्हायचा पण संसार आडवा यायचा .. कुठे कुणाला काही तर कुठे कुणाला काही .. पण आजचा दिवस  उजाडला आणि सर्व सांसारिक सुखदुःख बाजूला ठेवून त्या एकत्र आल्या .. 

समुद्राला   भरती आली होती .. तश्या तिघी पण बाहेर निघाल्या ..  त्या त्यांच्या रिसॉर्ट वर जाणार होत्या आणि मग तिथे जेवण आणि पुन्हा तिथे मस्ती .. प्लॅन तर मस्त होता .. 

अरे यार हे काय माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे पडलं ?.. मधुरा त्या  दोघीना आपला गळा चाचपत म्हणाली .. 

जाऊ दे ग .. असेल कुठे तरी 

ये नाही ग...  मंगळसूत्र आहे ते माझं ..माझ्या  नवऱ्याची निशाणी ..  

Has llegado al final de las partes publicadas.

⏰ Última actualización: Jul 06, 2022 ⏰

¡Añade esta historia a tu biblioteca para recibir notificaciones sobre nuevas partes!

ऋणानुबंध Donde viven las historias. Descúbrelo ahora