सिगरेट ...

888 7 4
                                    

काय साला कटकट आहे , जेव्हा बघतीले तेंव्हा घरी हे नाही तर घरी ते नाही . हिला लग्न करण्या अगोदर नव्हते का माहित मी एक सामान्य व्यक्ती आहे . माझ्या कडे काही इतकी धन संपत्ती नाही आहे . मी मनात खूप साऱ्या विचारांचे वादळ घेऊन मी नेहमी जेथे बसतो तिथे आलो . इतके काय तर स्वतःला संपवण्याचे विचार माझ्या डोक्यात येत होते .
नेहमी तेच तेच तेच.....

हि जागा मला संकेत ने दाखवली होती . तो दिवस आणि आजचा मला या सुसाईड पॉइंट बरोबर एकतर्फी प्रेम झाले आहे . हो या जागेचे नाव सुसाईड पॉइंट आहे कारण तर एक तर येथून दरी ही फार तर १०० मीटर असेल . ती सुद्धा इतकी खोल आहे की कुणी पडले तर दोन ते तीन दिवस त्यांचं प्रेत सुद्धा मिळतं नाही . मागे कुन्या एका श्रीमंताच्या मुलाने आत्महत्या केली होती म्हणे तर त्याचे प्रेत हे तब्बल पाच दिवसांनी मिळाले होते . मात्र सुसाईड पॉइंट हे फक्त आत्महत्या करणाऱ्या करिता नाही तर आपल्या सोंदर्या करिता सुद्धा प्रसिद्ध आहे . सायंकाळी सूर्य अस्ताला होत असलेलं ते मनमोहक दृष तर मला खूप आवडते . ते बघण्या साठी तर मी नेहमी ऑफिस मधे आपले काम अर्ध्या तास अगोदर बाहेर पडत असतो .


आज मात्र थोड वेगळं होतं आज रविवार झोपेतून उशिरा उठलो . म्हणजे नेहमी सात वाजता उठणे आणि आपल्या नित्य क्रम करून नऊ ते पाच त्या चक्र मधे प्रवेश करणे . नाष्टा केला आणि बाहेर बसलो तेवढ्यात बाजूच्या पवार वाहिनी आल्या आणि हिच्या बरोबर गप्पा मारत बसल्या . साधरण अर्धा तास त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि त्या गेल्या . मी जेवण मध्ये काय करणार आहे हे बघायला आत जाऊन बघितलं . तर ही काही तरी पुटपुटत असलेली मला दिसली . काय मेले माझे नशीब आहे , गेल्या तीन वर्षात साधा एक सोनाच्या दागिना घेतला नाही . अन ती पवार बाई तीन महिन्या मधून एकदा काही तरी नवीन घेते आणि मला दाखवते . माझे मन नसेल होत का कधी काही घेण्या करिता. मी हीच बोलण ऐकले आणि परत बाहेर येऊन बसलो . मला ऐकू यावे म्हणुन हिने आणखी जोरात आपली गाडी सुरू केली . लग्न झाले तेव्हा बाबा नी हुंड्यात जेव्हढे दिले होते तेच आहे बाकी कुणाची काही अवकात आहे का काही घेऊन देतील . मी काही प्रतिऊतर देत नाही आहे , हे बघून ती बाहेर आली . मी फक्तं जमिनी कडे एकटक बघत होतो . काय बोलाल आता की नेहमी प्रमाणे बाहेर जाल . मी काही न बोलता बाहेर पडलो .

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Nov 22, 2022 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

सिगरेट Where stories live. Discover now