दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण 2

48 0 0
                                    

दॅट्स ऑल युअर ऑनर

(प्रकरण दोन)

तपन लुल्लाने अंदाज केल्या प्रमाणे दुसरा दिवस स्वच्छ सूर्य प्रकाशाचा होता. पाऊस पूर्ण पणे थांबला होता.आकृती सेनगुप्ता ने तिची गाडी दुरुस्त करायला माणूस आणला होता. त्याने गाडीचा डिस्ट्रिब्यूटर बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू केली होती. त्या दिवशी आपले काम ती कृत्रिम पणे करत राहिली. तपन हा एक वाया गेलेला मुलगा होता आणि त्याला धडा शिकवायचाच असा तिने निश्चय केला होता.भले तिला तिची नोकरी गमवावी लागली तरी बेहत्तर. तिने त्याच्या विरूध्द दावा ठोकला असता तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता असे तिला वाटून गेले.कारण त्यांनी तिची माहिती गुप्त हेरांकडून मिळवली असती, ती कुठल्या पुरुष बरोबर कधी , कुठे गेली, सगळ सगळ त्यांनी शोधून काढल असत, तिच चारित्र्य बदनाम केले असते. पण असाच विचार करून त्याला बळी पडलेल्या इतर मुली घाबरून काहीच करत नसतील म्हणूनच अशा लांडग्याचे फावत असेल. ते काही नाही त्याला सजा मिळालीच पाहिजे. आणि एका विविक्षित क्षणी तिने अंतिम निर्णय घेतला. पाणिनी पटवर्धन ला भेटायचे !

तिने त्याच्या ऑफिस चा नंबर लावला.ती पाणिनी पटवर्धन ची सेक्रेटरी, सौम्या सोहोनी शी जोडली गेली. तिने आपली ओळख करून दिली आणि पाणिनी पटवर्धन ना सायंकाळी भेटायचे आहे म्हणून सांगितले.सौम्या ने पाणिनी पटवर्धन शी बोलून दुपारी अडीच ला येणे शक्य आहे का असे विचारले. ‘‘ मी जमवते.‘‘ आकृती तिला म्हणाली.

पाणिनी पटवर्धन ने भेटायला मान्यता दिली या जाणिवेनेच तिच्या मनावरचे निम्मे ओझे उतरले. दुपारी दीड वाजता तिच्या ऑफिस मध्ये बरीच खळबळ चालू झाल्याचे तिच्या लक्षात आले.नमनलुल्ला म्हणजे मालक, तपन चा बाप काहीतरी अघटीत घडल्या सारखा चेहरा करून इकडून तिकडे फिरत होता.दुसरा उपाध्यक्ष लुल्ला च्या मागे मागे करत होता.तपन मात्र ऑफिस ला आलेला दिसत नव्हता.

आकृती तिच्या साहेबांकडे गेली. ‘‘ मला आज दुपारी एक तास बाहेर जाऊन यायचं.खूप महत्वाच काम आहे. काल मी जादा वेळ थांबून सर्व काम पूर्ण करूनच गेले घरी. त्याचा कोणताही जादा पगार मी मागितलेला नाही. सवलत देता येत नसेल तर अर्धा दिवस रजा द्या.‘‘ एका दमात तिने सांगून टाकले.

 दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण १)Onde histórias criam vida. Descubra agora