मिसेस दारूवाला...

348 5 0
                                    

इतक्या प्रचंड काळोखात अमिता एकटीच घरी जात होती . घर येण्या करिता साधरण दीड एक किलोमीटर बाकी होते . त्यात भर म्हणजे आज अमावस्या होती . तरी सुद्धा घरून निघताना आई ने तिला हटकले होते , बाळा थोडं लवकर परत येशील ऑफीस मधून आज अमावस्या आहे . तिने तेंव्हा तर त्यावर काही प्रतिक्रिया नव्हती दिली मात्र आता राहून राहून आई ने वापरलेले शब्द तिला काही चैन पडू देत नव्हते . त्यात भर म्हणजे तिचा फोन सुद्धा चार्जिंग नसल्या मुळे बंद पडला होता . ते तरी बर होत की स्मार्ट वॉच हातात होत तर थोड बरे होते . असेच विचार करताना तिने आपल्या मनगटातील घडयाळ कडे बघितले तर अकरा वाजत आले होते .

ऑफीस मधून तर सुट्टी ही साधरण आठ वाजता झाली होती मात्र आज शताक्षी मॅडम यांचा वाढदिवस होता आणि त्यांनी सर्वांना बाहेर जेवणाची पार्टी दिली होती . शेवटी सिनियर मॅडम असल्या मुळे अमिता ला त्यांना नाही म्हणणे नाही जमले . प्रोग्राम आटोपला तेंव्हा दहा वाजत आले होते . निघताना शेवटी सारनाथ ने मला विचारलं सुद्धा होत की मी सोडून देऊ का ???
माझाच ईग्गो मध्ये आला आणि मी नाही म्हंटले . मला वाटलं की सोनवाने काका हे बसस्टॉप रात्री राहतं असतात तर ते मला सोडून देतील . मी फक्तं त्यांना तेवढा तो फोन करणे विसरले आणि बहुदा तिथेच मी चूकले .

मी आपली पावले जलद गतीनं टाकत होते . मी राहून राहून आपल्या वॉच मधे वेळ सुद्धा बघत होते , काय मेल त्या शतकाशी ला आज नाहीं दिली असती पार्टी तर काय बिघडलं असतं . मनात आणखी एक दोन छान शिव्या देऊन , मी चालत होते आणि अचानक मला एक लहान मूल रडत असल्याचा आवाज आला .
मी थोड थांबून आवाज कुठून येतं आहे , याचा प्रयत्न करू लागले . तो आवाज मला बंद पडलेल्या त्या मिसेस दारूवाला यांच्या घरातून येत असल्याचं जाणवलं .

मी लहान असताना त्यांच्या घरी नेहमी खेळायला जात असायचे कारण एक तर त्या एकट्या राहतं असतं फक्तं एक मोलकरीण .
त्या मनाने खूप प्रेमळ होत्या मी आणि माझ्या दोन तीन मैत्रिणी या सुट्टीच्या दिवशी तर नक्कीच त्यांच्या घरी जात असायचो . त्या एक खूप उत्तम शेफ होत्या . ते नेहमी आमच्या करिता काही ना काही नवीन बनवत असतं . जसे की कधी कपकेक , पुडींग , केक आणि सँडविच असे बरच काही . त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होत कारण काही सुद्धा नवीन पदार्थ रहायचे तर ते मला माझ्या दोन मैत्रिणी पेक्ष्या नेहमी थोड जास्त मिळत असायचं . मी कधीच या गोष्टी कडे लक्ष्य देत नसायचे की त्या अश्या का वागत असत . मात्र वैष्णवी आणि श्रद्धा आणि मी घरी परत येत असताना मला टोमणे मारत असत . खरं सांगायचं झाले तर आमचे वय हे तेव्हा साधरण ९ ते १० वर्षे असणारं . त्यामुळे मी त्या गोष्टी कडे इतके काही लक्ष नाही द्यायचे . आई आणि बाबा सुद्धा मला कधी रागवत नसतं की तू त्यांच्या कडे जायचं नाही , त्यामुळे शनिवार आणि रविवारी तर पूर्ण दिवस माझा मुक्काम त्यांचे कडे ठरलेला असायचा .

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: May 30, 2023 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मिसेस दारूवाला...Where stories live. Discover now