“नसेल इच्छा एकत्र राहण्याची, नसेल मन रमत तर बोला ना सरळ सरळ ” अंकिताचा आवाज अधिकच तीव्र होत होता.
“ वाट्टेल ते बरळू नकोस, काय चांगले आणि काय वाईट हे कळत मला ” विजयलाही राग चढत होता ...
त्याला कारणच तसे होते विजय हा अंकीताचा पती. त्यांच्या लग्नाला नुकतीच २ वर्षे झाली. अंकिताचे बी. कॉम पर्यंतचे शिक्षण झालेले आणि सध्या गृहिणी असणारी ! विजय हा एका टुरिस्ट कंपनीत टेक्निकल विभागात काम करणारा . तसे दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते पण तरीही इतक्या कालावधीनंतर दोघांमध्ये सहवासाचे नाते फुलले नव्हते. उलट दोघेही परस्परविरोधीच होते म्हणा ना !
खरेतर प्रथम अंकिता लग्नापूर्वी या नात्याबद्दल खूप आश्वासक होती पण विजयच्या वागणुकीमुळे तिचा हिरमोड झाला होता. तरीही ती आपल्या परीने सर्व ते प्रयत्न करत होती. पण समोरून येणाऱ्या प्रतिक्रियाच थंड पडली होती, त्याला ती तरी काय करणार !!
संसारातील इतर गोष्टींबरोबरच शरिरसुखाचीही कमतरता यामुळेच त्यांच्या जीवनात होती. अंकिता कितीही याबाबत आग्रही असली स्वतःहून पुढाकार घेत असली तरी विजय याबाबत उत्सुक नसायचा. त्यामुळे जरी संबंध आला तरी तो अंकिताच्या मनासारखा व्हायचा नाही,
याला कारण होते विजय च्या मनात असणाऱ्या कल्पना ! खर तर शहरी भागात राहिल्या असल्याने व त्याच्या संपर्कातील स्त्रियांमुळे त्याला शारीरिक संबंधांविषयीची वेगळीच कल्पना होती. जी अंकिता कडून त्यास मिळतच नव्हती आणि तसेही दोघांमधील नाते चांगले नसल्याने आपसूकच याविषयी बोलणे होतच नव्हते. विजय ला अंकितापेक्षा त्याच्या डिपार्टमेंट मधल्या साक्षी मध्ये खूप रस होता.
अंकिता खरतर एवढी दिसायला गोरीपान नसली तरीही सुंदर होती. तिच्या शरीराची ठेवण मात्र खूपच आकर्षक होती. लांबसडक केस, लक्षवेधी डोळे, जास्वंदीसारखे ओठ, नाजूक मान, कमनीय बांधा, वक्ष जास्त मोठेही नव्हते आणि छोटेही अगदी मध्यम आकाराचे, कंबरेचा बाक तर वेड लावणारा असायचा. योगा, व्यायाम या गोष्टी रोज चालल्या असल्याने तर ती उत्कृष्ठ झाली होती. ती जेव्हा साडी नेसायची तेव्हा तर ती एक आकर्षक यौवना वाटायची पण तिचे अलंकार तिच्या मर्यादा स्पष्ट करायचे. पण विजयला काही यात इंटरेस्ट नव्हता त्यामुळे असून नसल्यासारखे तो वागायचा ..