भाग ३

2.2K 9 6
                                    

रडता रडता तिच्या छातीत दुखू लागलं . कुणीतरी हातोड्याने छातीत खेळा ठोकत आहे इतक्या प्रचंड वेदना तिला होऊ लागल्या . मग अचानक पोटात उचमळू लागलं .  उलटी होते की काय असं वाटू लागलं . तिच्या मनाला झालेल्या वेदनांचा परिणाम शरीरावर होत होता . तिला श्वास घ्यायला जड जाऊ लागलं .  छाती धपापू लागली .

एका बाजूने तिला स्वतःचा , स्वतःच्या नवऱ्याचा राग येत होता . पण दुसऱ्या बाजूने अपमानित झाल्याची भावनाही तिला तितकीच टोचत होती . अभयला तिच्यापेक्षा तिची मैत्रिण आवडत होती . प्रत्यक्षात ती समोर असुनही तो फोटोतील श्रेयाला पाहत हस्तमैथुन करत होता , यापेक्षा अपमानास्पद गोष्ट काय असु शकेल ?

अभय आणि प्रियंका मध्ये भरपूर बोलणं व्हायचं . ते एकमेकांशी गप्पा मारायचे पण ते बोलणं म्हणावं तितकं मोकळं नव्हतं .  त्यात बऱ्याच गोष्टी दोघांनीही एकमेकांना सांगितल्या नव्हत्या . त्यामुळे दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यात अशा काही गोष्टी होत्या , अशी काही रहस्ये होती जी फक्त त्यांची त्यांनाच ठाऊक होती . प्रियंकाची रहस्ये फारशी नव्हती . लग्ना अगोदर तिचा स्वयंम नावाचा बॉयफ्रेंड होता हे एकच मोठे रहस्य तिने अभय पासून लपवलं होतं . त्यामुळेच की काय तिने अभयलाही कधी त्याच्या भूतकाळाबद्दल विचारलं ‌नव्हतं .  तिला ते जाणुन घ्यायचंच नव्हतं . कधीकधी अज्ञानातच सुख असतं .

मात्र आता अशा विचित्र पद्धतीने अभयची एक अत्यंत खाजगी गोष्ट तिच्या समोर आली आणि तिला ती अजिबात आवडली नाही .  ती खाजगी गोष्ट तिच्या संबंधित होती , तिला टाळून तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीला पाहून हस्तमैथुन करत होता या गोष्टीचा तिला प्रचंड राग आला होता . प्रियंकाचा स्वभाव संशयी नव्हता . त्यांच्यात भांडणे व्हायची पण भांडणाचं कारण संशय कधीच नसायचा .  आता तिने जे काही पाहिलं होतं त्यामुळे भूतकाळातील अभयाच्या सर्व कृती ती संशयाच्या नजरेखाली पाहू लागली .

त्याने एक वेळ पॉर्न पाहून हस्तमैथुन केलं असतं तरी तिला ती गोष्ट पचली असती . ती गोष्ट तिने नजरेआड केली असती . मात्र श्रेया ही तिची जिवलग मैत्रीण होती . तिच्या मुळेच ती पुन्हा एकदा स्वतःमध्ये बदल करून स्वतःच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाकडे सरकू लागली होती .  त्याच मैत्रिणीच्या फोटोकडे पाहत अभय ते किळसवाणं कृत्य करत होता . जणुकाही तिच्या पवित्र वाटेवर त्याने स्वतःचा घाणरेडा स्पर्श केला होता .

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Oct 14, 2023 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

थ्रीसम Where stories live. Discover now