सौंदर्य

295 1 0
                                    


एका कुंडीत एक रोपटं आहे. हिरव्याकंच पानांचं. त्यावर शोभून दिसणाऱ्या लाल रेषा. जणू रक्तवाहिन्याच, पण भीती वाटण्याऐवजी मन मोहून टाकणाऱ्या. पानांचं देठ म्हणजेच त्या रोपट्याच खोड. ते मोठं नाजूक पण त्या रोपट्याचा आधार. या रोपट्याला पाण्याचा मोठा तिटकारा. त्या पानांवर पाणी पडलं की ते रोपटं त्रासिक चेहरा करत असे पण त्या पानांवरून पाणी आपोआप घरंगळुन जात असे.

त्या रोपट्याला रोज सकाळी आई पाणी टाकते. भिंतीच्या आडोशाला ती कुंडी ठेवली आहे. चंद्रपूर ला ऊन खूप त्रासदायक असते पण तिथे त्या रोपट्यावर सरळ ऊन पडत नाही. अन्न तयार करण्यासाठी मात्र प्रकाश मुबलक मिळतो. काळ्याशार पोषक मातीत हिरव्या-लाल पानांचं नाजूक देठ असलेलं रोपटं सौम्य वारा आला की मोठ्या डौलात हलत-डुलत असे. हे सगळं दृश्य मोठं सुंदर असे.

त्या रोपट्याचे दिवस मजेत जात होते. सोबत इतर कुंड्यांतील रोपटी, कधी मध्येच एखादं फुलपाखरू जवळून उडून जात असे. कधी कधी कोणी त्याचे फोटो काढून नेत असे. (जसा मी) ना कसली रोगराई, ना किड्यामुंग्यांचा त्रास, ना उन्मळून पाडेल असा वारा, ना जाळून टाकेल असं ऊन ना ही असह्य जोरदार पावसाचा मार.

ह्या सौंदर्याला आता नख लागणार होतं. दुसरा सुंदर जीव त्यासाठी तयार होता.

पावसाळा सुरू आहे. नुकताच पाऊस पडून गेला. सौम्य ऊन पडलं होतं. तितक्यात एक अळी लुटुपुटू चालत येत होती. तिला पाहून ते रोपटं ओरडलं 'सुंदर!' काळा रंग त्यावर पांढरे शेंदरी ठिपके, छोटे छोटे पाय आणि मोठाले डोळे. वाहs काय सुंदर चाल आहे या अळीची! ते रोपटं तिच्या सुंदरतेने मोहून गेलं होतं.

ती अळी हळूहळू त्या तिच्याच खास ढंगात चालत होती. चालताना ती पाहिले तीचे मागचे पाय जवळ घ्यायची तेव्हा ती वीज वहन करणाऱ्या तारांचे रेसिस्टन्स मोजायला वापरणाऱ्या एकाकासारखी दिसायची (ohm). मग ती समोरचे पाय पुढे सरकवून पुढे जात होती. 

या अळीला जायचं कुठे होतं पण? तिच्याकडे बघून काही अंदाज बांधता येत नव्हता. थोडं सरळ जायची, मध्येच डाव्या बाजूला वळायची, पुन्हा सरळ जायची तर मध्येच थांबायची. थोडं थांबून शरीराचा समोरचा अर्धा भाग उचलून इकडे तिकडे बघायची आणि पून्हा चालायला लागायची. थोडं निरीक्षण केल्यावर ती त्या कुंडीकडेच जात आहे असं समजलं.

सौंदर्य. Beauty.Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang