'मी देवावर नाही नशिबावर विश्वास ठेवतो'
-एक बेवडाएक बेवडा होता. त्याले ज्ञानप्रसाराची खूप आवड होती, म्हणजे काय ते समजून घ्या आता. एकदा असाच नेहमीच्या कट्ट्यावर तो बसला होता, एक पॅक घेऊन. तेवढ्यात एक दोन लोक त्याच्याजवळ येऊन बसले. विषय निघाला. निघून निघून काय निघणार तर राजकारण. आपल्या बाबुचा आवडता विषय. त्यातला एक व्यक्ती तावातावाने फडणवीस कसा चतुर आहे, त्याने कसं सगळ्यांना कंट्रोल मध्ये ठेवलं आहे ते सांगत होता. तसेच शिवाजी महाराजांचा जो काही अपमान सुरू आहे त्याविषयीही मोठ्याने सांगत होता. निषेध करत होता. नेहमी त्यांच्या नावाने मत मागणारे आता कुठं लपले म्हणून बोंबलत होता.
हे ऐकून आपल्या बापुड्याले चेव फुटला. तो मागं रायते का? वेदापासून त सांविधानापर्यंत सगळंच ज्ञान त्याले आहे, असं त्यालेच वाटे. हळूच नेहमीच्या अड्ड्यावर जाऊन आणखी एक पॅक घेतला. त्यानं विचार केला का आता मस्त जाऊन गोष्टी झोडतो. पटपट चालत तिथं आला. पायते त तिथं कोणी नव्हतं. मोठ्यानं गोष्टी करणारा घरी जात होता आणि दुसरा घरी पोहोचलाही होता.
बापुले समजे नाही का कराव. इतका मूड बनवून आला अन हे लमचे गायब झाले. एका पॅक चे पैसे ही गेले अन् मूड ची पण वाट लागली.
बाजूच्या मारोतीले पाया लागून तसाच नशिबाले शिव्या देत तो पण घरी जा ले लागला.