नेहमी प्रमाणे तोच दिवस तीच रात्र, कधी चांगला दिवस येईल अशी अपेक्षा तीनी कधीच ठेवली नव्हती, अदिती हि एक अशी मुलगी होती जिच्या आयुष्यात कधीच सुख, आनंद राहायचे दिवसचं नाही आले. नेहमी तिच्या आयुष्यात दुःख, रडणं आणि समजून घेणं हेच होत राहायचं. तृप्ती म्हणजे अदितीची खूप जवळची बाल मैत्रीण त्या दोघींचं खूप जमायचं, ती सगळ शेअर करायची कधी दोघींनी भांडण नव्हती केली तिसऱ्या व्यक्तीमुळे, ना कधीच पैसे वरून कधीचं त्यांची मैत्री नव्हती.
आज तो दिवस आला होता जेव्हा दोघी कामाला जायला लागल्या होत्या अदिती ऑफिस मध्ये कामाला लागली होती आणि तृप्ती साध्या कंपनीत लागली होती, कारण तृप्तीचे शिक्षण तर झाले होते पण कॉम्प्युटर कोर्स नव्हते झाले, त्यामुळे ती कंपनी मध्ये काम करायला लागली होती. दिवस जस जशे पुढे जात होते तस तसे अदितीच्या आयुष्यामध्ये खूप खराब दिवस येत चाले होते, दोन, तीन महिन्यानंतर अदितीच्या ऑफिसमध्ये एका माणसांनी कंप्लेंट केली अदितीची ते ही तिची चूक नसताना, सांगितलं गेलं की ह्या नीट काम नाही करत फोनवर बोलत बसतात आणि सरांनी ते ऐकून आदितीला कामावरून काढून टाकले, खरं सत्य तर हे होते की त्या माणसांनी दोन, तीन दिवस चुकीची काम केली होती, तेव्हा अदिती त्या माणसाला ओरडली होती त्याचा राग घेवून सरांन समोर कंप्लेंट केली, आणि ते सर त्या माणसांवर ज्यास्त विश्वास ठेवत होते. अदितीने विचारलं देखील तिच्या सराला माझी काय चूक होती, मी कुठे चुकली होती, सर बोले तिला की “माझ्या माणसांवर ज्यास्ट विश्वास आहे ते खोटं तर नाही बोलणार माझ्याशी ते कामगार माझ्यासोबत खूप पाहिले पासून काम करत आहेत”, आणि हे ऐकून अदिती खूप खचून गेली होती, त्यात तिनी तिच्या प्रियकराला मेसेज केला की “मला कामावरुन काढून टाकले मला खूप वाईट वाटत आहे”, प्रियकराने तिची साथ द्यायची सोडून तिला बोला की “तूच काहीतरी चुकी केली अशील म्हणून काढले” आणि हे बोलून तिचा प्रियकर सोडून गेला तिला कायमचा, हे बगून ती खूपच खचून गेली होती, ती त्या रात्री तेच प्रियकरा सोबतचे आठवणी आठवायला लागली आणि रडायला लागली, त्याच्या फोनमध्ये बॅलन्स नसताना त्याला आदिती दर महिने रिचार्ज करून द्यायची, तो फिरायला गेला हॉटेल मध्ये जेवायला गेला त्याचे पैसे अदिती कडून घ्यायचा, कपडे घ्यायला ह्या सगळ्या गर्जांनसाठी पैसे घेणं आणि त्याच्यासाठी अदितीने इतकं करून तिलाच दुःखी करणं, तिला टाईम न देणं, हे आठवून ती खूप रडत होती, अदिती नेहमी बोलायची त्याला की “तुला काय पाहिजे ते फक्त माग माझ्याकडे मी सागल देईल आणून पण तू सोडून नको जावू, मला टाईम दे प्रेम कर फक्त माझ्याकडे लक्ष दे”, पण त्यांनी हे कधीच नाही लक्षात घेतलं, अदितीने त्याच्याकडे खूप भिक मागितली होती सोडून नको जयायची आणि टाईम द्यावा म्हणून, पण अदितीचं हे प्रेम खरं नव्हत अस वाटायला लागले तिला आदितीने नशिबाला दोष देणं सुरू केलं कारणं तिला वाटायचं की तिच्यावर कोणी खरं प्रेम नाही करू शकत, अदिती जेव्हा दुसऱ्या जोडीदारांना बघायची तेव्हा तिला खूप वाईट वाटायचं विचार करायची की तिला का असा मुलगा नाही भेटला, फक्त रडवणार भेटला, ती बोलायची “मी काय मागितलं होत त्याच्याकडे जे मला सोडून गेला, ते पण फक्त माझे काम सुटले म्हणून”, हा विचार करून तिला अजुन त्रास होवायचा, तेव्हाच अदितीने तृप्तीला फोन केला तिला सांगितले माझ्यासोबत असे झाले आहे, हे ऐकून तृप्ती अदितीला सांभाळत होती, शांत करत होती, समजावत होती, पण अदिती खूपच खचून गेली होती, दिवस रात्र रडून रडून तिनी हालत खराब केली होती, काय करू तिला सुचत नव्हते, एक एक दिवस तिचा खूप कठीण होत चालला होता, आणि तिने ठरवलं होत की आता प्रेमात नाही पडणार म्हणून आणि सगळ शांत झालंच होतं, अदिती हळू हळू ह्या सगळ्यातून बाहेर येत होती.
VOUS LISEZ
खोटे प्रेम
Mystère / Thrillerनेहमी प्रमाणे तोच दिवस तीच रात्र, कधी चांगला दिवस येईल अशी अपेक्षा तीनी कधीच ठेवली नव्हती, अदिती हि एक अशी मुलगी होती जिच्या आयुष्यात कधीच सुख, आनंद राहायचे दिवसचं नाही आले. नेहमी तिच्या आयुष्यात...