ब्रम्हचारी बाप 🌺 (1)

1.5K 6 0
                                    

माझं नुकतच लग्न झालं. मला अत्यंत सुस्वरूप पत्नी मिळाली. राणी तिचं नांव. माझा नव्या नवलाईचा संसार बहरत असताना एका प्रणयाच्या रात्री माझ्या राणीने विचारले,

'राजन, मी आज माझ्या मैत्रीणीकडे बाजूच्या मोहल्ल्यात गेली होती. तेथे तिच्या मुलीच्या सोबत बाजूची एक लहानशी मुलगी खेळत होती. ती अगदी तुमच्या चेहर्‍यासारखी सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे सारखी निरखून पाहत असताना माझी मैत्रीण मला म्हणाली.

"अग, ही तुझ्याच नवर्‍यापासून झालेली मुलगी आहे... म्हणजे अशी चर्चा आहे. खरं काय नि खोटं काय ते देवालाच माहीती..."

तिचं हे बोलणं ऐकून मी चक्रावूनच गेली. हे कसं शक्य आहे? मी दिवसभर सारखा तोच विचार करीत आहे. तुम्हाला पहिली बायको तर नव्हती ना किवा तुमचं कुणाशी काही प्रेमप्रकरण तर नव्हतं ना... या शंका-कुशंकांनी माझं मन अस्वस्थ झालं.

"नाही ग राणी, तसं काही नाही. पण एक घटना मात्र घडून गेली. मी त्यात कसा गोवला गेलो, ते मात्र मला कळलंच नाही." एक उसासा टाकून मी बोललो.

"काय घडलं सांगा ना... मला उत्सुकता लागली आहे." राणी म्हणाली.

"सांगतो ना... काय झाले ते..."

मग त्या प्रसंगाच्या आठवणींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर सरकू लागला.

मला कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. मी नोकरीवर हजर होण्यासाठी या शहरात आलो. राहण्यासाठी भाड्याचं घर पाहिलं. अनायसे एक रुम-किचन असलेली खोली मला भाड्याने मिळाली.

घरमालक दुसर्‍या जवळच्या शहरात नोकरीला होता. तो रोज जाणे-येणे करायचा. सकाळी आठ वाजता जायचा व रात्री आठ वाजेपर्यंत घरी यायचा. त्याची बायको मग दिवसभर एकटीच घरी राहत होती. मी तिला वहिनी म्हणत होतो तर ती मला भाऊजी म्हणायची. असं आमचं दोघांचं दीर-भावजयीच नातं होतं. या नात्याने ती कधीकधी प्रसंगानुरूप माझी थठ्ठामस्करी पण करायची. माझ्या सुंदरतेवर ती कमालीची भाळली होती. हे मला तिच्या नजरेत दिसत होतं. काॅलेजमधील मुली पण माझ्यावर लाईन मारत होत्या.

ब्रम्हचारी बापDonde viven las historias. Descúbrelo ahora