Part - २ (मॅडम)

831 10 1
                                    

तुला ह्या तीन दिवस मी जे जे सांगेन, मी जे जे बोलेन ते तुला ऐकावं लागेल..

मी - हा हा वहिनी.. जसं तू बोलशील तसं सगळं ऐकेन मी..

सीमा वहिनी - ठीक आहे मग, चल मी आता फ्रेश होते..
असं म्हणत ती तिथून निघून गेली.
इथून पुढे...



मी मग माझ्या बेडरूम मध्ये गेलो,
थोडा वेळ आराम करत, मी उद्याच्या पेपर चा अभ्यास करू लागलो..
थोड्यावेळात वहिनी आली, म्हणाली की काय बनवू रात्री साठी..

मी - काहीही चालेल..

वहिनी - पेपर कधी पर्यंत आहेत तुझे?

मी - उद्या शेवटचं आहे..

वहिनी - ठीक आहे उद्या सुटल्या सुटल्या सरळ घरी ये, कुठे उनाडायला जाऊ नकोस..

मी - का वहिनी..

वहिनी - सांगितलंय ना मी.. मग ते करायचं..

असं म्हणत ती तिथून निघून गेली, मनात विचार येऊ लागले की मी काय हे करून बसलो.. उद्या पेपर संपणारच होते.. उद्या प्लॅन केला असतं मी स्नेहल बरोबर, मला पण ना.. खूपच घाई..

रात्री जेवण करून पुन्हा, अभ्यास करायला बसलो, रात्रीचे ३ वाजले होते माझा अभ्यास झाला होता, खाली किचन मध्ये मी पाणी प्यायसाठी गेलो तर वहिनी सोफ्यावरच झोपी गेली होती.
टीव्ही चालूच होता.

मी तो टीव्ही बंद केला, आणि वर जाणार इतक्यात मला तिचे गोरे पान पाय दिसले जे की ती वेडीवाकडी सोफ्यावर झोपली होती त्यामुळे तिची गाऊन पार डोफ्यांपर्यंत आली होती, मी २, ३ मिनिटे तसेच तिला न्याहाळू लागलो, पण तिची काही हलचाल झाली तसा मी सावध होत माझ्या रूम मध्ये झोपायला गेलो.

पुढच्या दिवशी मी सकाळी उठून पेपर साठी निघालो, निघताना वहिनी परत म्हणाली.. सुटल्यावर सरळ घरी ये टाईमपास करू नकोस कुठे..

मी हा म्हणत, कॉलेज मध्ये पेपर साठी आलो, इथे स्नेहल माझ्यावर रुसली होती, मी तिला मनवत होतो पण ती काय तयार नव्हती, उलट ती मलाच दोष देत होती की ती कशी आली, दरवाजा ला कडी का नाही लावलीस तू, असं म्हणत..

माझं गुपितजहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें