प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाण्याचा माझा पहिला दिवस.त्यामुळे माझ्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. कधीही मम्मीच्या आवाजांनी आणि पप्पांच्या एका आवाजात उठणारा मी त्या दिवशी सगळ्यांच्या आधी ऊठलेलो आणि स्वतःच आवरू लागलेलो. मम्मी पडल्या पडल्या पप्पांना डोळल्याने खुणावत होती,बघा कसा आवरतोय आज पटापट.इतक्यात मी मम्मी ला आवाज दिला,
ये मम्मे उठ ना ग! डबा कर माझा,मला आज बटाट्याची चटणी पाहिजे डब्यावर.
तू आज चटणी नको नेऊस डब्यावर, मी तुला पावभाजी देते.
मम्मी असं बोलताच त्याक्षणी तोंडाला पाणी आले पण ते सावरत,हा हा दे पावभाजी च.
या सगळ्या गोंधळात शाळेची ही वेळ आणि माझी ही सर्व तयारी झालेली.
मनात चालल्या विचारांची पाखरं सैरभैर भटकायला लागलीं,झिंगाट गाण्यावर मनातल्या मनात नाचत होती. या सगळ्या विचारात शाळेचं गेट कधी आले हे मला उमगलच नाही. मी प्राथमिक ला मुलांच्या शाळेत होतो आणि इथे मूल आणि मुली सोबतच हे विचार शाळेच्या गेटमधून आत जाताना मनात हेलकावे घेत होते.शाळेच्या परिपाठला सुरवात झालेली.सर्वजण एकत्र ,आमच्या नवीन वर्गाची मुख्याध्यापकांनी सर्वांशी ओळख करून दिली,टाळ्यांच्या कडकडाट सर्वांनी आमचे स्वागत केले आणि आम्ही आपआपल्या वर्गात निघून गेलो. वर्गात दोन ओळी मुलांच्या आणि दोन ओळी मुलींच्या अस काहीस होते आणि माझ्या साठी हे सर्व नविनच! आमच्या आधी मुली वर्गात आलेल्या ,त्याच वेळेस मला जाणवलं काहीतरी सुगंधित वास येतो, या आधी असा वास मला शाळेत कधीच आलेला नव्हता.
(देखो हम ना बॉईस स्कूल के पढे हुए लडके, तो हमे पता ही नहीं यार लडकी किस चिडिया का नाम है,
जैसे ही उस दिन मे क्लास मैं गया तो पता चला की,
लंडकियो मे खुशबू होती हैं। हां हां लंडकियो में खुशबू होती हैं!)
माझी उंची जास्त असल्यामुळे अर्थातच शिक्षकांनी मला शेवटच्या बाकावर बसवले.या सगळ्यात माझी सचिन सोबत मैत्री झाली.नवीन नविन मित्र होतch होते. सगळे अगदी आनंदाने पहिल्या दिवसाचा आनंद घेत होते. दुपारच्या सुट्टी पर्यंत सगळे जवळ पास माझे मित्र झाले पण मी मुलींच्या रांगेकडे ढुंकून ही पाहिले नाही,थोडीशी ही हिम्मत होत नव्हती की मी जावं त्यांच्याशी बोलावं पण बोलणंच काय तिकडे पाहायला माझ्या डोळ्यांची पापनीच उपजत नव्हती.पण काही मुलांनी हे धाडस केले आणि त्यांच्याशी लगट केली.मधल्या सुट्टी ची घंटा वाजली आणि आम्ही सर्व वर्गाकडे निघालो.आता पुन्हा काहीतरी नवीन शिकायला मिळणार या आनंदाने मी माझ्या मौजेत वर्गात चाललेलो ,शेजारून बाकी मुलं जाताहेत हे देखील मला भान नव्हते.आपण नवीन शाळेत आलो,सर्व किती छान आहे,आपण पण मोठे झालो. या मनाच्या धुंदीत मी वर्गात घुसत होतो.वर्गात घुसताना मला नकळत कोणाचा तरी धक्का लागला.धक्का लागताच मी भानावर आलो.धक्का लागला ती एक मुलगी होती. तिचं नाव मेहक! मी तिच्याशी नजरा चोरत बोललो...
सॉरी,माझं लक्ष नव्हते. ती पण ठीक आहे म्हणत आणि स्मितहास्य करत आपल्या जागेवर जाऊन बसली. पण तीच ते हसन मला खळलं. मी त्याच अवस्थेत माझ्या जागेवर जाऊन बसलो. वर्गात शिक्षक आले त्यांचे शिकवणे चालू झाले. पण त्यांच्या शिकवण्याकडे लक्षच लागत नव्हते.माझ्या चोरट्या नजरा सारख्या तिच्या बाकाकडे बघत होत्या. प्रेम वगैरे काय असते यावेळेस त्याचा लवलेश ही मला माहित नव्हता. ती फक्त मला आवडली बस,माझ्या चोरट्या नजरा नि तर तिची छबी केव्हाचं तयार केलेली.माझ्या नजरेने तर तिचे केसच मला पाठीमागून दिसत होते.तिचा मघाशी लागलेल्या त्या धक्याचा गंध तर अजून माझ्या नाकावर तसाच होता.तिला चोरून बघण्यातच माझा सुट्टी नंतर चा दिवस गेला.वर्गात काय झाले याचा सुद्धा मला काहीसा ही थांगपत्ता नव्हता.शाळा सुटण्याची घंटा वाजली,नियमाप्रमाणे आधी मुली वर्गाच्या बाहेर पडल्या आणि नंतर मुलं .पण वर्गाच्या बाहेर पडताना मी तिच्या रिकाम्या बाकाकडे बघतच बाहेर पडलो. तिच्या त्या स्मितहास्याने मला जसे तिचे वेड लावून दिले. माझी अवस्था अशी झालेली की,
इश्क के फुल खिले हो उसकी आँखो मैं, उसकी नजर मेरे पे पडी और उसकी खुशबू बीखर गयी हो ।
पण त्यावेळेस प्रेम काय असते हे माहीतच नव्हते,फक्त आपण आपल्या आवडीच्या लोकांसोबत राहावं अशीच ती भावना. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदात उड्या मारतच घरी गेलो.शाळेतल्या काय काय गोष्टी मम्मी,पप्पांना सांगू अस मला होत होते.रात्री झोपे पर्यंत माझे सांगणे चालूच होते. शेवटी मम्मीच बोलली झोप की आता, उद्या जायचं ना शाळेत.आणि मी मेहक च हसनं आठवून ,गालातल्या गालात हसून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझा दिनक्रम चालू केला. शाळेत जायची भरभर तयारी केली आणि वेळ होता म्हणून शाळेत जायच्या आधी 5मिनट कॉफी पित,रस्त्यावरची वर्दळ बघत बालकनी मध्ये उभा राहिलो.त्याचवेळी रस्त्यावरून शाळेत जाताना ती मला दिसली.तीच ती मेहकच! मी तसाच अर्ध्या कॉफी चा कप ठेवत,घाईघाईने मम्मी च्या पाया पडून शाळेत निघालो.ती जशी पुढे पुढे जात तसा मी ही तिच्या पावलांवर पाय ठेवत पुढे जात राहिलो.शाळा आली हे सुद्धा तिथल्या गोंगाटामुळे मला कळले.शाळा भरली तोही दिवस असाच तिला मधे मधे तिला चोरून बघण्यात गेला.आणि माझा दिनक्रम ठरून गेला.रोज शाळेत येताना बाल्कनीत तिची वाट बघत राहणे आणि तिच्या पावलांवर पाऊल ठेवत शाळेत येणे.एकीकडे हळूहळू सगळ्यांशी चांगली मैत्री होऊ लागली,आता मुलींशी ही माझी चांगली मैत्री झाली.मेहक शी ही माझी खूप चांगली लगट झाली.आता मी शाळेत येताना तिच्या पावलांवर पाऊल ठेऊन नाही तर पावलांना पाऊल लावत म्हणजेच सोबत शाळेत येऊ लागलो.या सगळल्यातच आमच्या शाळेचे वर्ष ही सरत होते.आमच्या दोघांची ही जवळीक वाढू लागलेली,तिला ही माझ्यासोबत वेळ घालवणे आता आवडू लागलेलं.सुटीच्या दिवशी ही भेटून आम्ही सोबतच वेळ घालवू लागलो.तिला गणित हा विषय अवघड जायचा आणि मला विद्यान विषय.आम्ही दोघे ही एकमेकांच्या परस्पर विरोधी विषयात अव्वल होतो. त्यामुळे एकमेकांच्या घरी जाऊन आम्ही सोबतच अभ्यास करू लागलो.शाळेत देखील best frnd म्हणून आम्ही दोघे नावजलो जाऊ लागलो. आमच्या दोघांच्या ही आवडीनिवडी तश्या वेगळ्या ,पण म्हणता ना opposite attracts तसस आमचं काहीस होत होते.दोघांनीही सोबतच अभ्यास करून परीक्षा दिली.आता सुट्ट्या लागल्या आणि शाळेचे देखील दोनच वर्ष राहिले. दोघे ही याच आनंदात घरी गेलो.सुट्या असल्याने मी मामाच्या गावाला निघून गेलो तिचा आणि माझा काही दिवसासाठी संपर्क तुटला ,यासाठी माझे मन मला खात होते.पण थोड्याच दिवसांचा तर प्रश्न होता ना ती आणि मी थोड्या दिवसांनी भेटणारच होतो. आणि शेवटी शाळेचा दिवस उजडला ,मी तिची वाट बघत बाल्कनीत उभा राहिलो पण ती आलीच नाही.मला ही थोडा शाळेत निघायला उशीर झालेला त्यामुळे मी निघून गेलो तर ती शाळेत ही आलेली नव्हती.मी माझ्या मनाची समजूत घालत स्वतःशीच पुटपुटलो, अजून आली नसेन गावावरून ती.त्यादिवशी काय कोणास ठाऊक करमतच नव्हते सारखी तिची आठवण. तेवढ्यात दरवाज्यातून कोणाचा तरी आवाज आला...
मॅम,मेहक ला सुजाता मॅम ने बोलावलं.
मॅम मेहक बोलणार इतक्यात पल्लवी बोलली ,
मॅम मेहक ने तर ही शाळा सोडली,तिच्या वडिलांनी बदली झालीय दिल्ली ला.
काय काय!! मी मनाशीच बोललो आणि मला धसकाच बसला.हे शक्यच नाही,ती मला बोललेली आपण कॉलेज पण सोबतच करूया. आणि अस होणे कस शक्य आहे.मला काय करावे हेच सुचत नव्हते,अस्वस्थ वाटायला लागलेले.शेवटी मी माझं पोट दुखतंय अस खोटं बोलून घरी निघून आलो.तिच्यासाठी बोललेलो हे तीच पहिलं खोट.आता पर्यंत जे तिच्याशी बोललेलो ते सगळं खरच.मी धावतच तिच्या घरी गेलो पण घरी कोणीच नव्हते ,कुलूप लावलेलं.त्यावेळी माझी अवस्था अशी झालेली ...उसकी देहलीझ पे तो खडा हूं ,लेकीन उसे देखणे का मोहताज हूं।
तिच्या त्या विचारातच विचार करत करत घरी निघून आलो.शाळेचे कपडे सुद्धा काढले नाही,तसाच माझ्या रूम मध्ये गेलो आणि तिच्या आठवणीत कुढत राहिलो.त्याक्षणी मला बसलेला त्या मानसिक धक्क्यातून कसं सावराव हेच मला कळत नव्हते.तिचा तो गंध सारखी मला तिची आठवण करून देऊ लागला. माझ्या डोळल्यातून कधी अश्रू धारा ओघळल्या हे मला सुद्धा त्या वेळेस समजलं नाही. कधीकाळी जिला मी माझ्या पापण्यांवर बसवले ती माझ्या डोळल्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या थेंबातून वाहून चालली होती.अश्रूंना सुद्धा अश्रुधारा फुटाव्या अशी माझी स्थिती होत होती.तीच ते हसणं,तीच ते लाजन,सोबत अभ्यास करत असताना तिचा तो कल्ला, गोंगाट .सगळ्या गोष्टीत फक्त ती आणि तीच आठवत होती.आपल्याला कोणीतरी इतकं भावु शकत याच्यावर विश्वासच बसत नव्हता,पण त्या विश्वासाला माझ्या अश्रूंनी तर केव्हाच उत्तर देऊन टाकलेले.