Feelings in love

663 4 4
                                    

मी डोळे मिटून तिचा विचार करत असताना माझी मम्मी शेजारी येऊन बसली याचे सुद्धा मला भान राहिले नाही.
काय झालं रे तुला,का रडतोय? मम्मी बोलली.
काही दुखतंय का तुझं.
मम्मी ला बघताच मी भानावर आलो आणि डोळे पुसतच काही नाही ग मम्मे,डोकं खूप दुखतंय.
मम्मी शी खोट बोलून मी माझ्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला.
अरे एवढंच ना मग रडतोय का वेड्यासारखा, चल आपण डॉक्टर कडे जाऊ.
नको ग मम्मे,मी घरी येताना मेडिकल मधून गोळी घेतली,वाटेल बर.
नक्की ना. ठीक आहे मग ,मी तुझ्या डोक्याला बाम लावून ,मम्मी बाम  घेता घेता बोलली.
ठीक आहे,लाव बाम.
बाम लावून ,काही विचार करू नको ,शांत पडून राहा आणि काही लागलं तर आवाज दे,मी जरा भांडी घासून येते.
एवढं बोलून मम्मी निघून गेली.
मम्मी रूमच्या बाहेर जाताच पुन्हा एकदा माझ्या अश्रूंचा बांध कधी फुटला कळलेच नाही.तिच्या त्या आठवणीत मला कधी झोप लागून गेली कळलेच नाही. संध्याकाळच्या सुमारास मला जाग आली.जाग आल्या आल्या तिची आठवण आली.पण स्वतःला सावरत बाहेर आलो.पप्पा पण कामावरून घरी आले होते.
मला बघताच त्यांनी विचारलं, बरं वाटतंय का आता.
मी हो बोललो.आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूम कडे वळालो. फ्रेश होतच होतो इतक्यात पप्पांनचा आवाज आला. लवकर ये रे,जेवायला बसायचंय.
मी फ्रेश होऊन बाहेर आलो आणि बोललो मला नाही जेवायचं तुम्ही जेवा.
अरे तुझी तबियत ठीक नाही हेय ना,तर थोडं जेवून घे.
मला नाही जेवायचं,मम्मे. तुला सांगितलं ना .
मी मम्मी वर चिडून बोललो.
तेवढ्यात पप्पा बोलले,खाऊन घे रे थोडं नायतर रात्रीच पुन्हा काही व्हायचं.
पपांच्या धाकापोटी मी जेवायला बसलो.पण जेवणाचा एक घास पण घशाखाली जात नव्हता.पपांच्या धाकामुळे तो बळजबरीने मी लोटण्याचा प्रयत्न करत होतो.जेवण करून मी माझ्या रूम मध्ये निघालो.
मम्मी चा पाठीमागून आवाज आला काही हवं असल्यास आवाज दे आणि गोळी घे मंगच झोप.
मी होकारार्थी मान डोलावून रूम मध्ये घुसलो. काहीतरी वाचून ,अभ्यास करून तिचा विचार जरा कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करु लागलो.त्यावेळेस फेसबुक,व्हाट्सअप्प असे काहीही नव्हते.जेणेकरून ती मला भेटेल बोलेल.फक्त आठवण बस.पलंगावर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण झोप काही येत नव्हती.दुपारच्या झोपन्याने म्हणा किंवा तिच्या आठवणीने.मी उठून बालकणी मध्ये जाऊन उभा राहिलो.पण त्या ठिकाणी तर तिने मला भुरळ पाडली अशी ती दिसू लागली.मी तिला आवाज देणार तोच एका गाडीचा हॉर्न वाजला आणि मी सावरलो.रोज बाल्कनीत उभा राहून तिची वाट बघत थांबणं ,ती दिसताच चेहऱ्यावर हसू येणं.एकदा तर सुट्टीच्या दिवशी मी टॉवेल गुंडाळून माझा वाळत असलेला शर्ट काढण्यासाठी बाहेर आलो,तेवढ्यात तिने मला टॉवेलवरच बघितलं.मी तिला बघून तसाच शरमेने आत पळून आलेलो,त्यानंतर तिने माझी किती खेचली,याला तर अंतरच नव्हते. तिचे सगळे काही आठवत होते फक्त तीच दिसत नव्हती. तू मला खूप आवडतेस ही वर्षांपासून तिला सांगण्याची इच्छा तशीच  त्या पाहटच्या धुक्यात विरळ होत चाललेली.
तिच्या विचारात पहाट कधी झाली हे सुद्धा मला कळले नाही.झोप येत नव्हती म्हणून मी तसाच स्वतःला शोधण्यासाठी जॉगिंग ला म्हणून घराबाहेर पडलो. माझा मित्र सचिन पण तिथे जॉगिंग साठी आलेला.
काय भाई,आज इकडे कुठं? रोज तर दिसतं नाही.सचिन मिस्कीलपणे बोल्ला.
अरे आज पासून यावं म्हणलं.मी माझ्या चेहऱ्यावर खोट हसू ठेवत म्हणालो.
अरे येत जा यार रोज,तस ही आपण दोनच वर्ष आता एकाच बेंचवर बसू.
सचिनच्या या बोलण्याने मला ही ते जाणवलं आता आपण कॉलेज ला जाणार.मग भेट होती नाही होती. जिथं माझ्या आणि तिच्या आठवणींना उजाळा मिळत होता त्या ठिकाणाहून मला लवकरच काढता पाय घ्यायचा होता.फिरून आल्यामुळे आणि सचिन शी केलेल्या गप्पा गोष्टींमुळे आता मला थोडं बर वाटत होते.मित्राशी बोलून दुःख हलके होते या गोष्टीत तिळमात्र ही शंका नाही.घरी आलो तेव्हा पाणी तापलेलेच होते तसेच मी अंघोळीला गेलो.मम्मी,पप्पा दोघे ही आश्चर्यकारक नजरेने माझ्याकडे बघत होते.कारण त्यांचा मुलगा आज लवकर उठून फिरायला गेला होता नाहीतर या आधी या दोघांनी दिलेल्या आवाजा शिवाय जाग येणं अश्यकच आणि तेही सुट्टीच्या दिवशी. मी आंघोळ करून बाहेर आलो पप्पा पेपर वाचत बसलेले.मी बाहेर येताच ,पेपर ची बातमी वाचत पप्पा बोलले हे बघ आई, वडील आणि आर्थिक स्थिती बिकट असताना सुद्धा हा मुलगा हा मुलगा कलेक्टर झालाय.असे काहीतरी आयुष्यात केले  पाहिजे,माणसाचा जन्म हारण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी झालाय.
बस पपांचे ह्या वाक्यातील शेवटची ओळ माझ्या येथुनपुढच्या तिच्याशिवाय कराव्या लागणाऱ्या प्रवासासाठी पुरेशी ठरली.हाच विचार करत डोकं पुसत मी माझ्या रूम मध्ये गेलो.आरशासमोर उभे राहून स्वतःशीच बोलू लागलो.जर तो मुलगा ज्याच्यावर कोणही प्रेम करणार नसताना,कोणत्याही सुखसोयी नसताना यशस्वी होऊ शकतो तर माझ्यावर तर खूप प्रेम करणारे मम्मी,पप्पा आहेत सर्वसुखसोयी आहेत तरीही ही मी जीवनात एका मुलींसाठी मी हार मानतोय.स्वतःकडे बघत मी स्वतःशी बोल्लो, नक्कीच माझा जन्म हा हारण्यासाठी झाला नाहीय.मी जिंकणार आणि नक्कीच आयुष्याच्या टप्यात जिंकणार.दोनच वर्षाचा तर प्रश्न आहे आणि नंतर मग नवीन जागी शिकण्यासाठी जाऊ.तिथं तिची आठवण येते का ते पण नाही माहिती,अस बोलत तिला आठवत गालात हसलो.ती नसली तर काय झालं आपण तिच्या आठवणी तर आहे,त्यांच्या साह्याने जीवनाशी आणि तिच्याशी संघर्ष करू.स्वतःची समजूत घालतानाच मला एक उभारी मिळाली.तिच्या आवडीचा ब्लू शर्ट घालून फिरण्यासाठी बाहेर पडलो.आता मला तिची कमतरता जाणवन कमी झालं होतं.तिची कमतरता आता  माझं ध्येय भरून काढत होते. आता माझ्या मनाला उभारी मिळाली होती,दिवस ही पटपट सरत होते.आता तिचा बसण्याचा बाक पण खुणावत नव्हता.पण वर्गातून बाहेर पडताना बाकावर नजर पडल्या शिवाय राहत नव्हती.बाक जणू तिच्यात आणि माझ्यात मध्यस्थीच करत होता.पण स्वतःला सावरून मी पुढे पुढे जात राहिलो.शेवटी ते शेवटचं वर्ष एकदाच पार पडलं. चांगल्या मार्कने पास झालो आणि पुढील शिक्षणासाठी म्हणजेच कॉलेज ला पुण्यामध्ये आलो. पुन्हा एकदा नवीन मित्र, नवीन जागा सगळं आपलेसे करून घेण्यासाठी मी आणि तिच्या आठवणी तयारच होतो.चांगल्या मार्क्सने पास झाल्यामुळे पपांनी नवीन मोबाईल घेऊन दिलेला.सर्व काही मस्त चालले होते. पण हे मस्त चाललेले दिवस काही गुलाबाच्या काट्यासारखेच होते.पण ध्येय ठरवले होते त्यामुळे गुलाबाच्या काट्यातून चालताना हृदय माझं रक्ताळत होते,तरीही रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नाव तिचेच निघत होते.
    उद्या कॉलेज चा पहिला दिवस,यासाठी तर मी खूपच उत्साहित होतो.उद्या कोणता शर्ट घालायचा,पॅन्ट ,सेंट सगळं काही तयार होते. मी पहिल्यांदाच इतक्या मोठया शहरात आलेलो.सगळं काही माझ्यासाठी नवीनच म्हणून जरा जास्तीच आनंदात होतो.शेवटी कॉलेज चा दिवस उजाडला ,मी ब्लू शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून कॉलेज ला गेलेलो.नवीन मित्र मैत्रिणी होत होते,सर्वजण माझ्या लुकला इम्प्रेस देखील झाले होते.पहिला दिवस असल्याने तुकडी वगैरे काहीही बनवलेली नव्हती.सर्वजण एकत्रच कलास मध्ये बसवले होते.सगळ्या मुलींशी नावानिशी नाही पण तोंडओळख झाली होती.पण त्या मुलींमधील एक हसणं मला खुणावत होत.मला जणू ते हसन काय मेहकचच वाटत होते.परंतु  पहिल्याच दिवशी स्वतःहून जाऊन आपंनच मुलींशी बोलणं त्या परिस्थितीला धरून नव्हते.आणि ती मेहक कशी असणार ,मेहक तर पंजाबी ड्रेस घालणारी,शांत शांत राहणारी आणि ही तर जीन्स,टीशर्ट घालणारी ,दंगा मस्ती करणारी दिसतेय.त्यामुळं तिचा विचार करणं सोडून माझा भेटलेला दिवस जगायला सूरवात केली.पण माझ्या चोरट्या नजरा अजून ही तिलाच बघत होत्या.जवळपास सगळे मुलं मोबाईल वर फेसबुक,व्हाट्सअप्प  यावरच चॅटिंग वगैरे करत बसलेले.माझ्यासाठी सगळे हे नवीनच होते.म्हणून मी पण माझा मोबाईल काढून फोटो बघत बसलो आणि पुन्हा 2मिनिटांनी मोबाईल ठेवून दिला.त्यामुळे आधी आपण पण जाऊन फेसबुक,व्हाट्सअप्प उघडायच अस ठरवले.शेवटी एकदाच कॉलेज सुटलं,तिला चोरून बघत बघतच कॉलेज च्या बाहेर पडलो.पण यावेळेस मी एकटा नाही ती पण माझ्याकडे बघत होती आणि हसत होती.मला तर काय करावे हेच समजेनासे झालेले.तिला कसे विचारावे हेच कळत नव्हते.उद्या आणि परवा तर शनिवार,रविवार मुळे सुट्टी होती.तिला आणि तीच हसणं नजरेत साठवतच मी माझ्या रूम वर आलो.तिची आठवण आता इतकी येत होती की सगळ्या भुतकाळाने माझ्या पाठीवर हात फिरवला.पण पुन्हा मनाशी केलेला निश्चय आठवला,आठवणीत गुतायच नाही. मी तसाच बेडवरून उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो.बाहेर आलेल्या मोबाईल हातात घेऊन फेसबुक उघडायला लागलो।सर्वकाही त्याच्या सेटिंग पूर्ण केल्या.आणि आलो मी एकदाच फेसबुक वर! आता पुढं काय करायचं,request कशी पाठवायची हे तर काहीच माहीत नाही.म्हणून मी माझ्या मित्राला फोन केला आणि त्यांनी सर्व काही समजून सांगितलं.आता request पाठवायची पण कोणाला,त्यासाठी मी नाव सर्च केलं आणि ते नाव होते तीच.खूप साऱ्या मुली आल्या आणि त्यांच्या मध्ये हिजाब घातलेल्या एका मुलीचा फोटो होता आणि तिला देखील तस राहणं खूपच आवडायचं.म्हणून मी तिची प्रोफाइल उघडली आणि तिचे फोटो बघायला लागलो.प्रोफाइल होती जी आज माझ्याकडे पाहून हसली तिची.मी खूप सारे फोटो बघत खाली आलेलो आणि एका छोट्या मुलीचा फोटो होता तो ही हिजाब मध्ये आणि फिंगर क्रॉस केलेले.बस मी तिला ओळखलं.ती प्रोफाइल आणि फोटो होते तिचेच,होय तीच तीच.माझ्या आनंदाला पारावरच राहिला नाही.मी पंधरा पंधरा मिनिटं तिचा एकच फोटो बघत होतो.तीच फोटोतलं हसणं सुद्धा मला खुणावत होते.त्या फोटोवर कधी माझे ओठ लागले हे सुध्दा समजलं नाही.ती माझी फेसबुक वर मैत्रीण व्हावी यासाठी तिला request पाठवण्यासाठी मी बाहेर आलो.तिला request पाठवायला अंगठा क्लिक करणार तोच एक विचार चमकला. जिला निघून जाताना माझ्यासाठी एकही शब्द तिच्या मैत्रिणीकडे ठेवता आला नाही आणि तिच्याशी मी का होऊन बोलावं.मी तशेच तिचे सर्व फोटो तीन,चार वेळेस सेव करत बाहेर आलो.आणि बाकीच्यांना request पाठवत बसलो.त्या दिवशी ती आलेली झोप ,दोन वर्षांपूर्वी आली तशी होती.पण मम्मी,पप्पा उठवायला नव्हते.म्हणून स्वतःच उठून आवरायला लागलो.पण उठल्यावर तिच्या फोटोला बघायला काही विसरलो नव्हतो.आज सगळे नवीन मित्र भेटणार होतो आणि सर्व दिवस सोबतच घालवणार होतो.त्यामुळे मी माझं पटपट आवरून जायला निघालो.मी कॅफेटेरियाला गेलो,तिथं आधीच दोन,चार मित्र आलेले.म्हणून आम्ही गप्पा  मारत बसलो, एक एक करत सगळे येत होते.एकदाचे सर्व आले आणि आम्ही मूवी ला गेलो.तो सर्व दिवस तसाच मित्रांसोबत कधी गेला कळूनच आले नाही.पण यापूर्ण दिवसात तिचा फोटो कितीवेळा बघितला याची तर गिनतीच नाही.फोटो बघितल्यावर कधी गुलाबाची कळी तोंडावर फुलायची कळून सुद्धा येत नव्हते.रूम वर येऊन तसाच बेडवर आडवा झालो.आणि मोबाईल हातात घेऊन फेसबुक बघू लागलो.खूप साऱ्या request आलेल्या.सगळ्या पूर्ण करत खाली येत होतो तर एक request आलेली आणि ती होती तिची.मी बाकी सगळ्या request पूर्ण केल्या पण तिची तशीच ठेवली.ती अजून ही तशीच आहे.काय करावे हेच त्याक्षणी समजत नव्हते.मी तसाच बाहेर आलो आणि नवीन फेसबुक उघडले.आणि मग मी तिला request पाठवली.या वेडेपणाचे मला आजही हसू येते.पण तिने पाठवलेली ती request अजून ही तशीच आहे.दुसऱ्या मिनिटाला request ही पूर्ण झाली आणि एक मेसेज ही आलेलो.तिचाच होता तो.
हाय डिअर,तिचा मेसेज.
मी तिला उत्तर देत बोल्लो.
आता आपल्याला या हाय गोष्टीपासून बोलायला सुरवात करावी लागतेय?
ओह,बोल की काहीतरी.तीच उत्तर
तिच्या विरहात मी कधी शायरी लिहायला लागलो आणि गाण्याचे शब्द व त्याचे अर्थ कधी समजायला लागलो.मला सुद्धा कळले नाही.
भुला देंगे,आपको जरा सबर तो किजिय;
अभी आपकी तरह होने मे,थोडा वक्त तो लगेगा।
मी तिला उत्तर दिलं.
2मिनिटाच्या शांततेनंतर तीचा मेसेज आला.
सॉरी डिअर,मला तुला दुखवायच नव्हतं.मला तुझ्याशी खूप काही बोलायचं होत.पण मी तिथे नव्हते आणि तू ही तिथे नव्हतास.मी सुट्टीमुळे गावाला गेलती.आणि तशीच दिल्ली ला आलेली.तुला भेटण्याची ती खंत आणि तुझ्या विरहाचे दुःख अजून ही तशेच उराशी बाळगून आहे.
तिचा तो मेसेज वाचून मी सुद्धा अश्रुत होतो.जिला मी रोजरोज डोळल्यात साठवून आठवत होतो,तीही माझ्यासाठी त्याच अवस्थेत होती. हे दुसरं काही नसून काय आहे.हे प्रेमच तर आहे.प्रेम काय असते, इतपत तर समज आलीच होती.ज्या कवितेत लिहून मी तिला सापडत होतो.ती मला आता भेटली होती.
अग, सॉरी काय बोलतेस वेडाबाई!
मला वाटले तू मुद्दाम मला न भेटता आणि काही मेसेज न ठेवता निघून गेलीस.
जाऊदे ते. कशी आहेस तू?
मी मस्त आहे. तू कसा आहे? तिचा मेसेज
मी पण तुझ्या आठवणीत.
असा मेसेज टाईप केला आणि पुन्हा डिलिट केला आणि मेसेज पाठवला.
मी पण खूप मस्त.
दोघांना पण सोबत बोलतांना रात्र कशी गेली हेच उमजले नाही.मी तिला भेटणार होतो.जिच्यासाठी आज पर्यंत केलेला अट्टहास पूर्ण होणार होता.ती माझ्या कवितेतून निघून माझ्या सोबत येणार होती.उद्याचा रविवार मला व्हॅलेन्टाईन पेक्षा काही कमी नव्हता.
रात्र तर केव्हाच सरली होती .आम्ही दोघे ही आज भेटायचं म्हणून आवरायला लागलो.आज घालण्यासाठी खूप कपडे होते पण तिच्यासाठी कोणते कपडे घालावे हेच उमजत नव्हते.पंधरा मिनिटं तर कपडे निवडण्यातच गेले होते.शेवटी मी  तिच्या आवडीचा चेक्स चा येल्लो आणि ब्लू जीन्स घातली.आज नाश्ता करायला सुद्धा पोटात जागा नव्हती.आनंदानेच माझे पोट तर रात्रीच भरून गेलते.आम्ही कॉलेज च्या बाहेर लव्ह कॅफे मध्ये भेटायचं ठरवलं होते.मी वेळेआधीच अर्धा तास रूम वरून निघालो .घाईगडबडीत रूम चे कुलूप पण लावायचे विसरून गेलेलो.ज्या कॅफे मध्ये पोहचायला पंधरा मिनिटे लागतात तिथं मी पाच मिनिटात तिच्या ओढीने कसा पोहोचलो मला कळलेच नाही. कॅफे मध्ये तर पोहोचलो पण ती येईपर्यंत काय करायचे याचा विचार करत  बसण्यासाठी जागा शोधू लागलो.अचानक झाडाखाली लावलेल्या टेबलच्या साईड खुर्चीवर ती येऊन बसली होती.होय मेहकच. तिला बघताच मी अवाक झालो .आम्ही ज्या वेळेला भेटणार होतो त्याच्या अर्धातास आधी आणि माझ्याआधी ती तिथे येऊन बसली होती.आता आम्ही भेटणार होतो .आमच्यातला दुरावा आता मिटणार होता.पण तिच्या टेबल कडे जाण्यास पाय उचलत नव्हता.पण मी माझ्या मनाची हिम्मत एकवटून आणि तिच्या ओढीनं टेबलाजवळ पोहचलो.
मला यायला उशीर तर झाला नाही ना!
मी तिच्याकडे हातमिळवणी करण्यासाठी हात पुढे करत बोल्लो.
मला अचानक बघून ती पण थोडी थबकलीच.स्वतःला सावरत उठून माझा हात बाजूला सारत तिने मला मिठीच मारली.त्या मिठीच्या  क्षणी आपल्या मनातील तिच्याविषयीचे प्रेम व्यक्त करून टाकावे असे वाटू लागले.पण मोठ्या शहरातील मुलींमध्ये भेटल्यावर आलिंगन देणं ही तर नॉर्मल गोष्ट आहे.आणि ही देखील दिल्ली वरूनच आली होती.त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त काही अर्थ नाही घेता.मी माझ्या बसण्याचा जागेकडे वळालो.दोघे ही एकमेकांच्या समोर बसलो होतो पण काय बोलावे हेच समजत नव्हते.शेवटी मीच बोल्लो, असं नाही वाटत का,आपण दोघे ही वेळेआधीच आलोय.
ती पण चेहऱ्यावर स्मितहास्य करत बोलली,
हो रे.मला तुला भेटल्याशिवाय राहावंतच नव्हतं.पूर्ण रात्र मी झोपलेली सुद्धा नाहीय.त्यादिवशी तू माझ्याशी बोल्ला नाही.मला त्या दिवसापासून खूपच वाईट वाटत होते.असे झाले होते कधी एकदा तुला भेटेल आणि मनमोकळे करेन.मी रोज तुला न चुकता फेसबुक वर सापडायचे ,आणि त्या दिवशी तू दिसलास. आनंदाला पारावरच उरला नाही माझ्यातर.
माझ्या मनावर ज्या भावनेचा ओलावा होता तोच ओलावा तिच्याही मनावर होता.पण आमच्या दोघांचे ते अव्यक्त प्रेम होते.आम्ही दोघे ही मनोमनी हेच समजून आनंदी होतो. दिवसा जस चांदण्यात चंद्र दिसावा अस काहीस माझं होत होते.  आज माझा चंद्र मला भेटला होता.चांदणं जस रातीच्या वेळी खुलाव आणि तुटून एखांद्याची ईच्छा पूर्ण करावी.तस तीच हसणं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या अस मनोमनी खुणावत होतो.तिच्याशी बोलतांना आणि जुन्या आठवणींना उजाळा देत दिवस कसा निपजला हे समजलं सुद्धा नाही.आम्हा दोघांना रात्र झालीय याच सुद्धा भान राहील नाही.रस्त्यावर झालेल्या अपघाताच्या धावपळीमुळे आम्ही दोघे भानावर आलो.आमच्या दोघांच्या आतापर्यंत पंधरा, पंधरा कॉफी झाल्या होत्या.कॉफीची चव जिभेवर आणि तिच्या बोलण्याचा शब्दानचा गोडवा बासुरीतील सात सुरांसारखा कानांवर रेंगाळत होता.शेवटी खूप उशीर झाल्यामुळे आम्ही तिथून रूमकडे जाण्यासाठी निघालो.तिला निरोप दायला मन मानत नव्हते पण वेळेला ते मान्य नव्हते.शेवटी कडकडीची मिठी मारून आम्ही दोघांनी त्या जागेतून निरोप घेतला.तिच्या मिठीचा ओलावा कुरवाळतच मी रूमवर आलो.आणि आजचा दिवस आठवू लागलो.तेवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली.मम्मीचा फोन आला होता आणि मी फोन उचलला.मी हॅलो बोलताच मम्मी ने माझं मूड ओळखला.व बोलली,
आज खूप खुश दिसतंय माझं लेकरू.
नाही ग मम्मे,असच.नवीन कॉलेज खूप मस्त आहे.सगळे नवीन मित्र पण चांगले आहेत.तुला ती मेहक माहितीय ना,आम्ही दोघे बरोबर शाळेत यायचो दोघेजण ती.
हो माहितीय की,मम्मी बोलली.
ती पण इथेच आहे.आज मला भेटली होती.आणि सोबत ओळखीचे कोणीतरी पण आहे .म्हणून सगळे मस्त चालुय. पप्पा कुठं आहेत?
अरे तुझे पप्पा बाहेर गेलेत,आले की करतील फोन तुला.
ठीक आहे.आता मला उद्या कॉलेज ला जायची तयारी करायचीय.आवरतो मी नंतर बोलेल तुझ्याशी आता.
एवढं बोलून मी फोन ठेऊन दिला.आणि उद्या कॉलेज ला जायची तयारी करू लागलो.उद्या आमचे वर्ग निश्चित होणार होते.आम्ही दोघे ही उद्या एकाच वर्गात येवो यासाठी दोघे ही जीव ओतून देवाकडे प्रार्थना करत होतो.हे आमच्या शिक्षणाचे शेवटचे चार वर्षे होते आणि तेही सोबतच शिकावं यासाठी दोघांचे ही मन तळमळत होते.याचा विचार करत मी माझ आवरायला लागलो.इतक्यात फोन वाजला मला वाटलं पपांचा असेल,पण तो होता तिचा.तिचा यावेळचा फोन बघून थोडा थबकलो.फोन उचलताच मी बोललो,
काय झालं? सर्व ठीक आहे ना? इतका उशिरा फोन केलास.
अरे,हो हो थांब की,मला तर बोलू दे. सहजच केलाय मी फोन तुला,तुझी आठवण येत होती.
काय! मी बोल्लो.
अरे तुझी आठवण येत होती.बोलावं वाटलं तर केला फोन.का काय झालं? डिस्टर्ब केलं का तुला मी. ती मला विचारत बोलली.
नाही ग.मी गाणे ऐकत बसलो होतो.बोल ना काय म्हणतेस,जेवली का तू?
नाही जेवली आज.दुपारी तुला भेटली ना तेव्हाच पोट भरलं.
ती मला उत्तर देत बोलली.
माझं पण तेच झालय.मीही चेहऱ्यावर हसू आणत बोल्लो.
आम्ही दोघे ही एकमेकांना खुनावणाऱ्या खुणा ओळखत होतो.पण पुढे धजवत नव्हतो.उद्या सकाळी उठून कॉलेजला जायचे होते म्हणून दोघे ही लवकरच झोपी गेलो.उद्या आम्ही एकाच क्लास मध्ये येवो हीच इच्छा मनी बाळगून होतो.शेवटी उद्याचा दिवस उजाडला.सर्वजण कॉलेज ला आलेलो.ती तर क्रॉस फिंगर करूनच कॉलेज मध्ये आली होती.एकाच क्लास मध्ये यावं दोघांनी पण खूप वाटत होते.पण नियतीला ते मान्य नव्हते.ती दुसऱ्या आणि मी दुसऱ्या क्लास मध्ये गेलो.नियतीने पुन्हा एकदा आम्हाला वेगळं केलं.पण कॉलेज तर एकच आहे ना हे समजून दोघांनी ही मनाची समजूत घालून घेतली.रोज सकाळी तिच्यासोबत कॉफी, नंतर कॉलेज आणि त्यानंतर पुन्हा सायंकाळी सोबतच वेळ घालवायचा.असा काहीसा आमचा दिनक्रम चालू झालेला.लायब्ररी मध्ये सोबतच स्टडी करू लागलो.ती मला ,मी तिला अस एकमेकांना शिकवत शिक्षण देखील पूर्ण करत होतो.आम्ही दोघे ही सुरवातीचे दोन वर्षे चांगल्या गुणांनी पास झालो.त्यामुळे घरचे देखील आनंदी होते.आता आम्ही शेवटची दोन वर्षेच एकत्र राहणार होतो.त्यामुळे आता आमच्या अव्यक्त प्रेमाला वाचा फोडण्याची वेळ आली होती. पण बोलावं कसं हेच दोघांना उमजत नव्हते.शेवटी तो योग जुळुनच आला.दोन दिवसात 14फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा दिवस व्हॅलेन्टाईन डे होता.दोघांनी ही याच प्रसंगांचा औचित्य साधून बोलून टाकायचे मनोमन ठरवले.आधल्या रात्रीच मेहकला मेसेज करून सांगितले.उद्या आपण लव्ह गार्डन ला भेटू,मला तुझ्याशी महत्त्वाच बोलायचं आहे.ती त्याला उत्तर देत बोलली,काही झालं तरी उद्या भेटायचं.उद्या मला देखील तुझ्याशी खूप महत्त्वाच बोलायचंय.
उद्या काय बोलू,कसं बोलू याचा विचार करतच रात्र सरून गेली आणि दिवस उजाडला. दोघानी सोबतच गार्डन मध्ये पाऊल ठेवले.आणि झाडाखाली बाकावर  बसून आम्ही गप्पा मारू लागलो.त्या सवांदला वाचा नव्हती पण मन दोघांचे ही गप्पा मारत होते.ती तिचे क्रॉस फिंगर करून,ओढणीची दोरी बोटाने गुंडाळत होती.मला ते जाणवले व मीच बोलण्यासाठी पुढे झालो.
ऐक ना मेहक, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.
बोल की मग,विचारतोस का. मेहक उत्तरली.
जाऊदे नाहीच बोलत.
अर्रे बोल की,आता बोललो नाहीतर मनात अट राहून जाईल. मेहक बोलली.
मला न तू खूप आवडतेस.लहानपणापासून माझं तुझ्यावर खर प्रेम आहे.तू जेव्हा सोडून गेलतीस तेव्हा मी पूर्ण वेडापिसा झालो होतो.पण तुझ्या आठवणींनी मला उभारी दिली.तू नसतानी देखील तुझ्या आठवणीत मी रमत जगत आलो.तू नसल्यावर कॉफी चा घोट सुद्धा घशाखाली जात नाही.ती तुझ्यासोबतची कॉफीच माझ्या तुझ्यावरील प्रेमाला साक्ष आहे. आय लव्ह यु डिअर.
एवढं भडाभडा बोलून मी तिच्या उत्तेरराची वाट पाहू लागलो.
आय लव्ह यु टू डिअर.एवढं बोलून तिने तिचे ओठच माझ्या ओठांवर अलगद विसावले.आणि त्याचक्षणी पाऊस आला.अस वाटत होते निसर्ग सुद्धा आमच्या प्रेमाची साक्ष देतोय.काहीशा वेळानंतर तिचे ओठ ,माझ्या ओठांवरून विलग झाले.आणि ती बोलली.
हे माझे ओठ माझ्या प्रेमाची तुला साक्ष देताय.
आम्ही दोघांनी ही एकमेकांना कडकडून मिठी मारली.तिची आणि माझी मिठी सुटुच नाही .असं त्याक्षणी वाटत होते.वाऱ्याला सुद्धा आमच्यातून जाताना परवानगी घ्यावी लागेन.अश्या मिठीतुन आम्ही जागेचे भान बाळगून अलिप्त झालो.दोघे ही एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून नजरेने सवांद करत होतो.आम्ही खूप वेळ गार्डन मध्ये एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेऊन,हाताची बोटे एकमेकांच्या हातात अडकवून पूर्ण दिवस तिथे घालवला.आता निघायची वेळ झाली होती.पण मिठी सुटच नव्हती.पण थांबलेल्या पावसाने आम्हाला भानावर आणले आणि आमची पाऊले रूम कडे वळाली.पण यावेळेस चालताना मी तिच्या पावलावर पाऊल ठेऊन किंवा पायाला पाय जुळवत चालत नव्हतो.यावेळेस मी तिच्या हातात हात अडकवून,एकमेकांच्या पायात घोटाळत चालत होतो.
           उद्या पासून एका नवीन पर्वणीच्या दिवसाला सुरवात होत होती.जीच्यासोबत आणि जिच्यासाठी मी जगण्याची स्वप्न बघत होतो ती स्वप्न आता सत्यात उतरत होती.मी रूमवर येऊन बेडवर पडून बागेतील दृश्य डोळ्यात साठवून आठवत होतो.त्याक्षणी तो क्षण तसाच थांबून राहावा अस त्यावेळी वाटत होते.पण वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही ते खरं.तिला आठवतच मी तसाच बेडवर पडून होतो तेवढ्यात तिचा फोन आला .पण यावेळेस फोन मध्ये मेहक नाव कधी जान म्हणून सेव झाले कळलेच नाही.फोन उचलताच ती बोलली, हाय बेबी.
पण मी तिला काय बोलवू हेच समजत नव्हते,क्षणात बेबी,जानु, शोना ही सगळी नाव डोळ्याखालून गेली.शेवटी मी बोल्लो, हाय बच्चा.
ओहो तुही बोलू शकतोस अस होय,मला विश्वासच बसत नाहीय.ती बोलली.
का?मी का नाही बोलू शकत? मी तिला प्रतिप्रश्न केला.
काही नाही,मला वाटलं होते तू फक्त टॉवेलच सांभाळू शकतोस.तिने मला मजाकमध्ये उत्तर दिले.
मी पण स्वतःच मनाशी हसलो .तिला आमच्या सर्व आठवणी अगदी मुखोद्गत होत्या.तिच्याविषयी असलेली ओढ,प्रेम दिवसेंदिवस वाढतंच होते.कॉलेज मध्ये सुद्धा आम्ही लव्हबर्डस म्हणून नावजलो जाऊ लागलो.कधीकधी विनोदामध्ये लैला मजनू, हिर रांझा यांच्यासोबत आमचीही नाव निघू लागली.एकमेकांना गिफ्ट्स, डेट याची तर गिनतीच होऊ शकत नाही.प्रेमामध्ये छोटीमोठी भांडण तर होतच असता पण यावर ही आम्ही तोडगा काढलेला.चुकी कोणाचीही असो पण रोज रात्री एकमेकांना फोन करायचा म्हणजे करायचाच.दोघांचेही प्रेम वेड्याचे रूप धारण करू लागले होते.आम्हाला आमचे प्रेम हे असेच वेडे आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायचे होते.आमचे शिक्षण ही आता एकच महिना राहिले होते.यानंतर आम्ही जॉब ला लागणार होतो.त्यामुळे आता पुढे काय करायचे हा प्रश्न सतत आम्हा दोघांना खडसत होता.आमच्या दोघांच्याही जाती वेगळ्या वेगळ्या त्यामुळे घरचे लग्नाला तयार होतील का? एवढा एकच प्रश्न दोघांपुढे उभा ठाकला होता.त्यामुळे नोकरी लागल्यावर सहा महिन्यांनी आपण घरच्यांशी
हा विषय बोलायचा हा निर्णय दोघांनी घेतला.दोघेही चांगल्या गुणांनी पास होऊन नोकरीला ही लागलो.आणि आता एकमेकांबद्दल घरी सांगण्याची वेळ येऊन ठाकली होती.
माझे वडील तर अगदी कडक आणि शिस्तीचे.त्यातच गावाकडे राहणारे त्यामुळे अर्थातच जुन्या चालीरीती आणि रुढीचा पगडा हा होताच.पप्पा काय म्हणतील?
मारणार तर नाही ना? या सगळ्या विचारामुळे माझे त्यांच्यापुढे बोलण्याचे धाडसच होत नव्हते.मेहकच्या वडिलांनी मात्र आमच्या नात्याला पसंती दर्शवली होती.आपल्या मुलीला कोणीतरी स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणार मिळावं आणि मुलगी सुखात राहावी याशिवाय एखादया वडिलांनी के हवे असते.आणि त्यातच ते दिल्ली सारख्या मोठ्या शहरात वावरलेले.नव्या जगाशी ओळख करून त्या जगासबोत चालणारे.त्यामुळे त्यांनी या नात्याला होकार दिला.आता राहिला होता फक्त माझ्या वडिलांचा होकार पण ते उत्तर घेण्यासाठी हिम्मतच होत नव्हती.शेवटी मेहकने मला तिची शपथ दिली.मग काय दहा हत्तीचं बळ जस अंगात शिरावे तस धाडस माझ्यात आलं.आणि पप्पांशी बोलायला मी त्यांच्या समोर गेलो.
पप्पा...
काय रे,बोलना. पप्पा बोलले.
पपांचा आवाज ऐकून मी सगळं एकवटले धाडसाचे बळ आणि हिम्मत हरवून बसलो.पण मेहक ची शपथ होती आणि आज नाही बोल्लो तर परत कधीच बोलू शकणार नव्हतो.म्हणून त्यांना मी सर्व काही माझ्या मनातले सांगून बसलो.
पपांनी तसाच टीव्ही चा रिमोट रागारागात भिरकावला.रिमोट जागेवरच फुटला.आता माझं काही खर नाही मला कळून चुकलं होते.पण तेवढ्यात मम्मी उठली मारूबिरु नका त्याला.लहान नाहीय तो.मी समजून सांगते त्याला.
तुझ्याच लाडामुळे आज हा दिवस बघावा लागतोय.लग्न करायला माझा नकार नाही,पण परजातीच्या मुलींशी लग्न मला कदापि मान्य नाही.मला या समाजात वावरायचंय. पप्पा मम्मीवर चिडून बोलले.
आपल्यासाठी समाज मोठा की मुलाचा आनंद, सुख समाधान.मम्मी माझ्या बाजूने बोलत होती.
माझी या लग्नास समंती नाही.बस विषय संपला. पप्पा खूप रागाने बोलले.आणि त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. त्यांना समजवत मम्मी ही त्यांच्या मागे गेली.मला तर काय करू हेच समजत नव्हते.आणि मेहक शिवाय माझं जीवन याचा तर विचारच करवत नव्हता.तिच्या फक्त दोन वर्षांच्या अंतराने माझी काय हालत झाली होती.आणि आता संपुर्ण आयुष्य तिच्या शिवाय कल्पनाच करवत नव्हती.इथे घडलेला सगळा प्रसंग मी तिला सांगितला.आता काय करायचं आपण? या प्रश्नासोबत तीच रडूच थांबत नव्हते.
मी  काय करू मेहक तूच सांग आता.मला काहीच सुचत नाहीय.
ते मला ही समजत नाहीय.पण मी तुला एवढंच सांगते की मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही.एवढं बोलत तिने रडत रडत फोन ठेवून दिला.
मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग मेहक.मी मनाशीच पुटपुटलो.
त्या रात्री विचाराच्या थैमानामुळे मला झोपच लागत नव्हती.पण पिक्चर मध्ये पाहिल्याप्रमाणे लग्न झाल्यावर मुलगा झाला की सर्व काही ठीक होते.असाच विचार डोक्यात सतत घोळत असल्यामुळे मी धाडस करून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.मध्यरात्रिच मी फोन करून माझा निर्णय मेहक ला कळविला.आणि तिने ही काही दुसरा मार्ग नसल्याने माझ्या निर्णयाला सहमती दर्शवली.दुसऱ्यादिवशीच मी कोणाला काही न सांगता सकाळीच घराबाहेर पडलो.आणि कोर्टाच्या साक्षीने दोघे ही विवाहबंधनात अडकलो.आता आम्ही कायदेशीर पती-पत्नी झालो होतो.मम्मी,पपांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही घरी पोहचलेलो.पण दरवाज्या खटकवायची माझी हिम्मत होत नव्हती.शेवटी मेहकनेच दरवाजा खटकला आणि पपांनी दरवाजा उघडला.पप्पांना बघताच माझे हातपायांना थरकाप चालू झाला.मला लग्न केलेलं पाहून पप्पा एकदम थबकलेच.
तू आज आम्हां दोघांसाठी मेलाय.तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायम बंद झालेत.एवढे खडे बोल सुनावून पपांनी दार धाडकन बंद केले.मेहक मला सावरत म्हणाली असे काही होणार याची आपल्याला जाणीव होतीच.तू खचू नकोस सर्व काही नीट होईल.तिच्या त्या बोलण्याने मला एक उसासा मिळाला.आम्ही दोघे ही मुंबई मध्ये काम करायचो त्यामुळे आम्ही तिथेच भाड्याने घेतलेल्या फ्लॅट मध्ये राहत होतो.दोघांनाही ऊंचच भरारी मारायची होती आणि स्वतःला सिद्ध करायचे होते.त्यामुळे दोघेही आम्ही जोमाने काम करायला लागलेलो.अधूनमधून मम्मीशी ही फोन वर बोलायचो.मम्मीची आणि मेहकची ही चांगली गट्टी जमून गेलती.त्या तासन्तास गप्पा मारायच्या.पण पप्पांनचा राग काही कमी होत नव्हता.आता आम्ही मुंबईमध्ये स्वतःचा 3bhk फ्लॅट देखील घेतला होता.एका तान्हुल्याची किलकारी पण त्या फ्लॅट मध्ये गुंजत होती.आतातरी सर्व काही ठीक होईल असे वाटत होते.पण पपांचा रागाचा चढलेला पारा उतरतच नव्हता.मम्मी,मी,मेहक त्या तान्हुलाची किलकारी सर्वजण त्यांना मनवत.पण ते त्यांच्या निर्णयांवर अटळ होत होते.एकेदिवशी मी कामांवर जाताना माझा अपघात झाला.माझ्या डोक्याला जबर दुखापत झाली.त्यामुळे मी कोमात गेलो.बाप कितीही कठोर असला तरी बापाचंच काळीज ते,माझी अशी खबर मिळताच तडक मुंबईला निघून आले.मी गेल्या दोन दिवसांपासून कोमात होतो.तेव्हापासून मेहकपण झोपलेली नव्हती.रडूनरडून पार तिचे डोळे सुजून गेलते.मम्मी ला तिथं बघताच ती तिच्या गळ्यात पडून घळाघळा रडूच लागली.पप्पा मला बघण्यासाठी icu मध्ये आलेले.त्यांच्या डोळून कधी पाणी व्हायले, त्यांना सुद्धा कळले नाही.मेहक दोन दिवसांपासून झोपली नाही,जेवली नाही कळताच.मम्मी,पपांनि तिला जेऊ घातले आणि तू बाळाला घेऊन घरी जा आम्ही थांबतो इथे.पण मेहक काही मला सोडून जाण्यास तयारच नव्हती.आणि बाळालाही अस जास्त दवाखान्यात योग्य नव्हते.म्हणून तिने बाळाला त्यांच्याकडे देऊन घरी जाण्यास सांगितले.ही काही माझ्या मुलाला सोडून घरी यायची नाही,कदाचित तीच हे वेड प्रेम माझ्या वडिलांनी ओळखले.आणि ते घराकडे निघाले. मी घेतलेला फ्लॅट बघून त्यांना मनोमन आनंद झाला.आपला मुलगा अगदी सुखात आहे याची जाणीव त्यांना झाली.नियतीने आमचा मुलगा लवकर बरा करावा एवढाच देवाकडे धावा करू लागले.त्याचरात्री माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली.मी शुद्धीवर आलो.मम्मी पप्पांना समोर बघताच माझ्या आनंदाला पारावरच राहिला नाही.आनंदाश्रू ओघळू लागले.आता मी कोणत्याच गोळ्या औषधाविना ठीक होऊ शकत होतो.आणि तसच झालं ही मला दोन दिवसात डिस्चार्ज ही मिळाला.आपल्या मुलाला स्वतःच्या जीवपेक्षा प्रेम करणारी मुलगी बायको म्हणून मिळाली आहे.तो सुखी आहे प्रापंचिक दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने ही.यापेक्षा मुलाच्या आनंदापेक्षा आईवडिलांना काय हवे असते.शेवटी त्यांनी आम्हाला दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.आणि आजच्या या घडीला माझे मम्मी-पप्पा मुंबईतच राहताय आणि मी त्यांच्याजवळ राहतोय.जातीभेद ही आपल्या सर्व समाजव्यवस्थेला लागलेली अशी कीड आहे,ज्यामुळे समाज पोखरून निकामी होत चाललाय...

                                                                                     Sanket Torne
                            

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Aug 17, 2018 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

हरवलेल्या प्रेमाचा गंध... Where stories live. Discover now