क्रोध

92 1 0
                                    


क्रोध जेव्हा अनावर होतो ..

साऱ्या संयमाचा पारा तुटतो ..

डोक्यात भिनभिनणाऱ्या विचारांचा त्रयागा वाढतो ..


रात्रीच्या शांततेत मनाचा आक्रोश किंचाळतो ..

अश्रूंच्या समुद्रात आशेचा दगड मात्र केलाच बुडालेला असतो ..

मनात निराशेचा डोंगर अशातच खदखदतो ..


निशब्द भावनांचा पसारा मांडलेला असतो ..

सुटता नं सुटणाऱ्या कोड्याचा गुंता वाढतो ..

अन त्या वर क्रोधाचा कचरा साठतो ..


अशातच एक ठिणगी पडण्याची वाट पाहतो ..

त्या नंतर फक्त आगीचा भडका उडतो ..

साऱ्या भावनांचा, विचारांचा राखेतच तमाशा चालतो ..

क्रोधWhere stories live. Discover now