पहिला.....

1.1K 20 7
                                    

8 June 2025, Dombivli, phadke road
          कानात headphones घालून मी स्वतःच्याच धुंदीत चालत होते .आता प्रचंड उकाडा वाढला होता त्यात हे वातावरण खूपच दमट झालं होतं. उद्या पासून सगळ्या शाळा चालू होणार त्या मुळे रस्त्यावर मुलं व त्यांचे पालक ह्यांची वर्दळ होती. त्याच गर्दीत रस्ता काढत जाणं ही कसरतच वाटत होती.
           आज माझी राघव नावाच्या मुला सोबत पहिलीच date  होति. आमच्या मित्रांनेच आम्हाला set केलेलं. तसं मी त्याला भेटायला जास्त उत्सुख नव्हते पण फक्त मानसी च्या हट्टा मुळे मी आज जात होते. अम्ही CCD मध्ये भेटायचं ठरवलं होतं.
         अचानक माझ्या हातांना थंड पाण्याचा स्पर्श झाला. भास असावा म्हणून मी पुढे चालू लागले तर काही क्षणातच पावसाच्या मंद सरी येऊ लागल्या. धावतच मी एका छपरा खाली गेले. सगळी गर्दी देखील रस्त्याच्या कडेला जमा होऊ लागली.  वातावरणात लगेच सुखद गारवा आला आता थंड वारा ही वाहत होता. तो ओल्या मातीचा वास!! ह्या वासापेक्षा सुंदर अजून काहीच नाही!!पण त्याच सोबत अजून एक स्वर्गीय वास येऊ लागला!! चहा!! मी त्या वासाकडे ओढले गेले व ती टपरी दिसली. थोड्या आतल्या गल्लीत असल्याने ह्या टपरीवर गर्दी तशी कमी होती.
          मी तिकडे टक लाऊन बघतच होते तितक्यात माझ्यावर कोणतरी पाणी उडवले असे वाटले. वळून बघते तर एक महाशय आपले jacket झटकत होते. "ए!! जरा आजूबाजूला बघता जा की!!" तो वळला आणि कळले अरे हाच तो राघव! "Oh I m very sorry!! अरे तुम्ही Hii  मी राघव!!" मी हात मिळवायला पुढे केला पण बघितलं की त्याचं लक्ष वेगळी कडेच आहे!! तोही त्या चहाच्या केटलीकडेच बघत होता.
           " मी शर्वरी " मी जरा ओरडून बोलले . भानावर आल्यावर त्याने थोडं लाजूनच हात मिळवला.
        तसा cute होता तो... आणि तसही स्वतःला दीड शहाणे समजणाऱ्या मुलांन पेक्षा जरा लजणारीच मुलं मला जास्त आवडतात. तसा खूपच बडा साहेब असल्या सारखे कपडे होते त्याचे. Nike चे shoes Titanच घड्याळ ...नाही मी gold digger नाही पण ह्या गोष्टी नजरेत आल्याचं.
      मग काय आम्ही तसं हवामानाच्या वगरे गप्पा मारायला लागलो . आता पावसाचा वेग वाढला होता अगदी धो धो पाऊस पडत होता. तेवढ्यात अजून एक वास आला. टपरी वरच्या काकांने आता गरमा गरम भजी तळायला घेतल्या होत्या.  लगेचच आमच्या नजरा तिकडे वळल्या. पहिला पाऊस आणि समोर चहा आणि भजी अजून काय पाहिजे!! त्या CCD मधली थंड कॉफी प्यायची अजिबातच इच्छा नव्हती आता .
       आम्ही दोघंही त्या कढई कडेच बघतोय हे आमच्या भानावर आला. "आपण इकडेच खाऊया!!" आम्ही दोघं एकत्रच म्हणालो. दोघं  जोरात हसायला लागलो!! बसून लगेच "मित्रा २ प्लेट भजी आणि २ कटिंग" असं तो म्हणाला.
वाह आमचं तसं चांगला जमणारे दिसतय!!
            पहिला पाऊस त्यात भाजी आणि चहा आणि एक छोटीशी टपरी ह्यापेक्षा सुंदर पहिली date काय असणार !!!!
       

      
       
    

पहिला....Où les histoires vivent. Découvrez maintenant