सुगंधा भाग- १

10.5K 17 0
                                    

गावाच्या वेशीवरच संपतराव पाटलांचा चौसेपी वाडा होता. पाटलांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. त्याबरोबर जोडधंदा म्हणुन घरात सहा दुभत्या गाई पाळल्या  होत्या. गावाबाहेर गोपाळ डेअरी चा  मोठा प्लांट होता. सकाळी रोजच्या रोज दुधाचा टॅंकर गावात येत असे आणि सर्व दूध घेऊन जात असे. त्यामुळे घरामध्ये सतत लक्ष्मी नांदत असायची.

सहा महिन्यापूर्वीच संपतरावांनी आपल्या मुलाचे लग्न एकदम थाटामाटात लावुन दिले. विलास संपतरावांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासुन विलास तसा  खुप महत्वाकांशी होता. त्याला स्वतःची अशी वेगळी ओळख बनवायची होती. संपतरावानी सुद्धा कधीही त्याला अडवले नाही. शहरात जाऊन विलास ने हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स केला होता. त्याच्या शिक्षण आणि हुशारीच्या जोरावर विलासने युरोपमध्ये त्याने मोठ्या जहाजावर कुक म्हणुन नोकरी मिळवली. तीन वर्ष समुद्राच्या विश्वात राहुन विलासला गावाची ओढ लागली. पैसा तर त्याला हवा तसा मिळत होता. पण घरापासुन, गावापासुन दूर राहून स्वतःच्या मनाचे तो सुख हरवून बसला. शेवटी सहा महिन्यापूर्वी त्याने गाव गाठले. आपला मुलगा घरी परतल्याने संपतराव आणि त्यांची बायको खुप खुश झाले. त्याचे मन बदलण्याच्या आधीच त्यांनी विलासला लग्नाच्या बेडीत अडकवले.

गावी परतल्यावर विलासने परदेशी जाण्याचा विचार काढुन टाकला. त्याने गावात राहुनच शेती बरोबर अनेक जोडधंदे सुरु केले. त्याला शेतीच्या कामासाठी वरचेवर तालुक्याच्या गावी जावे लागत असे. आपल्या बायकोचे त्याने अजुन तोंडही नीट पाहिले नव्हते. अनिता सारखी सुंदर आणि सालस बायको मिळाल्याने विलास मात्र मनोमन खुश होता. परदेशी असताना जहाजावरच्या आखुड कपड्यातल्या बायका पाहून त्याचे मन कामवासनेने जागृत व्हायचे. पण रांगडया विलास पाटलाला लग्नाआधी एकाही स्त्रीचा सहवास लाभला नव्हता. लग्नानंतर अनिताच्या कोवळ्या शरीरावर तो अक्षरशः तुटून पडला. प्रत्येक रात्री तिच्या शरीराचा अगदी चोळामेळा करून टाकायचा. सुरवातीला अनिता अगदी थंड पडून नवऱ्याच्या हरकती सहन करायची. हळूहळू ती सुद्धा नवऱ्याबायकोच्या प्रेमाच्या सुगंधाचा मनापासुन आस्वाद घेऊ लागली. आपल्या धन्याला नक्की काय हवे आहे तिला अचूक समजले. विलास आणि अनिताचा संसार सुखाने सुरु झाला होता.

सुगंधा Dove le storie prendono vita. Scoprilo ora