▪10▪ | Episode 1 | Marathi story | मराठी

304 2 0
                                    

या जगामध्ये काही जण देवांवर विश्वास ठेवतात तर काही जणांना देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही. सर्वांचे आपापले विचार असतात.

असो. तर मी आहे जोनास आणि मी एफबीआय (FBI) मध्ये गेली 10 वर्षे काम करतोय. जेव्हा माझी बदली झाली आणि मी मियामी मध्ये आलो तेव्हा माझ्या आयुष्यात बरेच बदल झाले. यापूर्वी असे प्रकरण कधीच सोडवले नाही. आणि नास्तिक असल्याने मला हे सर्व समजू शकले नाही. मिसुरीमध्ये जेव्हा मला पहीली केस प्राप्त झाली आणि जेव्हा मी आणि माझी टीम गुन्हेगाराच्या ठिकाणी पोहोचलो . एका झाडावर 10 मुली लटकत होत्या. प्रत्येक मुलीच्या डोक्यावर क्रॉस मार्क होते. ते दृश्य पाहून मला खूप भीती वाटली. मी या केसचा तपासकर्ता (investigation officer) होतो. मला धैर्याने काम करावे लागणार होते . पण ते दृश्य पाहून मी विचार करीत होतो की एवढी भयंकर अशी कृती कोणी कशी करू शकते. ऑफिस मध्ये परत आल्यानंतर आणि माझ्या सहकारयांशी याबद्दल बोलल्यानंतर मला कळाले की मियामीमधील ही तिसरी वेळ आहे असे घडल्याची . पूर्वी देखील दोनदा दहा मृतदेह झाडावर सापडले होते. दर तीन दिवसांनी मियामी मध्ये असं काहीतरी घडलं. मुलींचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत होते. मला आणि माझ्या संपूर्ण टीमला काहीच समजत नव्हते . मुलींना ज्या प्रकारे मारले गेले ते पाहून असे दिसून आले की कोणत्यातरी मनोरूग्ण (psycho) चे काम असेल पण अजून कोणत्याही निष्कर्ष काढला जाऊ शकत नव्हता. त्याच्या डोक्यावर जो क्राॅस (✝) होता अस वाटत होत की हे सगळे झालेले खुन धर्माशी जोडलेल आहेत आणि खुनी त्या क्राॅस ने आम्हाला काही तरी सांगत असावा.
.......
झाडाखाली एक ट्रक थांबला. एक माणूस ट्रक मधुन बाहेर आला. त्याने ट्रकमधून एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला , दोरीने बांधला आणि झाडावर लटकावला. त्याने अशा प्रकारे दहा मृतदेह झाडावर टांगले. नंतर तो माणूस ट्रकमध्ये बसला आणि तेथून निघून गेला. ट्रक महामार्गावरून खाली उतरला आणि खडबडीत रस्त्यावर गेला. तो थोडा पुढे गेल्यानंतर थांबला. तिथे फक्त एक घर होते, तो त्या घरात गेला आणि घराचा दरवाजा उघडला आणि आत गेला, घर लखलखीत दिसत होते, ती व्यक्ती स्वयंपाकघरात गेली आणि फ्रीजमधून बिअर बाहेर काढली आणि एका खोलीत गेला. त्या खोलीत पलंगाच्या अगदी समोरच एक पुस्तक शेड होते, त्याने पुस्तकातील शेडची सर्व पुस्तके बाहेर काढली आणि पुस्तकाच्या शेडच्या मागे एक छिद्र होते. त्या छिद्रात चावी ठेवून त्याने दरवाजा उघडला. त्या दाराच्या मागे एक पायरया होत्या , जे तळघरात उतरत होत्या . तो माणूस तळघरात उतरला तिथे दहा मुलींना बांधले होते. -
.......
"शआआआआआआआ. . ओरडू नकोस, नाहीतर मी हा चाकु ने तुझे शरीर दोन भागांत विभागले जाईल" तो माणसु मुलीकडे बघून ओरडाला . त्या माणसाने एका मुलीला त्याच्याकडे खेचले आणि त्या मुलीला म्हणाला , " बोलव तुमच्या देवाला , तो तुम्हाला मदत करायला आला आहे काय?" मुलगी खूप घाबरली होती, ती मोठ्याने ओरडत होती. त्या माणसाने विजेचे कटर चालू केले आणि मुलीच्या डोक्यावर क्रॉस(✝) चिन्हांकित केले. सर्व मुलींच्या डोक्यावर क्रॉस चिन्हांकित केल्यावर त्या माणसाने सर्व मुलींना चाकुने गळाकापुन ठार मारले. सगळे तळघर रक्ताने लाल झाले होते.

क्रमशः..........

सदर कथा ही काल्पनिक असून यातील नमूद केलेले व्यक्ती , स्थळ आणि संस्था यांचा चालु जीवनाशी काहीही संबंध नाही.

लाईक करा आणि कमेंट करा...🙏

▪10▪ |  Marathi story Series  | Psycho Thriller  | मराठीWhere stories live. Discover now