आपण धार्मिक असल्यास आपण अस्तित्त्वात नसलेल्या एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आणि देव अस्तित्त्वात नाही हे सिद्ध करण्याची गरज नाही.
ही गोष्ट सिद्ध झाली आहे जेव्हा मनुष्य हुशार झाला, त्याने देवाला तयार केले. तुम्ही धार्मिक आहात, तर मग तुम्ही भ्याड असणे आवश्यक आहे.
कारण धर्म आणि देवाचे कार्य माणसाला घाबरविन्याच च आहे. लोकांनी देवाचा चांगला उपयोग केला आहे जसे की पैसे कमावण्यासाठी, घाबरवण्यासाठी, लोकांना वेगळे करण्यासाठी, इत्यादी.
देव तर सर्वांचे चांगलेच पाहतो. मग त्याने वाईट गोष्टी का निर्माण केल्या.
जगात काही ना काही कारणासाठी युद्ध होतात . लाखो लोक मारले जातात. लढाईत सैनिकांना कैदी बनविले जाते आणि त्यांचे काय होते हे आपणास चांगले माहित असते.
त्याच युद्धात स्त्रियांची स्थिती पण आपण शब्दांत सांगु शकत नाहीत. हिटलरने ज्युस लोकांचे काय केले, भारतातील उच्च जातीचे लोक खालच्या जातीच्या लोकांना कस वागवतात हे देखील तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.
जर देव तिथे असेल तर त्यांनी हे सर्व का थांबविले नाही?
बिग बॅंगच्या (Big Bang theory) दरम्यान, युनिवर्समधील सर्व जागा आणि उर्जा तयार झाली. या विशाल स्फोटात सर्व दिशेने वस्तू फेकल्यामुळे जागेचा विस्तार झाला.
जसजसे ब्रह्मांड थंड होत गेले , त्यात एकत्रितपणे आकाशगंगा, तारे आणि ग्रह तयार झाले . होय, जगाचा जन्म अशाप्रकारे झाला.
आणि ही सर्व नैसर्गिकरीत्या चालू असलेली प्रक्रिया आहे. यामध्ये कोणाताही देव सामील नाही.
आता तुम्हाला नास्तिकलोकांन बद्दल काय वाटते?
देशाच्या घटनेला (constitution) ला फाॅलो करा. कोणताही धर्मो उपदेश , शास्त्र वाचण्याची गरज नाही. जर तुम्ही एखादा गुन्हा केला तर तुम्हाला नक्कीच शिक्षा मिळेल. देशात कायदा नसता तर कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा झाली नसती.
कारण देव कोणालाही शिक्षा करीत नाही.
- ही कबुली लिओ ने न्यायाधीश समोर दिली.समाप्त - THE END...
Story कशी होती , Please comment it down.
YOU ARE READING
▪10▪ | Marathi story Series | Psycho Thriller | मराठी
Mystery / Thriller.Marathi psycho thriller....