: सेंट मेरी चर्च , मियामी ....
संध्याकाळचे सहा वाजत आलेत. चर्च चा पाद्री मनातल्या मनात जप करत होता.
" देव चर्चमध्ये आहे असे तुम्हाला का वाटते?" मागुन आवाज आला म्हणुन पाद्री ने मागे वळून पाहिले.
एक उग्र चेहरा असलेली व्यक्ती लाकडी बाकावर बसून बोलत होती.
" होय येथे देवाचे वास्तव्य आहे " पाद्री म्हणाला.
" मग काही दिवसापूर्वी चर्चमध्ये मुलीवर बलात्कार कसा झाला? " - माणसाने विचारले.
" माझ्याकडे उत्तर नाही " - पाद्री म्हणाला.
"तर याचा अर्थ असा आहे की संपूर्ण जगात देव नाही. जर चर्चमध्ये देव असता तर ती मुलगी वाचली असती. तुम्ही हे सगळं घडल्यानंतर नास्तिक झाले असते तर बरं झालं असतं, फादर ". - तो माणूस म्हणाला.
"आपण देव नाही असा विचार का करता? " पाद्री म्हणाला.
" मला वाटत नाही की अस देव वगैरे काही आहे .आपण या जगात जगण्यासाठी जन्माला आलो आहोत. आणि आपण कसे जगायचे ते आपल्याला ठरवावे लागेल ".- तो माणूस उत्तरला
" जर आपण गुन्हे केले तर देव नक्कीच आपल्याला शिक्षा करतो "- पाद्री म्हणाला .
"बरं आपणास काय वाटते ? की त्या बलात्कार केलेल्या आरोपी ला देवाने शिक्षा केली? " - त्या माणसाने विचारले.
" होय नक्कीच " - पाद्री म्हणाला .
" नाही, अमेरिकन कायद्यानुसार त्याला शिक्षा झाली " - माणूस म्हणाला.
" बरं, मग तुम्हाला ते 10 -10 मुलींच्या हत्या होत आहेत ते माहितच असेल ". - त्याने विचारले.
" होय, माहित आहे मला " - पाद्री म्हणाला.
" आणि मुलीच्या डोक्यावर क्रॉस मार्क होता " - तो माणूस .
होय मला माहित आहे - पाद्री.
" ते क्राॅसचे चिन्ह देवाचे आहे, बरोबर ? " - तो माणूस
" हो नक्कीच आहे " - पाद्री
" तर मग देवाने या सर्व खूनांना परवानगी दिली " - तो माणूस म्हणाला
" म्हणजे "- पाद्री .
" याचा अर्थ असा आहे की देव यासारखी कोणतीही गोष्ट नाही." - तो माणूस.
" पण तुम्ही हे कसं सिद्ध कराल? " - पाद्री
" कारण , मीच त्या चाळीस मुलींना ठार मारले आणि त्यांच्या डोक्यावर क्रॉस काढले आणि नंतर त्यांना झाडावर टांगले." तो माणूस म्हणाला.
" आपण या सर्व खून केले आहेत ? " पाद्री ने विचारले.
" होय " -तो माणूस.
" पण का, तू त्या निर्दोष मुलींना निर्दयपणे मारलस. " - पाद्री
" अर्थातच त्या मुली निर्दोष होत्या, परंतु मला त्या मुली ठार मारून हे सिद्ध करायचे होते की देव अस्तित्वात नाही." - तो माणूस म्हणाला.
" आपण मानसिकरित्या आजारी आहात ." पाद्री म्हणाला.
" आपण असे म्हणू शकता कारण हा आपला शेवटचा दिवस आहे. " तो माणूस म्हणाला.
" पण का ? मी काय केलं? " - पाद्री
" ओह , तुम्ही काही नाही केलं फादर . मला हे बघायचंय की तुमचा देव तुम्हाला वाचवण्यासाठी येणार की नाही? ". तो माणूस म्हणाला .
एवढं बोलून त्या माणसाने पाद्री ला खाली पाडले आणि त्याच्या गळ्यात सपासप चाकू दोन तीन वेळा घुसवला . नंतर त्याने ते पाद्री चे रक्त हातात घेतले आणि सेंट मेरी च्या पुतळयावर ऊडवले.क्रमशः.....
लाईक करा आणि स्टोरी कशी आहे ते कमेंट मध्ये कळवा. 🙏 follow me......
DU LIEST GERADE
▪10▪ | Marathi story Series | Psycho Thriller | मराठी
Mystery / Thriller.Marathi psycho thriller....