कित्येक दिवस निघून गेले ... आई आता श्रुती कडे विसावली होती.. शेती बटईने देऊन ती तिथेच राहत होती ..
पावसाने आज हद्द पार केली होती ... त्याला माहित नाही काय झालं होतं .. आभाळ फाटल्यासारखा पडत होता तो .. श्रुतीने घाई घाईत सर्व आटोपलं आणि ती ऑफीस ला निघाली .. जात जात तिने सत्यम ला म्हटलं .. सत्यम मी निघतेय टिफिन घेऊन जा .. आणि तिने दार ओढलं .. मुंबईतील सर्व रस्त्यावर पाणी भरलं होतं आणि तिची कर खाड्यांमुळे हेलकावे खात होती जशी काही होडी चालतेय.. तिने चार शिव्या महानगरपालिकेला हासडल्या आणि ती ऑफीस ला पोहचली .. अर्धी जनता पोहचायचीच होती .. तेवढ्यात तिला एम डी च्या केबिन मधून बोलावणं आलं आणि ती गेली
सर बोलावलंय
हो श्रुती .. बैस
प्रेम गेला खूप वाईट झालं .. ते बोलत होते .. पण काय ग कितीही वाईट वाटलं तरी दुनिया थांबत नाही ना
हो सर
प्रेमच्या पोसिशन ला आम्ही तुला प्रमोट करायचं ठरवलंय .. त्यांनी तिच्या समोर लेटर ठेवून बोलले
सर .. ती अबोल झाली
हे तुझं प्रमोशन लेटर
थँक्स सर .. पण मला नको आहे हे प्रमोशन ..
तिला अश्रू आवरत नव्हते म्हणून ती निघाली आणि सरळ आपल्या जागेवर आली तर तिच सामान गायब होतं तेवढ्यात ऑफिसबॉय आला आणि त्याने सांगितलं कि तिची सीट आता प्रेमच्या केबीन मध्ये शिफ्ट झाली आहे ती ओशाळली आणि प्रेमच्या केबिन मध्ये बसली ..
तिला ते सर्व क्षण आठवू लागले जे तिने जगले होते तिच्या भावना अनावर झाल्या होत्या .. तिने मागे बघितले पाऊस धूआधार पडत होता तिने बाहेर पडणाऱ्या धारा मनात साठवल्या पण मनातल्या धारा साठवायला डोळे अधुरे होते .. त्या पापणीवर पाऊस घेऊन आल्या ... तिच्या चेहऱ्यावर डोळ्यातून गंगा जमूना वाहू लागल्या ... ती बेचैन होऊ लागली