मिस्टर प्रेम कुठे आहेत ?
ते आता नाही राहिलेत ...
ओह माय गॉड ..
का ?
मिसेस सरदेसाईला हे माहित नाही .. त्या प्रेमला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करत आहेत
काय पण त्या तर ...
नाही ते एक मेडिकल मॅजिक आहे ... त्या गेल्यातच जमा होत्या पण का कोण जाणे माझ्या एक युक्ती कामात आली ...
ओह माय गॉड ...
श्रुती संपूर्ण खचली होती ... तिने लगेच कर काढली आणि ती तळेगावच्या दिशेने निघाली .. तिने कुणालाही काही सांगितलं नाही तिची गाडी खूप वेगात जात होती आणि ती अपराधीक विचारात होती त्यामुळे तिला लक्षात पण येत नव्हतं ... तिने पनवेल पास केलं आणि समोर जुन्या मुंबई पुणे रोड ला लागली असेल तेवढ्यात ती;या महड जवळ सत्यमचा फोन आला ...
बोल सत्यम ?
कुठे आहेस ?
तळेगावला चालली आहे
तळेगावला कशाला ?
अरे मिसेस सरदेसाई जिवंत आहेत
काय ? !!!!
हो
थांब मी पण येतो ...
नको तू मुलांची आणि आईची काळजी घे कुणाला काही सांगू नकोस
श्रुती तळेगावला पोहोंचली पण कशिश तिथे नव्हती .. ती पुण्याला गेली होती .. म्हंणून श्रुती पुण्याला जायला निघाली ...
पण कशिश ला शोधू कुठे मग तिला आठवलं प्रेमच्या डायरी मध्ये त्याच्या पुण्याच्या घराचा पत्ता लिहलेला आहे ... तिने लगेच पल्लवीला फोन केला
हे पल्लवी कुठे आहेस
मॅरीयॉट ला का गं ?
एक काम करतेस
बोल ना डिअर
तू ऑफिस ला जा ?
आता
हो आणि जाऊन मला फोन कर
ठीक आहे .. पल्लवी तशीच उठली आणि ती ऑफिस ला गेली सोबत शब्द पण होता ...