कार्पोरेट वाईफ- पर्व दुसरे - भाग तिन

1.8K 1 0
                                    

हाय पल्लवी

हे शब्द  .. इकडे कसा आज? 

श्रुती ला भेटायचं होतं 

ओह!! स्पेशल काही? 

नाही.. स्पेशल काय असणार? 

चल लेट्स हॅव सम कॉफी

येस व्हाय  नॉट? 

ते दोघे बाजूच्या एका कॉफी शॉप मध्ये गेले. कॉफीचा आस्वाद घेताना त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.. आणि नंतर त्यांच्या भेटी गाठी वाढत गेल्या.. पल्लवी आणि शब्द  चे संबंध वाढू लागले होते ... कधी कधी टकीला शॉटवर तर कधी स्मिर्नप वर त्यांनी वेळ घालवायला सूरुवात केली होती.. त्याचे हे सोबत राहणे श्रुतीला बाहेरून कळले पण तरी ती बिनधास्त होती कारण तिला एक माहित होते प्रेम ने जर शब्द  तयार केलाय तर त्याने तसेच एक दोन लोक पण तयार केले असतील .. त्यामुळे तिने प्रेमच्या डायरीतून बारकाईने डिटेल्स बघणं सुरु केले पण तिला पाहिजे तसे काही भेटत नव्हते आणि ती आता थोडी चिंता ग्रस्त होत होती कारण शब्द  कडून वाढिव  पैश्याची मागणी व्हायला लागली होती .. 

अश्याच काळजीत बसलेली संपूर्ण विचारग्रस्त श्रुती चहाचा कप घेऊन आपल्या केबिन मध्ये बसली होती तेवढ्यात तिच्या डिपार्टमेंटमधले दोन महत्वाचे एम्प्लॉयी आपले रिसिग्नेशन घेऊ आले आणि ती संपूर्ण खचली तिने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते समजण्याच्या पलीकडे होते आता तिच्या कडे काम करतील अशी एक सागरिका आणि ती बाकी दोन तर एकदम नवीन होते असून नसल्यासारखे तिला डिपार्टमेंट सांभाळावं कसं हे लक्षात येत नव्हतं आणि मग तिला प्रेम सोबतचे ते क्षण आठवू लागले .. ती तडक उठली आणि सरळ मॅरीयॉट ला गेली तिथेच जिथे ती आणि प्रेम पाहिल्यादिवशी भेटले होते .. तिने गाडीची चाबी घेतली आणि ती सरळ त्याच रूम  मध्ये गेली तिला अश्रू अनावर झाले होते ती बेचैन होत होती आणि तिला का कोण जाणे असं वाटलं प्रेम अजूनही तिच्या जवळ आहे .. तिने एक रेडवाईन चा पेग मागवला आणि तिने त्या पेग मधून एक एक सिप घेत बसली .. सिप घेता घेता तिला प्रेमच स्पर्श जाणवू लागला आणि ती बेचैन होऊ लागली तिने डोळे मिटले आणि ती एका आराम खुर्चीवर पडून राहिली .. तिला का कोण जाणे प्रेम जवळ आहे आणि तोच आपल्याला हिम्मत देतोय अस वाटू लागलं . ती खूप भावुक झाली होती. बराच वेळ झाला म्हणून ती खाली आली आणि निघणार तेवढ्यात तिला पल्लवी दिसली .. 

कार्पोरेट  वाईफ  - पर्व दूसरेDonde viven las historias. Descúbrelo ahora