कार्पोरेट वाईफ- पर्व दूसरे भाग दोन

2.6K 1 0
                                    


्रुती ऑफिस ला पोहचली तेंव्हा दुपारचे १२ वाजले होते तिने आज हाल्फ डे घेतला होता कारण तिच्या मुलीची आज टीचर पॅरेण्ट मीटिंग होती .. ती सकाळी स्कुल मध्ये गेली आणि मग तिने ऑफिसला पलायन केलं .. मुलीच्या शिक्षणाचं तस तिला काही टेन्शन नव्हतं कारण ती हुशार होती .. आणि ते टीचर्स तिला नेहमीच सांगत होते पण तिला तिने एक्सट्रा कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटी कराव्यात असं वाटत होतं .. तेच ती आज इन्सिस्ट करत  होती ..खूप वेळ दिला तिने आणि मग ऑफिस ला निघाली .. कार मधून जात जात तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं आणि ती हाच विचार करत होती कि आपल्या बॅकऑफिस ला कस व्यवस्थित करता येईल .. तिच्या डोक्यात टीम च्या एक एक जणांचा आलेख येत होता आणि तिला पाहिजे तसा कोणी व्यक्ती नव्हता .. जो प्रेम असताना ती रोल सांभाळायची तास सांभाळणारा .. तिने नवीन एम्प्लॉयी घेण्याचा निर्णय घेतला आणि ऑफिस मध्ये येताच तिने तो बॉस ला सांगितल पण .. 

मग आहे का कोणी नजरेत तुझ्या श्रुती ? बॉस ने विचारलं 

नाही सर .. मी नवीन मुलगा घेणार .. नवीन असेल तर शिकण्यासाठी त्याच्या कडे खूप काहीच असेल आणि त्याचे नवे डोके खूप काही करू शकेल 

श्रुती ने खूप लोकांना बोलावले .. पण पाहिजे तास चुणचुणीत मुलगा कुणी तिला भेटत नव्हता .. तिने तात्पुरते ते काम एकाला दिले आणि त्याच्यासोबत बसून ती प्लॅन करू लागली .. रात्रीचा दिवस होत होता श्रुतीला यायला उशीर होत होता .. तिने सर्व आलेख लोकांच्या डोक्यात फिट करत असताना तिच्या ब्लॅकबोर्ड वर  शिल्लकी राहत नव्हती ... ती स्वतः सर्व काँट्रोलींग मेजर्स तपासून बघत होती .. पण तिला समाधान मिळत नव्हतं .. सर्व आता रात्रीचा दिवस करून तिला जे हवं तास काम करण्याचा प्रयत्न करत होते .. एक दिवस तिच्या डोक्यात आलं कि सॉफ्टवेअर मध्ये आपण काही इम्प्रोव्हमेन्ट केल्यात तर किती बरं होईल ना सध्यस्थितीत तिला तो विचारही समाधान देऊन गेला तिने सॉफ्टवेअर  इंजिनियर्स ला बोलावले ..पण खास काही होत नव्हतं .. ती बेचैन होत होती .. एक दिवस तो सहज एका हॉटेल यामध्ये जेवायला गेली होती .. दुपारी टिफिन आणला नव्हता तिने आणि  मग तिला वाटलं चला जेवण करून यावं .. ती जेवायला बसली आणि कुणीतरी मागून येऊन म्हटलं 

कार्पोरेट  वाईफ  - पर्व दूसरेDonde viven las historias. Descúbrelo ahora