sorry काकू: भाग १

9.2K 26 2
                                    

नमस्कार मंडळी , कसे आहात सगळे , वाचताय ना वाचत च राहायला पाहिजे आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी माझी पहिली चावट कथा घेऊन आलो आहे , तर चालू करूया या कथेला. कथा आवडली तर नक्की vote करा आणि कशी वाटली ते सुद्धा comment मध्ये सांगा.

पूर्वसूचना- ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे , यात दाखवलेलं सगळे पात्र हे काल्पनिक आहे त्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही आहे. आणि ही कथा या गोष्टीतील एक काल्पनिक पात्र केतन सांगत आहे. तर चला कथेला सुरुवात करूया.

---------------------------------------------------------

माझं नाव केतन आग्रे. वय २०,रंग गहुवर्निय , उंची ६.२" .रहायला मुंबईतल्या एका छोट्याश्या ३ मजली जुन्या इमारतीत. ती एक सभ्य व सुसंस्कृत लोकांची सोसायटी होती तसा मी पण सभ्य च होतो पण कॉलेज मधले असे अतरंगी आणि चावट मित्र मिळाल्यावर कोण बर सभ्य राहील? मात्र ही गोष्ट मी कधी घरी कळू दिली नाही किंवा असे कोणतेही कृत्य नाही केले जेणे करून कॉलेज मधल्या ब्लॅक लिस्ट मध्ये नाव येईल त्यामुळे आपल्या पालकांची कॉलेजला फेरी होईल. नुकताच डिग्रीच २ र्या वर्षाची परीक्षा संपली होती व आम्ही आता डिग्रीच्या अंतिम वर्षाला जाणार होतो एवढा तर विश्वास होता की आम्ही सगळे पास होऊ.
माझे तसे जास्त काही मित्र नव्हते पण जे होते ते सगळे चावट आणि खुप मस्तीखोर होते. कॉलेज मध्ये पण आमचा ग्रुप खूप प्रसिद्ध होता चावट पणा सोबत आम्ही सोशल कामात पण अग्रेसर असायचो. त्यामुळे कॉलेजच्या शिक्षकांचा ही आमच्यावर विश्वास होता. तेव्हा आम्ही ग्रुप ने ठरवल की जी काही चावटगिरी करायची ती कॉलेज च्या बाहेर , आसपास सुद्धा नाही.
माझ्या ग्रुपमध्ये आम्ही ४ जन होतो. मी, विशाल, मोहन आणि उमेश असा आमचा ४ जणाचा ग्रुप होता. विशाल हा आमच्या मध्ये senior होता वय २३,कारण तो २ वेळा परीक्षेत नापास झाला होता आणि सगळ्या चावट करामती मागे ह्याच डोकं असायचं. आम्ही बाकी तिघे जण नुकतीच विशी ओलांडली होती. दुसरा मोहन हा दक्षिण भारतीय होता तो आपल्या सावत्र आई आणि वडिलांसोबत मुंबईला ४ वर्षा पूर्वी रहायला आलेला. त्याची खरी आई त्याला लहानपणी सोडून गेली आणि मग त्याच्या वडिलांनी दुसरा लग्न केला जेणेकरून मोहन चा सांभाळ करेल. पण त्याला त्याची सावत्र आई आवडत नसे तो तिला कधीच आपली आई मानत नसे. त्याच्या वडिलांची मुंबई ला बदली झालेली ते एका सरकारी नोकरीत चांगल्या पगारावर कामाला होते कामावर असताना त्यांनी अजून एक फ्लॅट घेतला होता तो माझ्या एरिया मध्ये च होता ते तिथे स्थायिक होणार च होते. तेव्हा एके दिवशी मोहन चे वडील कामाला जात असताना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्यानंतर मग तिथे कोणी रहायला आले नाही. काही काळाने ती खोली भाड्याने दिली. आणि तिसरा उमेश एकदम व्यसनी मुलगा पण क्रिकेट च व्यसन असल्याने तो आमच्या ग्रुप मध्ये होता.त्याला एक दिवस आपल्या भारत टीम मधून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायच होत , त्यासाठी तो तशी मेहनत ही घेत होता. तो ही आपल्या आई वडील आणि एक बहीण अशा कुटुंबात राहत होता. अशी ही आमची मैत्री होती.
परीक्षा संपल्या कारणाने सुट्टी पडली होती. मग काय पूर्ण दिवस विरंगुळा, दिवसभर इकडे तिकडे हुंदडने , चावटगिरी चालूच असायचे. पण याचा ही कंटाळा येऊ लागला. त्यामुळे आम्ही मग सगळ्यांनी मिळून कुठेतरी बाहेर beach किंवा resort vr २-३ दिवसाचा जायचं बेत केला . आणि सगळ्यांनी तशी आपल्या parents कडून परवानगी सुद्धा घेतली होती पण मोहन ची सावत्र आई त्याला बाहेर जाण्याची परवानगी देत नव्हती.

आता साठी इथेच थांबतो, मोहन ची आई पिकनिक साठी परवानगी देईल की नाही ?ते बघुया पुढील भागात ..
तुम्हाला काय वाटतं तेही कळवा मेसेज अथवा कमेंट करून , बिनधास्त ...

क्रमशः...
-------------------------------------------------------

Sorry काकू....Where stories live. Discover now