विज्ञान विषयाचे महत्त्व
भारताला एकविसाव्या शतकात नेत असताना शिक्षणाचे ध्येय फक्त संपत्ती कमवण्याची क्षमता देणे एवढेच नसून जबाबदार नागरिक भरवणे हेही आहे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता बरोबर भावनिक वैचारिक सामाजिक नैतिक व्यक्तिमत्व निर्माण करावयाचे असेल तर नव्या सुधारणांसह विज्ञानवादी दृष्टिकोनातून मुलांना शिक्षकांना पालकांना सुद्धा प्रशिक्षित केले पाहिजे विज्ञान हा विषय पुस्तकातील भाग म्हणून पाठांतर करणे असा न करता आपल्या विविध कृतीतून विद्यार्थ्यांना शिकवणं महत्त्वाचे आहे तोंडी शिकवण्यापेक्षा कृतीतून विद्यार्थ्यांना शिकवल्या विद्यार्थ्यांना ते जास्त काळ लक्षात राहते त्यामुळे या विषयात कृती ही महत्त्वाची आहे विज्ञान विषयामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांची प्रगती होते असे नाही तर संपूर्ण समाजाचे देशाची प्रगती देखील विज्ञान विषयावर आधारित आहे आज आपण एलईडी टीव्ही लॅपटॉप स्मार्टफोन इत्यादींचा वापर करत आहे आपले दैनंदिन जीवन सोयीचे सुखाच्या होण्यामागील कारण विज्ञानच आहे विज्ञानामुळे आपली सर्वांगीण प्रगती होत असते त्यामुळे या विषयाला कमी लेखून चालता येत नाही त्या विषयाचे महत्त्व जाणणे महत्वाचे आहे
YOU ARE READING
विज्ञान विषयातील अध्यापनाच्या पद्धती
Science Fictionआपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व खूप आहे.सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्याला विज्ञान दिसून येते.आपल्या दैनंदिन जीवनातून विज्ञानाला आपण वेगळे करू शकत नाही .आपले चांगले बोलणे उठणे नीट बोलणे राहणे या सर्व गोष्टी...