chapter 5

1 0 0
                                    

विज्ञान प्रदर्शन
विज्ञान विषयाचा अभ्यास वाढवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयोगी ठरते .यामध्ये विद्यार्थी स्वतः साहित्य तयार करतात .साहित्य तयार करताना ना लागणाऱ्या वस्तू जमा करतात . त्यामागील शास्त्रीय कारण शोधतात विचार करतात निरीक्षण करता आणि वस्तू तयार करतात.आणि स्वतः तयार केलेली असल्यामुळे ते त्यामागील विज्ञान विसरू शकत नाही .दरवर्षी विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करता येते.यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा .विद्यार्थ्यांना साहित्य निवडण्यास सांगावे .दररोज त्यावर चर्चा करावी.त्यात काही अडचणी असतील तर समजून सांगावे प्रत्येक मुलात मुलगा यात सहभागी होईल याची दक्षता घ्यावी .साधे छोटे प्रयोग असली तरी मुलांना ते कळू द्या आहे त्यामुळे त्यांचा त्यातील आत्मविश्वास वाढतो.त्याचप्रमाणे विषयातील आवड त्यांच्यात निर्माण होते .माझ्या शाळेत मी पाचवी ते नववी पर्यंतचे जवळपास दीडशे विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शन दरवर्षी सहभाग घेते.विद्यार्थी स्वतः त्यात सहभागी होतात साहित्य तयार करतात .येणाऱ्या अडचणी वर चर्चा करतात.एखादं साहित्य तयार होत नसेल तर दुसरं साहित्य तयार करतात त्यावर आधारित पोस्टर तयार करतात मोठ्या आवडीने याच्यात सहभागी होतात जे विद्यार्थी सहभागी होत नाही ते विद्यार्थी सहभागी विद्यार्थ्यांना मदत करतात.त्यामुळे आपोआपच त्यांचे सुद्धा विषयातील ज्ञान वाढते त्याच प्रमाणे या प्रदर्शनाच्या वेळी पालकांना सुद्धा बोलवले जाते.त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांची माहिती होते काही विद्यार्थी तर अशी असतात की ते शिक्षकाच्या मदतीशिवाय स्वतः साहित्य तयार करतात.त्यामुळे अशा प्रदर्शनातून असा विद्यार्थी आपल्याला ओळखता येतात त्यांच्यातील सुप्त गुणांना बाहेर काढता येते या या विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयातील आवड वाढवता येते.विद्यार्थी याच्यात कोणत्याही दडपणाशिवाय सहभागी होतात विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले काही वस्तूंची नावे पुढील प्रमाणे आहे हे सौर ऊर्जा त्यापासून तयार केलेले सौर कुकर पवन ऊर्जा हिटर तयार करणे ,कुलर तयार करणे घरगुती पंखा, तयार करणे, घरगुती फ्रिज तयार करणे ,हृदयाची प्रतिकृती, श्वसनसंस्थेची प्रतिकृती ,मानवी उत्सर्जन संस्था, त्याची प्रतिकृती हरितगृह परिणाम ,वाढत्या तापमानाचा पृथ्वीवर होणारे परिणाम ,असे विविध वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या होत्या.त्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागला मुलांकडून साहित्य तयार करून घेण्यात आले.तक्ते तयार करून घेण्यात आले त्याची माहिती विद्यार्थ्याकडून वदवून घेण्यात आली.प्रदर्शनात कशा पद्धतीने माहिती सांगावी याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली रंगीत तालीम  या प्रदर्शनाचे घेण्यात आले.या सर्व तयारीनंतर विज्ञान प्रदर्शन करण्यात आले.या प्रदर्शनाला प्रमुख पाहुण्यांना बोलवण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन करून विज्ञान प्रदर्शन सुरू करण्यात आले व प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना हे साहित्य पाहण्यास परवानगी देण्यात आली .जेणेकरून राहिलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील साहित्याची माहिती मिळाली इथं शाळेतील विद्यार्थ्यांना ही
पालकांना परिसरातील इतर नागरिकांनाही ही स्पर्धा पाहण्यासाठी आमंत्रण देण्यात आले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयातील माहिती वाढली विज्ञान विषयातील आवड वाढली, त्यांच्यातील निरीक्षण क्षमता वाढली, विचार करण्याची क्षमता वाढली व अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य तयार करण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण झाले .दहा विद्यार्थ्यांनी तर शिक्षकांच्या मदतीशिवाय स्वतः वस्तू तयार केलेल्या होत्या .आणि त्याच्यात सुंदर होत्या ,वैज्ञानिक दृष्ट्या योग्य होत्या, त्यामुळे त्यांचेच नंबर विज्ञान प्रदर्शनात करण्यात आले विद्यार्थ्यांना साहित्य तयार करण्याचे मोकळी दिल्यास विद्यार्थी विचार करू ऊन साहित्य तयार करतात .त्यामुळे विज्ञान प्रदर्शनी में विज्ञान विषयासाठी खूप महत्त्वाचे आहे.जवळपास विज्ञानातील 50 ते 60 टक्के माहिती विद्यार्थ्यांना यातून मिळते हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मी खूप चांगला आहे दरवर्षी हा उपक्रम राबवून अभ्यास राबविल्यास विद्यार्थ्यांना यात्रा याचा खूप फायदा होतो.त्यामुळे विज्ञान विषय शिक्षकांनी दरवर्षी हे प्रदर्शन भरवावे त्यामुळे विषयाला पुर क असे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते आणि विद्यार्थी सुद्धा या प्रदर्शनात स्वतःहून सहभागी होतात आणि त्यांच्यातील ज्ञान विषयातील आवड वाढते. त्यामुळे विज्ञान शिक्षकांनी दरवर्षी विज्ञान प्रदर्शन अवश्य भरवावे.

विज्ञान विषयातील अध्यापनाच्या पद्धतीWhere stories live. Discover now