chapter 2

9 0 0
                                    

अध्यापन पद्धती एक
प्रश्नोत्तर पद्धती
विज्ञान विषयाचा सराव रिविजन घेण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो .चाचणी परिक्षेच्या वेळेस सत्र च्या वेळेस या पद्धतीने विद्यार्थ्यांचे विज्ञान विषयातील प्रश्न उत्तरे खेळाद्वारे पाठांतर करून घेता येईल.
त्यासाठी चाचणी साठी किती धडे आहेत याची कल्पना विद्यार्थ्यांना देणे विद्यार्थ्यांना धडे वाचायला लावणे थोडे समजून घेण्यास सांगणे प्रश्न उत्तरे पाठांतर करण्यास सांगणे व एखादा दिवस ठरवून वर्गामध्ये मुलांच्या व मुलींच्या प्रश्नोत्तर पद्धतीने विषयाचा चा सराव घेता येतो.
विद्यार्थ्यांना या खेळाची पूर्ण नियोजन सांगणे.यामध्ये मुलांचा युद्ध व मुलींचा एक गट तयार करावे प्रत्येक गटाला एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाला तुम्ही एक किंवा दोन गुण देऊ शकता .फळ्यावर मुलांचा व मुलींचा गट नोंद करावे मुलींना प्रश्न विचारावे आणि उत्तरे बरोबर दिल्यास मुलींच्या गटांना गुण द्यावे जर मुलींना त्या प्रश्नाचे उत्तर आले नाही तर त्याची संधी मुलांना द्यावी व योग्य उत्तर आल्यास त्याचे गुण मुलांना द्यावे त्यानंतर मुलांना हे प्रश्न विचारावे त्याने योग्य उत्तर दिल्या त्यांच्या गटाला गुण देणे चुकीचे उत्तर दिल्यास गटाला शून्य गुण देणे.या खेळामध्ये मुलांच्या व मुलींच्या अभ्यासपूरक स्पर्धा निर्माण होते आपल्या गटाला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी व गटाला जिंकून देण्यासाठी मुले व मुली प्रश्नांची उत्तरे देतील.या पद्धतीने सराव चाचणी घेतल्यास मुलांना खेळता खेळता विज्ञान विषयाचा अभ्यास होऊन जाईल विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयामध्ये आवड निर्माण होईल स्वतःहून मुले अभ्यास  करतील.

विज्ञान विषयातील अध्यापनाच्या पद्धतीWhere stories live. Discover now