आज सकाळी सकाळी त्याच मूड ऑफ होता ,कारण तिची आठवण मनात दाटत होती . आज तिचे लग्न होते ना .
काय करावे त्याला सुचत नव्हते . तिने लग्नाला बोलावले नाही म्हणून तो अधिकच नाराज होता .काय करावे आज , गप्प बसावे की घालावा जाऊन सरळ धुडगुस लग्न मंडपा मध्ये .
अक्षरश: डोक्यात विचारांचा धुमाकूळ असताना तिला त्यानेच दिलेले शब्द आठवले . अन तो वरमला .
हे काय करावयास लागला आहेस . तूच सांगितलेस न तिला .........
अन...... आता तूच विष कालवायला चालला आहेस ........नाही मी असे करणे शक्यच नाही ......
सांगितले होतेस तू तिला .... बाकी सगळे तयार असून काय उपयोग , तुझे वडील लग्नाला तयार हवेत .नाहीतर तुला त्यांच्याशिवाय आहे तरी कोण ?
मी तर तुला काल भेटलेला , पण तुला ज्यांनी जन्म दिला , वाढवले , तुझ्या गरजा पूर्ण केल्या ., त्यांना तू माझ्यासाठी विसरणार ,
हे काही मला मान्य नाही . आज जर तू माझ्या २ वर्षाच्या प्रेमासाठी २० वर्षाचे पिता-पुत्रीचे संबंध तोडावयास तयार असशील तर
मी तरी तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा . जर बापाच्या विरूद्ध जाऊन तू माझ्याबरोबर पळून यायला तयार असशील तर उद्या तू माझ्याशी विश्वासघात करणार नाहीस कशावरून ? ,
भले ही तुझी बहिण , काकू मला विरोध करत असली तरी मला ही तुझे हे पळून जाणे पटत नाही , असे नाही कि मी भ्याड आहे , यात सुद्धा माझ्या मनात तुझाच विचार आहे .
क्रमश :