" अहो..." एक अतिशय मंजुळ भेदरलेल्या किणकिणला तसा तो घाबरला. तिच्या कायेच्या स्पर्शाने बधिर झालेला हात त्याने हात खसकन मागे खेचला. परंतु भयाने पांढराफटक पडलेला त्याचा चेहरा त्याच्या चोरीची न बोलता कबुली देत होता.... आता काय... परस्त्री कडे नजर उचलूनही न पाहणारा मी.... तिच्या दुधाळ कायेत भान हरपून गेलो... त्याच्या हृदयाची धडधड चुकून तीलादेखील ऐकू गेली असावी. त्याच्याकडे पाहून ती ओशाळवाण हसली.
" क्षमा असावी ..." स्वतःच्या वागणुकीवर तो ओशाळला. भयानक पश्चात्तापाने त्याने आपले हात जोडले. इतकावेळ तिच्या कांतीवर रोखलेली नजर खाली गेली. पुढील परिणामाच्या कल्पनेने पहाटेच्या थंडीतही त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला.
" क्षमा.. कशासाठी.... आपण तर माझ्या प्राणांचे रक्षण केले. माझ्यावर जन्मोजन्मीसाठी हे उपकार राहतील." तिने झुकून त्याला चरणस्पर्श केला. हे सगळं अनपेक्षित होते. तो दचकून दोन पावले मागे सरकला. आता काही काळापूर्वी मनातील उमटलेल्या वासनेच्या तरंगांचे काय..? ती तरुणी मला रक्षक म्हणून गौरविते आणि आपण सहेतुक तिच्या पवित्र कायेला कलंकित करू पाहत होतो... नाही ती वासना नव्हती केवळ तिच्या सुंदर मादक तनुला स्पर्शण्याची अभिलाषा होती. त्याच मन सत्य मान्य करण्यास कचरत होत. त्याच्या मनाला वासनेचा झालेला स्पर्श तो अमान्यही करू शकत नव्हता. परंतु मनच ते.. सतत ह्या ना त्या हिंदोळ्यावर झुलतच राहणार... एखाद्या गोष्टीकडे डोळेझाक करावीशी वाटली की नेत्रांवर अज्ञानाची झापड बांधणार. अज्ञानात सुख असते म्हणे. मनाला कोण बरे आवरू शकलय. ते तर उधळलेला अश्व. त्या अश्र्वावर काबू मिळणे महान तपस्वीशिवाय तरी इतर कोणाला शक्य नाही.
" आपण अशा वेळी, ह्या नदीकिनारी... आत्महत्या करणे शोभा नाही देत. ते महापाप आहे...." त्याच्या कंप सुटलेल्या अंगात उसन पावित्र्य दाटून आल. स्वतःच महत्व अधोरेखित करण्याची संधी जी चालून आली होती.
YOU ARE READING
मोह - A Temptation
Romanceएक माणूस म्हणून आयुष्यात काय हवं असत..? पूर्ण सॅटिसफॅक्शन... तृप्तता. मग ती पैशाच्या बाबतीत असो वा भावनांच्या वा स्वप्नांच्या वा शारीरिक सुखाच्या... तृप्ततेच्या मृगजळाच्या मागे धावताना माणूस आपोआप त्या मोहजालात अडकत जातो. आणि सुरु होतो एक खेळ...ना त...