ही कथा मालिका 1990 या शतकातील आहे. कथा मालिकेचा विषय हा थोड्या प्रमाणात वेगळा आहे.
सामान्य लोकांना तो सहजासहजी पचणार नाही, त्यामुळे विनंती करते ज्यांना केवळ गोड कथा मालिका आवडतात, त्यांनी ही कथा मालिका वाचणे टाळावे, तसेच ही कथा मालिका लहान मुलांना किंवा पौडांग अवस्थेतील मुलांना शारीरिक संबंधाची माहिती आवश्यक आहे, यासाठी तयार करण्यात येत आहे.
तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे काही अपेक्षाहार्य शब्द आले असतील तर कथा मालिकेची आवश्यकता म्हणून वाचून सोडून द्यावे, धन्यवाद !स्थळ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील छोटासा तालुका दिंडोरी.. काळ दोन जून 1993.
रवीना चिंतेत होती, कारण आज तिचा दहावीचा निकाल लागणार होता.
तिला माहित होतं का तिचे सगळे पेपर अवघड गेले आहेत, पण या पिरेडमध्ये दहावी म्हणजे आयुष्याचा एक मोठा टप्पा होता..
दहावी पास झाल, तरच आयुष्याला अर्थ आणि दहावी नापास होणं म्हणजे त्याच आयुष्य वाया जाणार.
त्यात रवीना अभ्यासात कच्ची तिच्याच बीजगणित हा पेपर अजिबात सोडवल्या गेला नाही आणि त्याचेच परिणाम असे झाले का रवीना दहावीची परीक्षा पास होऊ शकली नाही.
घरी रिझल्ट घेऊन आलेले तिचे वडील आणि आई तिला खूप सुनावत होते.
बिचारी करणार तरी काय, एक तर एवढा अवघड विषय, सगळ डोक्यावरून जात होत.
ती खाजील झाली, शेवटी आई-बाबा त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेले.
मोठी बहीण कॉलेजला निघून गेली लहान भाऊ क्लासेस करता निघून गेला.
रवीना बिचारी एकटीच घरी ती सुद्धा चाळी वजा असलेल्या क्वार्टर मध्ये गच्ची वरती येऊन बसली.
तिथे पाण्याच्या टाकीजवळ गुडघ्यात तोंड खूपसून हमसुहंमसू रडू लागली.
कारण तिच्या आई-वडिलांनी तिला खूपच सुनावले होते.
तिचा अर्धा तास रडणं झाल्यावरती शाम तीच्या समोर उडी मारत, अरे रवीने काय झालं एवढं काय रडतेस?
रवीना त्याला रागात बघत, रडू नये तर काय करू.. यावर्षीच्या टर्म मध्ये सुद्धा दहावी गेली खरंच रे मला नाही जमत हे बीजगणित..श्याम," म्हणजे तुझ केवळ बीजगणितच गेला अग त्यासाठी एवढं रडते.. विचार कर माझा फक्त मराठी वाचला बाकी सगळे गेले असे म्हणून तो तिला थोडं का होईना हसवायचा प्रयत्न करत होता..
श्याम, रवीनाचा वर्गमित्र. दोघेही एकाच शाळेत जायचे; पण गेल्या वर्षीपासून दोघेही दहावीत अडकून बसले.
श्यामने तर चीटिंग करून कसं बस मराठीचा पेपर सोडवला.. पण त्याचे बाकीचे विषय मात्र अडकून पडले.. तर रवीना बीजगणित या विषयात नापास झाली..
दोघेही निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातले त्यामुळे जास्तीच्या लाडा हे तर माहीतच नव्हतं. त्यात 90 च्या दशकातील आई-वडिलांचं त्यांच्या मुलांकडे जस दुर्लक्ष असायचं तसंच या दोघांच्या बाबतीतही व्हायचं...त्या दोघांचे वडीलही वेगवेगळ्या खात्यात शिपाई म्हणून काम करायचे, तर त्यांच्या आया त्यांना दुपारची झोप महत्वाची राहायची, त्या बारा ते दोन झोपायच्या दोन नंतर शेजारच्या बायकांच्या उचापती करण एवढंच त्यांचं काम
राहायचं.ते दिवशी त्या दोघं छतावरती एकमेकांचे दुःख मोकळं करत होते, पण हे दुःख मोकळ करताना श्यामने अचानक रवीनाच्या हातावर हात ठेवला.
तो हात तिच्या हातावर पडताच रवीनाच्या काळजात धस्स झालं.. कारण पहिल्यांदाच कोणीतरी मुलगा तिला स्पर्श करत होता, शेवटी यौवन होतं ना ते..
तो तिला बघत म्हणाला, एवढं काय रडायचं जाऊदे आपण काहीतरी खेळायचं का?"तिला एरवी शाम चा राग यायचा पण आज त्याच्याकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे, प्रेमाच्या दोन शब्दांमुळे त्याचा आधार वाटू लागलं आणि त्याच्यासोबत बोलायची ओढ लागू लागली..
त्यावर ती म्हणाली हो मला आवडेल तुझ्यासोबत खेळायला, पण आपण काय खेळायचं?
शाम तीला हसत म्हणाला, आपण घरघर खेळायचं..
ती त्याला बघत, पण घरघर तर मुलीच खेळतात तू कशाला खेळतो.
श्याम," अग त्या दिवशी तू त्या दोन लहान मुलांसोबत खेळत होती, तेव्हा मला सुद्धा ते आवडलं.. चल ना आपण घरघर खेळूया!त्यावर रवीना म्हणाली मला आवडेल रे खेळायला.. पण आता आई उठेल तिला चहा करून द्यावा लागेल..मी एक काम करते उद्या एक वाजता येते आणि येताना माझी भावली सुद्धा सोबत आणते, तेव्हा आपण दोघे घरघर खेळूया.
श्याम ला सुद्धा ही कल्पना आवडली. तो ठीक आहे मनाला, दोघेही आता आपापल्या घरी गेले.