"हॅलो..
माया मॅडम?
तुमची उद्या दुपारची अपॉईंटमेंट फिक्स आहे का?"पलीकडून अगदी खोल आवाजात कोणीतरी विचारले. पण मायाकडे हा नंबर सेव्ह नव्हता.
झोपण्याच्या तयारीत असल्याने नेट ऑफ होते.
त्यामुळे नंबरही सर्च झाला नाही.
डोळ्यावर झोप असल्याने तिने घाईघाईत फोन रिसिव्ह केला होता.
थोडेसे नाराजीने आणि जरा साशंक होऊन तिने विचारले.आपण कोण बोलताय?
म्हणजे हा नंबर माझ्याकडे सेव्ह नाहीये, म्हणून विचारले.
कसली अपॉईंटमेंट?
मला जरा डिटेल्स सांगाल का प्लीज!अरे सॉरी.
मी माझा इंट्रोच नाही दिला ना तुम्हाला.
मी करण.
"इंकिया" टॅटू स्टुडिओ ओनर अँड टॅटू आर्टिस्ट.
ॲक्च्युली माझी असिस्टंट रिया, तिच्यासोबत तुमचे उद्याच्या अपॉईंटमेंट संदर्भात बोलणे झाले होते.
पण उद्या "ती" नेमकी रजेवर आहे.
तुम्हाला घाई असेल तर उद्या मी तुमचा टॅटू करून देऊ शकतो.
कारण उद्याच्या अल्मोस्ट सगळ्या अपॉईंटमेंट्स मी कॅन्सल केल्या आहेत.
पण तुमचा टॅटू लहानसा, अर्धा एक तासात होणारा आहे.
सो नो प्रॉब्लेम.ओह माय गॉड!
म्हणजे तुम्ही स्वतः करण सर बोलत आहात?
माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये.
खरंच तुम्ही माझा टॅटू करून देणार?
कान्ट बिलीव्ह की, मी इतकी लकी आहे.
मी असं ऐकलंय की, तुमच्याकडून टॅटू करून घेण्यासाठी लोक वाट्टेल तेवढी अमाऊंट पे करायला तयार असतात.
आणि महिने लागतात तुमच्याकडे अपॉईंटमेंट मिळायला!
आणि साक्षात, द ग्रेट करण सर माझा टॅटू करणार?
वाह!मायाच्या बोलण्यातून तिला झालेला आनंद सहजपणे कळून येत होता.
खरंतर तो ओसंडून वाहत होता.हाहाहा.
मायाजी.
येस, मीच करण अवस्थी.
मीच तुमचा टॅटू करणार.
कारण मोठमोठ्या क्लायेंट्सचे मोठे मोठे टॅटू करून मी कंटाळलोय.
मला उद्या जरा रिलॅक्स करायचे आहे.
म्हणून मी उद्या फक्त तुमचेच काम करणार.
तर मग उद्या दुपारी दोन वाजता चालेल ना तुम्हाला माया मॅडम?हो सर.
का नाही चालणार.
आय एम वेरी एक्सायटेड!
मी दोन वाजता येईल करण सर.
YOU ARE READING
टॅटू
Fantasyमायाचे टॅटूचे वेड तिला कुठपर्यंत नेऊन पोहोचवते हे जाणून घेण्यासाठी माझी ही लघुकथा नक्की वाचा. सादर करत आहे. टॅटू..